एका गावातून कालवा (कॅनॉल) जाणार होता. कॅनॉलसाठी पाटबंधारे खात्याचे अधिकारी येऊन गावात सर्व्हे करू लागले. एका जमिनीच्या मोजणीसाठी सर्व्हेअर गेल्यावर रामचंद्र नावाच्या शेतकर्याने त्यांना विनंती केली की, साहेब, कॅनॉल जरा वरच्या बाजूला घेतला तर आमच्या जमिनीचे नुकसान थोडे कमी होईल. त्यावर इंजिनियरने कॅनॉलचे काम थोडे वरच्या बाजूने सरकावण्याचा निर्णय घेतला. वरच्या बाजूची जमीन आमचीच आहे, असे सांगून प्रत्यक्षात आपला चुलत भाऊ सखारामची जमीन कॅनॉलमध्ये जाईल, अशी सोय रामचंद्रने केली होती. जिल्ह्याच्या गावी नोकरी करणार्या सखारामला आपल्या जमिनीतून कॅनॉल जाणार, हे समजले तेव्हा फार उशीर झाला होता! शिवाय, कॅनॉल हा लेव्हलप्रमाणे आपल्याच शेतातून गेला याबद्दल त्याला आश्चर्य वाटले नाही.*
तात्पर्य ः
आम्ही एकत्र आहेत, असे दाखवून भूसंपादनासाठी भावाचे क्षेत्र दाखविणारा माणूस कलियुगात फारसा दुर्मिळ नाही.



