About the author  ⁄ Swapnil Pathak

‘दुष्काळ.. कोठे आहे? आमच्या भागात तर दुष्काळ जाणवत नाही. खरे तर दुष्काळ हा मराठवाड्याच्या पाचवीलाच पुजलेला आहे. असे असले तरी आमच्या दुष्काळाचा कोणी उदो उदो करीत नाहीत. दुष्काळामुळे आपले कसे होईल, अशी चिंता करीत न बसता आमचे आम्हीच दुष्काळावर मात करण्यास शिकलो आहोत,’ हे बोल आहेत गटशेतीचा प्रयोग यशस्वी करणारे बीड जिल्ह्यातील इंजेगावचे कृषिभूषण नाथराव कराड यांचे.

Read More →

सोलापूर( मोहन काळे): महाराष्ट्रातील शेतरस्त्यांच्या बाबतीत विचार केला तर बहुतांश शेतकर्‍यांची अवस्था आज ‘बळी तो कान पिळी’ अशीच झाली आहे.

Read More →

औरंगाबाद, दि.६ : मराठवाड्यातील दुष्काळी स्थितीची केंद्रीय पथकाने सोमवारी (दि.६) पाहणी सुरू केली आहे. सोमवारी हे पथक जालना जिल्ह्याची तर मंगळवारी (दि. ७) औरंगाबाद जिल्ह्यात पाहणी करणार आहे. या पथकाचे नेतृत्व नॅचरल रिसोर्स मॅनेजमेंटचे उपमहासंचालक डॉ. ए. के सिक्का हे करत आहेत.

Read More →

वाशिम : कमी पाण्यात अधिक उत्पन्न मिळविण्याचे आव्हान शेतकऱ्यांसमोर असून ‘आत्मा’च्या माध्यमातून शेतकऱ्यांना निश्चित दिशा मिळेल, असा विश्वास पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी व्यक्त केला.

Read More →

मार्चपासूनच आपल्याकडे दुष्काळाचे हाकारे पिटले जातात. दरवर्षी नित्यनेमाने हे घडतेय. दुष्काळ-दुष्काळ म्हणत लोक का घुमत राहतात, हे कोडे सुटणे अशक्यच. ‘दुष्काळ आवडे सर्वांना’ असे उपरोधिक; पण वास्तव दर्शन घडवणारे पुस्तक पत्रकार पी. साईनाथ यांनी लिहिलेय. दुष्काळावर शेकडो समित्यांनी अहवाल दिले; पण या प्रश्‍नाची दाहकता कमी होताना दिसत नाही. सर्वच माध्यमे दुष्काळाबाबत ओरड करण्यात नेहमीच तत्पर असतात. वृत्तपत्रांना तर पर्वणीच मिळते. रकानेच्या रकाने भरून दुष्काळाला प्रसिद्धी दिली जाते.

Read More →

दरवर्षी उन्हाळ्यात जणावरांच्या चार्‍याची टंचाई भासते. चार्‍याअभावी जणावरे अशक्त होण्याची शक्यता असते. दुष्काळी परिस्थितीत चारा टंचाईचा सामना करताना पशुपालकांनी चार्‍याचे योग्य व्यवस्थापन करणे जरूरीचे आहे.

Read More →

ऊस
सुरू उसाची लागवड होऊन १२ ते १६ आठवडे झाले असल्यास व वाढीच्या अवस्थेतील ऊस पिकाला नत्र खताचा हप्ता २५ किलो (५४ किलो युरिया) या प्रमाणात द्यावा. ८ ते १० दिवसांच्या अंतराने गरजेप्रमाणे पाण्याच्या पाळ्या द्याव्यात. उसाच्या सरीमध्ये हेक्टरी ५ टन पाचटाचे आच्छादन टाकावे. त्यामुळे बाष्पीभवनाचा वेग कमी होऊन ओल जास्त काळ टिकून राहते व सेंद्रिय खतांचा पुरवठासुद्धा होतो.
पूर्व हंगामी उसाला चार ते साडेचार महिने झाले असल्यास प्रतिहेक्टर १३६ किलो नत्र (२९५ किलो युरिया), ८५ किलो स्फूरद (५३१ किलो सिंगल सुपर फॉस्फेट) व ८५ किलो पालाश (१४२ किलो म्युरेट ऑफ पोटॅश) देऊन मोठी बांधणी करावी.

Read More →