अनेक तरुण शिक्षण पूर्ण झाल्यानंतर नोकरीच्या मागे धावतात; मात्र शेतीची ओढ लागलेल्या अकोला जिल्ह्यातील आडगावच्या भूषण नेमाडे या युवकाने कॉल सेंटरची नोकरी सोडून ऊतिसंवर्धित केळीच्या रोपांची बाग फुलवली. ‘टिश्यू कल्चर’चा व्यवसाय हेच आता त्याचे करिअर बनले आहे. शेतीकडे पाठ फिरविणार्‍या तरुणांसाठी हा एक आदर्शच म्हणावा लागेल.

Read More →

असंतुलित, अनियमित व्यवस्थापन हे जनावरांना होणार्‍या रोगांचे महत्त्वाचे कारण आहे. शेळीसारख्या जनावरांचे रोग टाळण्यासाठी योग्य व्यवस्थापन अत्यंत महत्त्वाचे आहे. व्यवस्थापनामध्ये प्रामुख्याने शेळीचे घर, स्वच्छता, खाद्य, प्रजनन, गर्भारपणातील काळजी, लहान करडांची काळजी, लसीकरण इत्यादी बाबींचा समावेश होतो.

Read More →

राहुरी ः विद्यापीठात विकसित झालेल्या तंत्रज्ञानाची माहिती प्रत्येक शेतकर्‍यांनी जाणून घेणे महत्त्वाचे आहे. विद्यापीठाने विकसित तंत्रज्ञानाचा अभ्यास करून शेतकर्‍यांनी शेती करावी, विद्यापीठाशी नाळ जोडावी व शेतकर्‍यांनी शेतीतज्ज्ञ व्हावे, असे प्रतिपादन महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. तुकाराम मोरे यांनी केले.

Read More →

नाशिक, ता. २९ : शेतकरी बांधवांना समर्थ व संपन्न बनवण्यासाठी अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ त्र्यंबकेश्वर यांच्या वतीने दि .१ जानेवारी २०१३ ला श्रीगोंदा जिल्हा अहमदनगर येथे एक दिवसिय शेतकरी मेळाव्याचे व समर्थ ऍग्रो वर्ल्ड कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुकुल प्रकल्पाचे प.पू. गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे हे स्वतः शेतकर्‍यांशी प्रबोधनात्मक हितगुज करणार आहे. तरी लाखो शेतकर्‍यांनी या सत्संग सोहळ्याचा व कृषी प्रदर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन समर्थ सेवा मार्गाच्या वतीने करण्यात आले आहे.

Read More →

नवी दिल्ली : भूगर्भातील पाण्याची पातळी व भेडसावणारी पिण्याच्या पाण्याची समस्या पाहता भविष्यात पाणी प्रश्न: गंभीर बनणार आहे. तेव्हा राष्ट्रीय जल नीती धोरण ठरविताना बदलत्या हवामानाचा विचार करणे क्रमप्राप्त ठरेल. तसेच महाराष्ट्राच्या अभिनव योजनांचा समावेशही नव्या धोरणात करण्यात यावा, असे विचार मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले.

Read More →

यवतमाळ जिल्हा परिषदेतर्ङ्गे २८ ते ३१ जानेवारी २०१३ दरम्यान कृषी प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन होणार असून, प्रदर्शनात नामांकित कंपन्या, विद्यापीठ, कृषीविषयक संस्था, संघटना, बचतगटांचे दीडशेपेक्षा जास्त स्टॉल्स राहणार असल्याचे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रवीण देशमुख यांनी सांगितले. विविध विषयांवर तज्ज्ञांची चर्चासत्रे व सांस्कृतिक कार्यक्रमही होणार आहेत.

Read More →

पूर्ती उद्योग समूह, वेद संस्था आणि एम.एम.ऍक्टिव्ह या ‘ऍग्रो व्हिजन’ आयोजन समितीतर्ङ्गे नागपूर येथील रेशीमबाग मैदानावर २४ ते २७ जानेवारी २०१३ दरम्यान ‘ऍग्रो व्हिजन २०१३’ या राष्ट्रीय कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रदर्शनात ट्रॅक्टरसह विविध कृषी अवजारे, राज्य व केंद्र शासनाच्या कृषी व संबंधित विभागांचे स्टॉल्स, कृषी विद्यापीठ, संशोधन संस्था, कंपन्या, शेतीविषयक संस्था, संघटना, बचतगट, कृषी प्रकाशन संस्था, कृषी उत्पादकांचा सहभाग राहील. कृषी विषयक चर्चासत्रांमध्ये तज्ज्ञांचे मार्गदर्शन होणार आहे.

Read More →