अकोला दि.५ (प्रतिनिधी) ः येथील कृषी विज्ञान केंद्राच्या उद्यान विद्या विभागातर्ङ्गे पातूर येथे फळे आणि फुलझाडांच्या छाटणी तंत्र प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. विषय विशेषज्ञ गजानन तुपकर यांनी ङ्गळ किंवा फुलझाडांमध्ये मधील छाटणीचे प्रकार, महत्व आदी विषयी प्रात्यक्षिकासह माहिती दिली.

Read More →

औरंगाबाद दि. ५ (प्रतिनिधी) ः जागतिक जलदिनानिमित्ताने आयोजित केलेल्या विविध स्पर्धा व उपक्रमांना दि. २२ ङ्गेब्रुवारी, २०१३ पासून मोठया उत्साहात सुरूवात झाली आहे. क्रेडाई औरंगाबादच्या पुढाकाराने व औरंगाबाद महानगरपालिका, ग्लोबल डेव्हलपमेंट ङ्गोरम, इंडियन काऊन्सील ङ्गॉर वॉटर ऍण्ड कल्चर, औरंगाबाद प्लंबिग असोशिएशन, औरंगाबाद इंडस्ट्रीयल कॉन्स्ट्रक्टर्स असोशिएशन, प्रेस ङ्गोटोग्राङ्गर असोशिएशन, औरंगाबाद ङ्गोटोग्राङ्गर असोशिएशन, औरंगाबाद मुद्रक संघ, औरंगाबाद ऍडव्हरटायजींग ऍण्ड मार्केटींग एजन्सीज असोशिएशन यांच्यातर्ङ्गे जागतिक जलदिन (२२ मार्च) साजरा होत आहे.

या निमित्ताने दि. २२ ङ्गेब्रुवारी ते ७ मार्च या कालावधीत शालेय व महाविद्यालयीन स्तरावर भित्तीपत्रक, घोषवाक्य या स्पर्धा घेण्यात येत आहेत. तसेच सर्वांसाठी खुल्या छायाचित्र स्पर्धाही घेण्यात येत आहे. या स्पर्धांसाठी पाण्याचे दुर्भिक्ष, पाण्याचे नियोजन व जलसहकार हे विषय देण्यात आले आहेत. २२ ङ्गेबु्रवारी ते २० मार्च २०१३ या कालावधीत प्रत्यक्ष जलसंधारणाचे कामे करणार्या नागरीकांनाही पुरस्कार देवून सन्मानीत करण्यात येणार आहे. वरील सर्व पुरस्कार दि. २२ मार्च रोजी साजरा होणार्या कार्यक्रमात वितरीत करण्यात येतील. सर्व स्पर्धकांनी अधिक माहितीसाठी मो. नं. ९४०५९७४८६१, ९४२२२०२२२८ व ९३२६२१०४४३ संपर्क साधावा.

स्पर्धेत निवड झालेल्या भित्तीपत्रक, घोषवाक्य व छायाचित्र यांचे दि. २२ ते २४ मार्च दरम्यान प्रदर्शनही भरविण्यात येणार आहे. यानिमित्त आयोजित केलेले सर्व कार्यक्रम नागरीकांसाठी खुले असून त्यांचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन कला ओझा (महापौर), डॉ. हर्षदीप कांबळे (मनपा आयुक्त), प्रमोद खैरनार (अध्यक्ष-के्रडाई औरंगाबाद) व बाळकृष्ण भाकरे (सचिव-क्रेडाई औरंगाबाद) यांनी केले आहे.

या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. सुशिल भारूका (संयोजक), नितीन बगडीया (सहसंयोजक), संग्राम पटारे (सहसंयोजक), एस. डी. पानझडे (मनपा जलविभाग प्रमुख), गजानन देशमुख, प्रदिप भलगे, मिलिंद बापट, हरीरंग शिंदे, डॉ. अशोक तेजनकर, सुभाष शेळके, ङ्गेरोज खान, किशोर निकम, श्रीरंग ङ्गरकडे, अनिल अग्रहारकर, राजेंद्रसिंग जबिंदा, सुनिल पाटील, पापालाल गोयल, अमोल कलानी, रवि वट्टमवार, भास्कर चौधरी, सुयोग रूणवाल, रूपेश अग्रवाल, सुनिल राका हे पुुढाकार घेत आहेत.

Read More →