Review Category : यशकथा शेतीच्या

पौराणिक आणि ऐतिहासिक पार्श्‍वभूमी लाभलेल्या रामटेकमधील कृषिजीवनदेखील बदलत आहे. चार वर्षांत तालुक्यात ८०० पेक्षा जास्त शेततळे साकारले असून, त्यामुळे पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे शेतकर्‍यांनी अतिरिक्त हंगामातील एखाद दुसरे जास्तीचे पीक घेणे सुरू केले आहे. कृषी अधिकार्‍यांचे प्रयत्न आणि शेतकर्‍यांचा सकारात्मक प्रतिसाद यातून रामटेकची शेततळ्यांतील क्रांती साकारली आहे.

Read More →

प्रतिकूल परिस्थितीत आधुनिक तंत्राचा वापर करून जळगाव ङ्गेरण (ता. जि. औरंगाबाद) येथील सिकंदर कडूबा जाधव यांनी कमी पाणी आणि कमी खर्चात जास्त उत्पन्न मिळवून शेतीतून आर्थिक प्रगती साधली आहे. त्यांनी डाळिंब, मोसंबी, पेरूची ङ्गळबाग लागवड केली आहे. दरवर्षी ते ठिबकवर कापूस उत्पादन घेतात. काशीङ्गळ आणि भोपळ्याच्या बीजोत्पादनातही जाधव अग्रेसर आहेत.

Read More →

आपल्या रोजच्या जगण्यासाठी आवश्यक असणार्‍या अन्न, वस्त्र, निवारा या गोष्टी आपल्या शेतातून भागविता येतात का? कुठलेही रसायन, खत न वापरता शेती करता येते का, या प्रश्‍नाचे सकारात्मक उत्तर मिळते, रामभाऊ महाजन यांच्या स्वावलंबी जीवनशैलीतून. खाद्यतेलापासून ते कापडापर्यंतच्या गोष्टी ते घरीच नवितात. त्यामुळेच बाजारात कापसाचे भाव पडले तरीही त्यांच्या चेहर्‍यावर नाराजी दिसत नाही.

Read More →

बालपणीच नामदेवराव अढाऊ यांनी शेतकरी होण्याचे ठरविले व दहावी झाल्यानंतर दोन वर्षांचा कृषी पदविका अभ्यासक्रम पूर्ण केला. १९७२ मध्ये वीजजोडणी घेत विहिरीच्या पाण्यावर कोरडवाहू शेती ओलिताखाली आणली. पारंपरिक पीक पद्धतीऐवजी कमी दिवसात जास्त उत्पन्न देणारी मिरची, कांदा पिके त्यांनी घेतली. बघता-बघता नामदेवरावांनी २००२ मध्ये १२ एकर शेती विकत घेतली. त्यांनी खरीप हंगामात कांदा घेण्याचे ठरविले व पहिल्याच प्रयोगात एकरी तीन लाख रुपयांचे उत्पन्न घेतले.

Read More →

औरंगाबाद जिल्ह्यातील आडगाव (ठोंबरे) येथील राजेंद्र कुबेर या तरुण शेतकर्‍याने साडेआठ गुंठे फूलशेतीतून केवळ पाच-सहा महिन्यांत दीड लाख रुपयांचे उत्पन्न घेतले आहे. पाण्याच्या कमतरतेमुळे ते फळशेतीकडून फूलशेतीकडे वळले आणि उत्तम व्यवस्थापनाच्या जोरावर त्यांनी फूलशेती चांगलीच फुलवली आहे.

Read More →

सोलापूर जिल्ह्यातील जांभूड येथील शेतकरी राजू इनामदार यांनी एकात्मिक पद्धतीने अन्नद्रव्याचे उत्तम व्यवस्थापन करून वाया गेलेली केळीची बाग वाचविली. अशा परिस्थितीत त्यांनी गतवर्षी केळीचे एकरी ३४ टन सरासरी उत्पादन मिळविण्याची किमया साधली आहे. खर्च वजा जाता दोन एकरातून त्यांना पहिल्या वर्षी साडेतीन लाख रुपये निव्वळ उत्पन्न मिळाले आहे.

Read More →

‘मले काम धंदे नाही वाटते. जसे काही तुम्हालेच गडबड आहे, कामधंद्याची. अडी बोल्याचे काय सरकार पैसे देत नाही. काही हौस नाही तुम्हाले शेतीतले अनुभव सांगायची. ऐकायचे अशीन त् ऐका नाहीत उ

Read More →