Review Category : ग्रीन हाऊस

हरितगृहात पीक लावण्याआधीपासूनच अशा अपायकारक जिवांचे संभाव्य प्रवेशमार्ग रोखण्याची सर्वतोपरीने काळजी घेतली पाहिजे. काळजी घेऊनही त्यांचा हरितगृहात शिरकाव झाला तर योग्य ते उपाय योजून त्यांची वाढ आणि प्रसार नियंत्रणात ठेवता आला पाहिजे. हरितगृह पीक व्यवस्थापनातल्या या एका महत्त्वाच्या गोष्टीकडे पुरेसे लक्ष देणे आवश्यक आहे.

Read More →

प्रकाश, तापमान, आर्द्रता, पाणी, कार्बनडाय ऑक्साईड वायू या हरितगृहातील वातावरणातल्या गोष्टी आतील पिकाच्या दृष्टीने परस्परांशी निगडित आहेत. प्रकाशसंश्‍लेषण क्रियेत यांपैकी एकाची जरी उपलब्धता आवश्यकतेपेक्षा कमी किंवा जास्त प्रमाणात झाली तर पिकाच्या वाढीवर त्याचा परिणाम होतो. म्हणूनच आपण निवडलेल्या पिकाच्या या गोष्टींबाबतच्या आवश्यकता काय आहेत आणि त्यांच्या तेवढ्या प्रमाणातील उपलब्धतेवर नियंत्रण कसे राखायचे हे माहीत झाले की, हरितगृहातील व्यवस्थापन सोपे होईल.

Read More →

यापूर्वीच्या लेखांद्वारे आपण मातीविना शेती आणि हरितगृहांचा इतिहास जाणून घेतला. या लेखाद्वारे आपण हरितगृहांची गरज काय? त्यांची उभारणी का करावी, याविषयी माहिती घेणार आहोत.

हरितगृहे का असावीत? असा प्रश्‍न ३०-३५ वर्षांपूर्वी कोणी विचारला असता तर भारतासारख्या जैवविविधतेने नटलेल्या, विविध प्रकारचे हवामान एकाच वेळी असणार्‍या, भरपूर सूर्यप्रकाश आणि वर्षातील बराच काळ ऊबदार वातावरण असलेल्या देशात हरितगृहांची आवश्यकता नाही, असेच उत्तर आले असते. दुर्मिळ वनस्पतीचे जतन किंवा काही वनस्पतींवरील प्रयोगांसा

Read More →

हरितगृहातील शेती फायदेशीर करताना मातीशी संबंधित बाबी तपासणे गरजेचे असते. अनेकदा माती चांगली नसेल, तर उत्पादनात अडचणी येतात. त्यामुळेच आता ‘मातीविना शेती’ या तंत्राचा झपाट्याने प्रचार होताना दिसतो आहे.

हरितगृहामध्ये लागवड करण्याआधी त्यामधील माती झाडांच्या वाढीसा

Read More →

मातीविना शेती ही संकल्पना काय आहे? मातीला पर्याय म्हणून कोणती माध्यमे वापरली जातात, हरितगृहात माती वापरताना काय काळजी घ्यावी, ही माहिती आपण लेखाच्या पहिल्या भागात घेतली. ही शेती प्रत्यक्ष कशा पद्धतीने करतात, त्याची माहिती…

झाडांची पाण्याची आवश्यकता ही बाहेरील वातावरणावर अवलंबून असते. जर वातावरणाचे तापमान वाढलेले असेल आणि हवेतील आर्द्रता कमी झालेली असेल तर झाडांची पाण्याची मागणी वाढते. म्हणूनच उन्हाळ्यामध्ये झाडांना दिवसातून दोनदा-तीनदा पाणी द्यावे लागते, तर हिवाळ्यात किंवा पावसाळ्यात दिवसातून एकदा किंवा दोन-तीन दिवसांतून एकदा पाणी दिले तरी ते पुरेसे होते. मातीशिवाय शेती तंत्रामध्ये निवडलेले माध्यम ओलसर

Read More →