सोलापूर, ता.२८ ः महाराष्ट्रातील शेतकरी दुष्काळी परिस्थितीत होरपळत आहे. पिण्याचे पाणी व जनावरांच्या चार्याचा प्रश्न बिकट बनला आहे. अशा परिस्थितीत शेतकर्यांना पिण्याचे पाणी व जनावरांची छावणी मंजूर करून देण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश युवक कॉंग्रेस प्रयत्न करेल, असा विश्वास अध्यक्ष डॉ. विश्वजित कदम यांनी रोपळे (ता.पंढरपूर) येथील शेतकर्यांना दिला. यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील शेतकर्यांचे वीजबिल माङ्ग करण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश युवक कॉंग्रेस राज्य शासनाकडे पाठपुरावा करत असल्याचे सांगितले.
बुलडाणा ते सांगली दरम्यान निघालेल्या संवाद पदयात्रा त्यांनी रोपळेच्या ग्रामस्थांशी संवाद साधला. डॉ. कदम म्हणाले, ‘ दुष्काळात काही कोणत्या पक्षामुळे आला नाही. तो नैसर्गिक आहे. त्याचा सामना आपण सर्वांनी करण्याची गरज आहे. केंद्र व राज्य सरकार दुष्काळ निवारण्यासाठी प्रयत्न करत आहे. पाणी पुरवठा व चारा छावण्यांसाठी प्रचंड निधी खर्च करीत आहे. तरीही दुष्काळाने होरपळलेल्या जनतेला मानसिक बळ देण्यासाठी या संवाद पदयात्रेचे आयोजन केले असल्याचे त्यांनी सांगितले.‘ या संवाद पदयात्रेत एकहजारहून अधिक कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला होता. हे कार्यकर्त्ये प्रवासात थांबून शेतकर्यांना दिलासा देत होते.
(छायाचित्र ः मोहन काळे, सोलापूर)
Read More →