औरंगाबाद, (राहुल कुलकर्णी) ः मराठवाड्यातील पाणीटंचाईमुळे ङ्गळबागा वाचविण्यासाठी शेतकर्यांनी कमी खर्चात होणार्या कमी जाडीच्या प्लॅस्टिक मल्चिंग पेपरचा वापर केला आहे. यासाठी शासनाने अनुदान द्यावे, अशी शेतकर्यांची मागणी होती. सर्वात अगोदर सा.‘आधुनिक किसान’ ने आडूळ (ता पैठण जि. औरंगाबाद) परिसरातील शेतकर्यांनी कमी खर्चात केलेल्या मल्चिंगचे प्रयोग आणि कमी जाडीच्या पेपरसाठी अनुदान द्यावे ही मागणी प्रभावीपणे मांडली होती. टंचाईच्या स्थितीत ङ्गळबागांना मल्चिंग उपयुक्त असल्याबाबत गेल्या काही अंकातून विविध विषय देखील मांडले आहेत. याची दखल घेत प्रशासनाने कमी जाडीच्या मल्चिंग पेपरसाठी अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे.

Read More →

अकोला, (प्रतिनिधी) ः कंपनीच्या एखाद्या अधिकार्याना किंवा मार्केटींग, लीगल खात्याच्या उच्चपदस्थ अधिकार्याला कृषी विभागाच्या पुणे येथील आयुक्तालयात पाठवून नोंदणी कृषी निविष्ठा कंपन्यांना आता पर्यंत करावी लागत होती. मात्र, यापुढे वार्षिक परवाना नोंदणी कंपन्यांना ऑनलाईन पद्धतीने करावी लागणार आहे. पेपरलेस कामाचा पायंडा पाडण्याचा व कृषी निवीष्ठांमधील घटकांबाबत पारदर्शकपणा आणण्याचा शासनाचा प्रयत्न आहे.

Read More →

उस्मानाबाद,दि.31- राज्यातील कुक्कुट पालन व्यवसायास गती देण्यासाठी 12 व्या पंचवार्षिक योजनेत कुक्कुट पालन व्यवसाय सुरु करण्याच्या नवीन योजनेस मुंबईत बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. ज्या जिल्ह्याचा मानव विकास निर्देशांक कमी आहे, अशा शेवटच्या 5 जिल्ह्यांमध्ये ही योजना सन 2012-13 मध्ये राबविण्यात येणार आहे. पुढील कालावधीत उपलब्ध निधी विचारात घेऊन वरील निकषानुसार इतर जिल्हयांमध्ये या योजनेची व्याप्ती वाढविण्यात येणार आहे.

Read More →

केंद्राकडे आणखी मदतीची मागणी

औरंगाबाद, दि. ३१ (प्रतिनिधी) ः राज्यातील रब्बी हंगामातील शेतकर्यांचे नुकसान लक्षात घेऊन केंद्र शासनाकडे आणखी मदतीसाठी पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांची वार्षिक अर्थसंकल्पीय प्रारूप आराखडा बैठक विभागीय आयुक्त कार्यालयात गुरूवारी (दि.३१) पार पडली.

Read More →

मुंबई : 2012 च्या पावसाळी मोसमात राज्यात काही भागात अपुऱ्या पडलेल्या पावसामुळे टंचाईग्रस्त म्हणून जाहीर झालेल्या 7064 गावांमध्ये अल्प मुदत सहकारी कर्जाचे मध्यम मुदतीत रुपांतरण करण्याबाबत आणि शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुलीस स्थगिती देण्याबाबतचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी आज मंत्रालयात दिली.

Read More →

मुंबई – राज्यातील टंचाईग्रस्त परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर टंचाई निवारणासाठी उपलब्ध झालेल्या निधी पैकी पाणीपुरवठा विभागास एकूण 413. 98 कोटी रुपयांचा निधी वितरित केला असल्याची माहिती वनमंत्री डॉ. पतंगराव कदम यांनी मंत्रालयात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

Read More →