उन्हाळी भुईमुगाची आपल्याकडील उत्पादकता फार कमी आहे. भुईमुगाची उत्पादकता वाढविण्यासाठी उच्च तंत्रज्ञानाचा वापर करणे ही काळाची गरज आहे. बदलत्या वातावरणाचा विचार करता, पाण्याचा व अन्नद्रव्यांचा कार्यक्षम वापर करून उत्पादन वाढविण्यासाठी भुईमूग लागवडीमध्ये पॉलिथीन आच्छादनाचा (मल्चिंग) वापर करणे अधिक फायदेशीर आहे.

Read More →

राज्यातील काही भागात सध्या पाणी टंचाईची परिस्थिती आहे. ज्या भागात पाणी उपलब्ध आहे अशा ठिकाणच्या शेतकर्‍यांनी थोड्याङ्गार प्रमाणावर उपलब्ध असणार्‍या पाण्यावर उसाचे पिक घेतले आहे. या आपत्कालीन परिस्थितीत उसाचे काटेकोरपणे व्यवस्थापन केल्यास ऊसाचे चांगले उत्पादन घेणे शक्य आहे. यासाठी ऊस उत्पादक शेतकर्‍यांना काही उपाययोजना करणे आवश्यक आहे.

Read More →

एका गावातून कालवा (कॅनॉल) जाणार होता. कॅनॉलसाठी पाटबंधारे खात्याचे अधिकारी येऊन गावात सर्व्हे करू लागले. एका जमिनीच्या मोजणीसाठी सर्व्हेअर गेल्यावर रामचंद्र नावाच्या शेतकर्‍याने त्यांना विनंती केली की, साहेब, कॅनॉल जरा वरच्या बाजूला घेतला तर आमच्या जमिनीचे नुकसान थोडे कमी होईल. त्यावर इंजिनियरने कॅनॉलचे काम थोडे वरच्या बाजूने सरकावण्याचा निर्णय घेतला. वरच्या बाजूची जमीन आमचीच आहे, असे सांगून प्रत्यक्षात आपला चुलत भाऊ सखारामची जमीन कॅनॉलमध्ये जाईल, अशी सोय रामचंद्रने केली होती. जिल्ह्याच्या गावी नोकरी करणार्‍या सखारामला आपल्या जमिनीतून कॅनॉल जाणार, हे समजले तेव्हा फार उशीर झाला होता! शिवाय, कॅनॉल हा लेव्हलप्रमाणे आपल्याच शेतातून गेला याबद्दल त्याला आश्‍चर्य वाटले नाही.*

तात्पर्य ः
आम्ही एकत्र आहेत, असे दाखवून भूसंपादनासाठी भावाचे क्षेत्र दाखविणारा माणूस कलियुगात फारसा दुर्मिळ नाही.

Read More →

डोंगररांगांनी वेढलेल्या बुलडाणा जिल्ह्यातील हिवरखेड परिसरातील खडकाळ जमिनीत पिकं फारशी येत नसल्याने अनेक शेतकरी केवळ खरीप पिकांचेच उत्पादन घेतात. तथापि, हिवरखेडच्याच दादाराव हटकर व बंधूंनी मात्र जेथे कुसळ उगवत नव्हती अशा माळरानावर जिद्द, चिकाटी व कष्टाच्या बळावर संत्रा, डाळिंबाची बाग फुलविली आहे. शेततळ्यातील पाण्याचे गुरुत्वाकर्षण पद्धतीने उत्तमप्रकारे सिंचन व नियोजन करून त्यांनी फळबागेसह शेतात अनेक नावीन्यपूर्ण प्रयोग केले आहेत.

Read More →

दूध हा अल्पकाळ टिकणारा नाशवंत पदार्थ आहे; पण प्रक्रियेमुळे त्याची गुणवत्ता व आयुष्य वाढते. दूध उत्पादक शेतकर्‍यांनी तसेच उद्योेेजकांनी जर नवीन तंत्रज्ञान, संशोधन, प्रक्रिया यासारख्या बाबींचा विचार करून व्यवसायात परिवर्तन केल्यास यश निश्‍चित मिळेल. याशिवाय उद्योजकाला या क्षेत्रात भरपूर संधी आहेत.

Read More →

देवळाली प्रवरा (जि. अहमदनगर) येथील गणेश बाळासाहेब भांड या युवकाने शेतीतून फारसे उत्पन्न मिळत नसल्याने दूध संकलन करण्याचे ठरविले. हे करत असताना स्वत:च्या मालकीचा दूध प्रकल्प असावा, असे स्वप्न पाहिले आणि खडतर परिस्थितीशी संघर्ष करीत अथक प्रयत्नांतून स्वत:च्या शेतवस्तीवर ‘चैतन्य मिल्क ऍण्ड ऍग्रो फार्म’ नावाने हा दूध प्रकल्प सुरूही केला.

Read More →

सोलापूर जिल्ह्यातील भोसे या गावातील मुळे बंधूंनी शेतीला जोडधंदा म्हणून पशुपालन व दूध व्यवसाय सुरू केला आणि नंतर दुधापासून खवा बनविण्याचा व्यवसायही चालू केला. अखंड मेहनत, व्यवस्थापनाच्या जोरावर पाहता पाहता खवा व्यवसायातून त्यांनी चांगलीच आर्थिक प्रगती साधली. शेतीही सुधारली. दुष्काळी परिस्थितीतही मुळे बंधूंचा हा व्यवसाय जोमाने सुरू आहे.

Read More →