Review Category : पशुधन

दरवर्षी उन्हाळ्यात जणावरांच्या चार्‍याची टंचाई भासते. चार्‍याअभावी जणावरे अशक्त होण्याची शक्यता असते. दुष्काळी परिस्थितीत चारा टंचाईचा सामना करताना पशुपालकांनी चार्‍याचे योग्य व्यवस्थापन करणे जरूरीचे आहे.

Read More →

शेतीपूरक जोडधंद्यांमध्ये कुक्कुटपालन व्यवसायाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. अल्पभूधारक शेतकरी व सुशिक्षित बेरोजगार यांच्यासाठी हा व्यवसाय आधारस्तंभ बनला आहे. गेल्या २५-३० वर्षांपासून हा व्यवसाय चढत्या क्रमाने विकसित झालेला आहे व होत आहे. कुक्कुटपालन व्यवसाय किफायतशीर कसा होईल, याकडे लक्ष देणे गरजेचे असून स्पर्धेच्या जगात या व्यवसायात टिकून राहण्यासाठी नवनवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करावा लागेल.

Read More →

गायी-म्हशींनी जास्त दूध द्यावे, यासाठी ‘ऑक्सिटोसीन’ हे रसायन त्यांना इंजेक्शनच्या माध्यमातून दिले जाते. मानवी आरोग्यासाठी घातक असलेल्या या रसायनाचा गैरवापर करण्याचे प्रकार काही ठिकाणी घडतात. विदर्भात काही दिवसांपूर्वी ‘ऑक्सिटोसीन’चा मोठा साठा जप्त करण्यात आला. दुभत्या जनावरांना देण्यात येणार्‍या या घातक रसायनाविषयीची माहिती या लेखात जाणून घेऊया…

Read More →

म्हशींच्या गोठ्यामध्ये शेण, मूत्र, सडलेला चारा इत्यादींमुळे सूक्ष्म जिवाणूंची झपाट्याने वाढ होते. त्यामुळे अनेक संक्रमणांचा आणि रोगराईचा धोका निर्माण होतो. म्हशीची पारडे आजारी पडून त्यांच्या जीवितास धोका निर्माण होतो. आजारामुळे त्यांचा मृत्यूदर वाढू शकतो. त्यामुळे डेअरीचे भवितव्य संकटात येते. हे प्रकार टाळण्यासाठी म्हशीच्या पारड्यांचे चोख व्यवस्थापन केले पाहिजे.

Read More →

हिवाळा हा निरोगी ऋतू म्हणून ओळखला जातो. या काळात जनावरांचे योग्य व्यवस्थापन केले तर पशुधनापासून चांगले व जास्तीचे दुग्धोत्पादन मिळू शकते. जनावराने खाल्लेल्या आहारापासून शरीरास लागणारी व वातावरणातील तापमानाशी समतोल राखणारी ऊर्जा निर्माण होते. वातावरणाचे तापमान कमी-जास्त झाले, तर समतोल राखण्यासाठी जास्त ऊर्जा खर्च होते. याचा परिणाम जनावरांच्या वाढीवर, आरोग्यावर, दुग्धोत्पादनावर व प्रजोत्पादनावर होतो. याकरिता हिवाळ्यात जनावरांची काळजी घेणे आवश्यक आहे.

Read More →

असंतुलित, अनियमित व्यवस्थापन हे जनावरांना होणार्‍या रोगांचे महत्त्वाचे कारण आहे. शेळीसारख्या जनावरांचे रोग टाळण्यासाठी योग्य व्यवस्थापन अत्यंत महत्त्वाचे आहे. व्यवस्थापनामध्ये प्रामुख्याने शेळीचे घर, स्वच्छता, खाद्य, प्रजनन, गर्भारपणातील काळजी, लहान करडांची काळजी, लसीकरण इत्यादी बाबींचा समावेश होतो.

Read More →

प्रत्येक गावचे खास असे वैशिष्ट्य असते. गावाच्या वैशिष्ट्यावरूनच त्या गावाची वेगळी ओळख तयार होत असते. पुणे जिल्ह्यातील उदापूर (ता. जुन्नर) या गावानेही ‘पाचशे बैलजोड्यांचे गाव’ म्हणून आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. येथील बैलजोड्या शेती व शेतकर्‍यांना समृद्ध बनविण्यासाठी आधार बनल्या आहेत. या गावच्या शेतकर्‍यांनी आपत्कालीन परिस्थितीत चार्‍याची देवाण-घेवाण करून बैलजोडी सांभाळण्याची परंपरा जोपासली आहे.

Read More →