Review Category : आमचा ठसा

शेतकर्‍यांच्या शेतमालाला योग्य भाव मिळावा, या उद्देशाने कृषी विभागातर्ङ्गे शहरी भागांमधील ग्राहकांसाठी ‘धान्य महोत्सव’ आयोजित केले जात आहेत. शेतकरी व ग्राहक यामध्ये असणारी दलालांची साखळी कमी करून दोघांनाही योग्य मोबदला मिळावा, हा हेतू या ‘धान्य महोत्सवा’मागे आहे. या महोत्सवामुळे काही ठिकाणी शेतकर्‍यांचा आणि ग्राहकांचा ङ्गायदा होत असला तरी, काही ठिकाणी शेतकर्‍यांऐवजी व्यापारी लॉबी ‘धान्य महोत्सवा’त शेतकर्‍यांच्या नावाने विक्री करत आहे. या वास्तवाची प्रचिती अहमदनगर येथे झालेल्या ‘धान्य महोत्सवा’त आली. या वास्तवाचा वेध घेणारा हा लेख…

अहमदनगर येथे नुकताच ‘धान्य महोत्सव’ पार पडला. धान्य महोत्सव शेतकर्‍यांसाठी भरविला होता की, व्यापार्‍यांसाठी असा प्रश्‍न निर्माण होत होता. महोत्सवामधील अर्ध्याहून अधिक स्टॉलवर व्यापार्‍यांनीच शेतकर्‍यांच्या आडून कब्जा मिळविला होता. धान्य महोत्सवात ग्राहक थेट शेतकर्‍यांकडून खरेदी करतो. मालाच्या गुणवत्तेवर विश्‍वास ठेवून शेतकर्‍यांना चार पैसे अधिक देतो. बाजारापेक्षा आपणाला नक्कीच थोडा का होईना, स्वस्तामध्ये गुणवत्तापूर्ण शेतीमाल मिळतो आहे, असा ग्राहकांचा समज असतो. या गोष्टीचा ङ्गायदा शेतकर्‍यांना मिळण्याऐवजी शेतकर्‍यांच्या रूपात व्यापारी पुढे सरसावले आहेत. शेतकर्‍यांच्या नावाचा गैरवापर करून व्यापार्‍यांनी भुरट्या मार्गाने धान्य महोत्सवात प्रवेश मिळविला आहे. शेतकर्‍यांच्या शेतमालाची व्यापार्‍यांमुळे मोठी हेळसांड व अवहेलना झाली व त्यांचे नुकसान झाले.

धान्य महोत्सवात विक्रीसाठी शेतमाल आणणारा व्यक्ती हा शेतकरी आहे की अन्य कुणी याची शहानिशा करण्याची जबाबदारी आयोजकांची होती. आयोजकांचे यावर कोणतेही नियंत्रण नसल्याने या महोत्सवात व्यापारी घुसले. व्यापार्‍यांनी ‘विक्रीचे पॉईंट’ ध्यानात घेऊन आपले स्टॉल बुक केले. विशेष म्हणजे व्यापार्‍यांनी मध्य प्रदेशमधील इंदौरचा गहू या महोत्सवात मोठ्या
प्रमाणावर विकला. बाजारभावाचा अंदाज असल्याकारणाने व्यापार्‍यांनी शेतकर्‍यांनी आपल्या शेतमालाला लावलेल्या दराचे गणित ओळखून अधिक विक्री करण्याच्या उद्देशाने शेतमालाचे भाव पाडले. यामुळे शेतकर्‍यांपेक्षा व्यापार्‍यांच्या मालाची अधिक विक्री झाली. ही बाब काही शेतकर्‍यांनी आयोजकांच्या लक्षात आणून दिली. यावर आयोजकांनी मात्र जाणूनबुजून कानाडोळा केल्याचे चित्र होते. या महोत्सवात विक्रीसाठी पन्नासहून अधिक व्यापार्‍यांची संख्या होती आणि त्यांच्यावर कारवाई केली तर ‘धान्य महोत्सव’ रिकामा होईल, ही भीती आयोजकांना वाटत होती. शेतकर्‍यांना या ठिकाणी विक्रीसाठी प्रोत्साहित करण्यात कृषी विभाग या ठिकाणी अपयशी ठरल्याचे यावरून स्पष्ट झाले.
या महोत्सवात सुयोग्य व्यवस्थापनाचा अभाव जाणवत होता. शेतकर्‍यांना विक्रीसाठी केवळ कापडी मंडप उभारून दिले होते. एप्रिल-मे हे महिने अवकाळी पावसाचे असतात. यादृष्टीने शेतकर्‍यांच्या शेतमालाची पावसासारख्या नैसर्गिक आपत्तीपासून संरक्षण करण्यासाठी काहीच उपाययोजना येथे नव्हत्या. शेतमालाची चोरी वा इतर नुकसानीबाबतच्या उपाययोजना आखणे आवश्यक होते. शेतकरी-ग्राहक थेट विक्रीसाठी ‘धान्य महोत्सव’ हा अत्यंत गरजेचा उपक्रम आहे मात्र, यातून शेतकर्‍यांचा
शेतमाल थेट विक्री होणे गरजेचे आहे.
*

- योगेश थोरात

Read More →

सेंद्रिय पद्धतीनेसुद्धा कापसाचे चांगले उत्पादन मिळू शकते, हे बीड जिल्ह्यातील लोळदगाव येथील शिवराम जयराम घोडके या तरुण शेतकर्‍याने सिद्ध करून दाखविले आहे. केवळ कापसापासून नव्हे तर कपाशीच्या पर्‍हाटीपासून तयार होणार्‍या कम्पोस्ट खतापासून ते एकरी एक हजार रुपये उत्पन्न मिळवत आहेत, हे विशेष.

शिवराम जयराम घोडके या २७ वर्षीय शेतकर्‍याने कष्ट व योग्य व्यवस्थापनाच्या बळावर आपली शेती सुधारली आहे. कापूस लागवडीचे वेगवेगळे प्रयोग राबवून त्यांनी चांगले उत्पादन घेतले आहे. लोळदगाव येथे घोडके यांची २० एकर जमीन असून, २ विहिरी व एक बोअरवेल आहे. जून २०१२ च्या अखेरीस शिवराम घोडके यांनी ५ एकर क्षेत्रात ‘अजित १५५’ व ५ एकर क्षेत्रात ‘मल्लिका बी. टी.-२’ च्या कापसाच्या बियाण्यांची लागवड केली होती.

१० एकरात कपाशीची लागवड
कापसाचे बियाणे लावण्यापूर्वी त्यांनी गतवर्षीच्या पर्‍हाटीपासून तयार झालेले चांगले कम्पोस्ट खत एकरी ५ क्विंटल या प्रमाणात पेरून जमिनीत दिले. त्या खतांवर रेघोट्या ओढून ५ फूट बाय १ फूट अंतरावर बियाणे टोकण पद्धतीने लावले. बियाणे लावण्यापूर्वी त्यावर ‘सीपीपी’ व
‘सिद्धी ३’ची प्रक्रिया प्रत्येक किलो बियाण्यास अर्धा किलो याप्रमाणे केली होती. ५ बाय १ फूट या अंतरावर लागवड केल्यामुळे एकरी २ बॅग बियाणे लागले.
२७ जून ते ३ जुलै या कालावधीत त्यांनी १० एकर क्षेत्रावर कपाशीची लागवड केली.

जिवामृतची फवारणी
चार वेळा पाणी दिल्यानंतर कपाशीचे झाड उगवले. त्यानंतर घोडके यांनी बिडी ५००ची पहिली फवारणी व पुढे एक महिन्यानंतर दुसरी फवारणी केली. कपाशीच्या वाढीसाठी इतर कोणतेही खत न वापरता २१ दिवसांनी जिवामृत तयार करून हेक्टर २०० लिटर जिवामृतची फवारणी केली. अशा प्रकारे प्रत्येक २१ दिवसांच्या अंतराने जिवामृतच्या तीन फवारण्या करण्यात आल्या.
एक महिन्यानंतर प्रत्येक १० दिवसाला एकरी ५ किलो ‘सीपीपी’ लिंबाच्या डहाळीने कपाशीवर शिंपडले. जिवामृत व ‘सीपीपी’मुळे सूक्ष्म व अतिसूक्ष्म अशा लक्षावधी जिवाणूंची निर्मिती झाली. त्यामुळे पुन्हा खतांची मात्रा देण्याची गरजच पडली नाही. ‘सीपीपी’मुळे जमीन भुसभुशीत व फुगीर झाली. कपाशीची झाडेही रसरशीत व तजेलदार झाली.
कपाशी पिकावर कोणत्याही प्रकारच्या कीड व रोगांचा प्रादुर्भाव झाला नाही, तरीही मावा व तुडतुडे नियंत्रणासाठी जैविक द्रावण तयार करून त्यांचे शिंपण झाडावर केले. या जैविक द्रावणासाठी १३ लिटर गोमूत्रामध्ये २५० ग्रॅम गूळ + २५० ग्रॅम मैदा + ८ लिंबू पिळून एकत्र द्रावण तयार केले होते. गूळ-मैदामुळे कीड आली तरी पानांचे नुकसान न होता या द्रावणाच्या पापुद्य्रांवर चिकटून बसली आणि गोमूत्र व लिंबातील सायट्रिक ऍसिडमुळे रासायनिक प्रक्रिया होऊन मृत झाली. एकूणच जैविक साखळीचे पूर्णपणे नियंत्रण या कपाशीला झाले.
यापूर्वीही घोडके यांनी या क्षेत्रात कपाशीचेच पीक घेतले होते. त्यासाठी सेंद्रिय अधिक रासायनिक अशी संमिश्र प्रक्रिया केली होती. तेव्हा त्यांना एकरी ८ क्विंटल उत्पादन मिळाले. त्यामुळे या वेळेस त्यांनी संपूर्ण सेंद्रिय पद्धतीनेच कापूस पिकवला. रासायनिक खतांमुळे, औषधांमुळे जमिनीवर, पिकांवर दुष्परिणाम होतात. त्याचे परिणाम माणसालाही भोगावे लागतात. प्रत्येक शेतकर्‍यांकडे किमान एक तरी देशी गाय असायलाच पाहिजे, असे घोडके म्हणतात.

उत्पादन खर्च व उत्पन्न
१० एकर क्षेत्रातून शिवराम घोडके यांना एकूण १२२ क्विंटल कापसाचे उत्पादन मिळाले. कपाशी उत्पादनासाठी बियाणे १९,००० रुपये, लागवड खर्च १० हजार रुपये, मशागत १० हजार रुपये, फवारणी २ हजार रुपये, वेचणी ४० हजार रुपये व इतर खर्च ५ हजार असा एकूण ८६ हजार रुपये खर्च आला. घोडके यांच्या कापसाला प्रति क्विंटल ४ हजार रुपये असा भाव मिळाला. एकूण १२२ क्विंटल कपाशीपासून ४,००० रुपये प्रति क्विंटलप्रमाणे ४ लाख ८८ हजार रुपये उत्पन्न मिळाले. ८६ हजार रुपये खर्च वजा जाता त्यांना ४ लाख २ हजार रुपये निव्वळ नफा मिळाला.
कापसापासून चांगले उत्पादन तर मिळतेच; शिवाय कापसाच्या पर्‍हाटीपासून एकरी ३ टन खत मिळते ते वेगळेच. कपाशीच्या पर्‍हाटीपासून तयार होणार्‍या कम्पोस्ट खतात एकरी १००० रुपये मिळतात. हे शेतकर्‍यास मिळणारे अतिरिक्त उत्पन्न आहे. अशा प्रकारे सेंद्रिय शेतीसुद्धा अत्यंत फायदेशीर ठरते, असे शिवराम घोडके यांनी सांगितले.
*
जिवामृत तयार करण्याची पद्धत
शिवराम घोडके यांनी कपाशीसाठी पुढीलप्रमाणे जीवामृत तयार केले : २०० लिटर पाणी + १० लिटर गोमूत्र + १० किलो गाईचे शेण + २ किलो गूळ + २ किलो हरभरा डाळीचे पीठ + २ किलो वडाखालची किंवा वारूळाची माती + २ किलो सीपीपी (सीपीपी सेंद्रिय घटक म्हणून विकत मिळते.) असे मिश्रण तयार करून ते ७ ते २१ दिवस एकत्रित ठेवले. हे मिश्रण दर दिवशी क्लॉकवाईज टाकावे लागते.

१० एकरात पिकवला १२२ क्विंटल कापूस
शिवराम घोडके यांना १० एकर क्षेत्रातून एकूण १२२ क्विंटल कापसाचे उत्पादन मिळाले. एकरी सरासरी १२ क्विंटल कापूस निघाला. या उत्पादनासाठी बोंड लागण्याच्या अवस्थेत एकच पाणी देण्यात आले होते. पिकाला पुन्हा देण्यासाठी पाणी उपलब्ध नव्हते. नाहीतर एकरी १५ क्विंटलपेक्षा जास्त उत्पादन मिळाले असते, असे घोडके म्हणाले.

संपर्क ः शिवराम जयराम घोडके
लोळदगाव, ता. जि. बीड
मो. नं. ९८२३८२७४४४

Read More →

नेवासा तालुक्यातील हंडी निमगाव येथील रमेश पिसाळ या प्रयोगशील शेतकर्‍याने ‘महिको सीड्स’ कंपनीच्या ‘एमआरसी ७३५१’ या बी. टी. संकरित वाणाच्या बियाण्यांची लागवड करून कपाशीचे एकरी २१ क्विंटल उत्पादन घेतले आहे. पावसाचे प्रमाण कमी असतानाही खत व पाण्याचे व्यवस्थित नियोजन करून त्यांनी ही उत्पादनाची किमया साधली आहे.

अहमदनगर जिल्हा हा ऊस व दूध उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. या जिल्ह्यातील नेवासा तालुक्यात उसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होते. उसाबरोबरच कापसाचेही उत्पादन या बागायती पट्ट्यात चांगल्या प्रमाणात घेतले जाते. हंडी
निमगाव हे नेवासा तालुक्यातील दीड हजार लोकसंख्येचे गाव. या गावातील रमेश गणपत पिसाळ यांना शेतीमध्ये विशेष रस. एम. ए. बी. एड्. पर्यंत शिक्षण पूर्ण केल्यानंतर शेतीत प्रयोग करण्याची त्यांना इच्छा झाली. प्रयोग म्हणून शेती करणार्‍या या शेतकर्‍याने गेल्या चार वर्षांपासून शेतात कापूस लावून एकरी २० ते २५ क्विंटल उत्पादन घेतले आहे.

‘महिको’च्या ‘एमआरसी ७३५१’ वाणाची लागवड
‘महिको सीड्स’ कंपनीचे अधिकारी संजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली रमेश पिसाळ यांनी कापसाचे दर्जेदार उत्पादन घेतले आहे. गेल्या वर्षीपासून या भागात पावसाचे प्रमाण कमी आहे. असे असतानाही पाण्याचे व्यवस्थित नियोजन करून त्यांनी कापसाचे एकरी २१ क्विंटल उत्पादन घेतले आहे. १४ जून २०१२ रोजी त्यांनी आपल्या २ एकर क्षेत्रात ‘महिको सीड्स’च्या ‘एमआरसी ७३५१’ या बी. टी. संकरित वाणाच्या बियाण्यांची लागवड केली. त्यांना प्रति एकर २ बॅग बियाणे लागले. दोन झाडांमध्ये साधारण १ फूट व ५ बाय १ सरीचे अंतर ठेवून एकरी आठ ते साडेआठ हजार झाडांची लागवड त्यांनी केली.

खत व पाणी व्यवस्थापन
त्यांनी लागवडीपूर्वी एकरी २ ट्रेलर शेणखत, ३ गोण्या सुपर ङ्गॉस्ङ्गेट,
१ गोणी पोटॅश, ५ किलो मॅग्नेशियम सल्ङ्गेट,
५ किलो झिंक, ५ किलो ङ्गेरस या खतांची मात्रा दिली. पाणी देण्यासाठी ठिबकचे लॅटरल टाकले. गेल्या वर्षी पाऊस कमी असल्यामुळे त्यांनी सरी थोड्या उथळ केल्या. यामुळे थोड्या वेळातच म्हणजे अर्धा ते एक तासात झाडांपर्यंत पाणी पोहोचू लागले. त्यातून आपोआपच पाण्याची बचत झाली. लागवडीनंतर चौथ्या दिवशीच बियाणे उगवले. सातव्या दिवशी खुरपणी करून तण काढण्यास सुरुवात केली. पिसाळ यांच्याकडे साडेबारा ङ्गुटी जू असून, त्याद्वारे बैलाचा औत त्यांनी सरीमध्ये घातला. इतका लांब जू ङ्गारच कमी शेतकर्‍यांकडे असतो. पिसाळ यांनी जाणीवपूर्वक इतक्या लांबीचा जू तयार करवून घेतला. बियाणे उगवल्यानंतर साधारणतः १५ दिवसांनी त्यांनी एकरी २५ किलो युरिया, २५ किलो प्लॅन्टो (दाणेदार) या खतांची मात्रा दिली.

रोग नियंत्रण
पिकावर पडणार्‍या रोगासाठी त्यांनी
मोनोरिल (इमिडा), झिल आणि पी. स्टीम औषधांची एक महिन्यानंतर ङ्गवारणी केली.
एकरी २१ क्विंटल उत्पादन
ऑक्टोबर २०१२ च्या पहिल्या आठवड्यात म्हणजेच लागवडीच्या चार महिन्यांनंतर पहिल्या टप्प्यात पिसाळ यांना एकरी ९ क्विंटल कापसाचे उत्पादन मिळाले व त्याला ४१०० रुपये प्रति क्विंटल इतका भाव मिळाला. दुसर्‍या टप्प्यातील कापसाची वेचणी ऑक्टोबर महिन्याच्याच शेवटच्या आठवड्यात करण्यात आली. या दुसर्‍या टप्प्यात एकरी ४ क्विंटल उत्पादन निघाले व त्याला प्रति क्विंटल ४३०० रुपये इतका भाव मिळाला. त्याचबरोबरच नोव्हेंबरच्या तिसर्‍या आठवड्यात एकरी ३ क्विंटल कापसाचे उत्पादन मिळाले व त्याला ४००० रुपये प्रति क्विंटल एवढा भाव मिळाला. त्यानंतर साधारणपणे अडीच महिन्यांच्या ङ्गरदडीच्या कालावधीनंतर
ङ्गेब्रुवारी २०१३ च्या पहिल्या आठवड्यात चौथ्या टप्प्यात एकरी ३ क्विंटल कापूस निघाला. त्याला प्रति क्विंटल ४२०० रुपये भाव मिळाला. शेवटच्या पाचव्या टप्प्यात एकरी २ क्विंटल कापूस मार्च २०१३ च्या पहिल्या आठवड्यात निघाला व तो प्रति क्विंटल ४६०० रुपये दराने विकला गेला. अशा प्रकारे पिसाळ यांनी कापसाचे एकरी २१ क्विंटल उत्पादन घेऊन एकूण
८७ हजार ९०० रुपये इतके उत्पन्न मिळवले. वेचणीचा एकरी खर्च १० हजार रुपये, खत व ङ्गवारणीचे २० हजार रुपये असा एकूण ३० हजार रुपये खर्च वजा जाता एकरी ५७ हजार ९०० रुपयांचे निव्वळ उत्पन्न त्यांना कापसाद्वारे मिळाले आहे. येणार्‍या हंगामात एकरी ३० क्विंटल उत्पादन काढण्याचे पिसाळ यांचे ध्येय आहे.

एकाच वेळी चार आंतरपिके
एकदा प्रायोगिक स्वरूपात रमेश पिसाळ यांनी आपल्या उसाच्या पिकात कोथिंबीर, मूग, कांदा व मिरची या चार आंतरपिकांचे एकाच वेळेस उत्पादन घेतले होते. ही चारही पिके एकत्र घेताना कुठल्याच पिकाचा दुसर्‍या पिकावर परिणाम झाला नाही, हे विशेष. या प्रयोगाची स्थानिक वृत्तपत्रांनीही चांगली दखल घेतली. अनेक शेतकर्‍यांनी त्यांच्या कापसाच्या प्लॉटला भेटी दिल्या. सोलापूरच्या ‘वनिता ऍग्रो कंपनी’नेही पिसाळ यांच्या या प्रयोगाचे कौतुक केले.
शेतीच्या आवडीपोटी रमेश पिसाळ यांनी नेवासा ङ्गाटा येथे गेल्या महिन्यात गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर स्वतःचे ‘त्रिवेणीश्‍वर कृषी सेवा केंद्र’ सुरू केले आहे. या कृषी सेवा केंद्रामुळे शेतकर्‍यांना मार्गदर्शन करण्याची तसेच स्वतःचे ज्ञान वाढवण्याची संधी मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. कृषी विज्ञान मंडळाचे कृषी संघटक तसेच गावातील हरितक्रांती शेतकरी गटाचे अध्यक्ष म्हणूनही ते कार्यरत आहेत.
*

एका बोंडापासून ७ ग्रॅम कापूस निघावा
रमेश मिसाळ म्हणतात की, एका झाडाला ७० ते ८० कैर्‍या येणे व एका बोंडापासून ७ ग्रॅम कापूस निघणे गरजेचे आहे. जूनमध्ये होणार्‍या पावसात पहिल्या तीन दिवसांत कापसाची लागवड करणे गरजेचे आहे. मे महिन्यातच लागवडीपूर्व तयारी पूर्ण केली पाहिजे. कापूस लागवडीसाठी पूर्व-पश्‍चिम प्लॉट असला पाहिजे; जेणेकरून हवा मोकळी राहते व पिकास चांगला सूर्यप्रकाश
मिळून पीक उत्पादनात वाढ होते. शेतीच्या मशागतीकडे लक्ष दिले पाहिजे व येणार्‍या खर्चाचा चोख हिशेब ठेवला पाहिजे. शेतकर्‍यांनी बाजारपेठेवर लक्ष ठेवून तीन टप्प्यांत कापूस विकावा. तसेच दिवसातून ३ वेळा प्लॉटला भेट देऊन पाहणी करावी. पाणी नियोजन तसेच कीड, रोग व्यवस्थापन चांगल्या प्रकारे करावे, असेही त्यांनी आवर्जून सांगितले.

संपर्क : रमेश गणपत पिसाळ
हंडी निमगाव, ता. नेवासा,
जि. अहमदनगर
मो. नं. ९४०४९७८४४१

Read More →

मुंबई, दि.९ – बखरकारांमुळे जसा आपणास इतिहास कळला व त्यावर आपण विश्‍वास ठेवला तसेच पत्रकारांच्या बाबतीत आहे. पत्रकारांनी आपल्या बातम्यांमधून वस्तुनिष्ठ माहिती प्रसिद्ध करावी, कारण त्यांचे आजचे लिखाण हे उद्याची बखर ठरणार आहे, असे प्रतिपादन सार्वजनिक बांधकाम तथा पर्यटन मंत्री छगन भुजबळ यांनी येथे केले.

Read More →

सोलापूर( मोहन काळे): महाराष्ट्रातील शेतरस्त्यांच्या बाबतीत विचार केला तर बहुतांश शेतकर्‍यांची अवस्था आज ‘बळी तो कान पिळी’ अशीच झाली आहे.

Read More →

नवी दिल्ली : शेतमाल तारण योजनेअंतर्गत गोदामांमध्ये ठेवलेल्या शेतमालाच्या पावतीवरील कर्जाची मर्यादा आता दुप्पट झाली असून २५ लाखांऐवजी आता ५० लाख रुपयांपर्यंतचे कर्ज उपलब्ध होणार आहे.

Read More →

मुंबई,दि.३,: राज्यात सन 2011 मध्ये अतिवृष्टी, अवेळी पाऊस व इतर नैसर्गिक आपत्तीमुळे 50384.13 हेक्टर शेतपिकांचे व 8692.20 हेक्टर फळपिकांचे क्षेत्र अशा एकूण 59076.33 हेक्टर क्षेत्राचे 50 टक्केपेक्षा जास्त नुकसान झाले आहे. त्या क्षेत्रासाठी केंद्र शासनाच्या निकष व दराप्रमाणे बाधित शेतकऱ्यांना एक विशेष बाब म्हणून 22 कोटी 52 लाख 56 हजार रुपयांची मदत खताच्या स्वरुपात वाटपाला शासनाने मान्यता दिली आहे.

Read More →