बीड जिल्ह्यातील डिघोळअंबा येथील कृषि विज्ञान केंद्रातर्ङ्गे रुई धारूर येथील बचत गट व शेतकरी मंडळातील महिलांचा जागतिक महिला दिनानिमित्त मेळावा आयोजित करण्यात आला होता. अध्यक्षस्थानी जनशिक्षण संस्थाच्या निदेशक मृदुलाताई पाठक तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रा. एस. डी. लटपटे, प्रतिभाताई देशमुख, आयुर्वेद तज्ज्ञ डॉ. मुक्तार, अंगद हातागडे आणि अश्रुबा पवार यंाची उपस्थिती होती.

Read More →

जालना : (प्रतिनिधी)दुष्काळी परिस्थितीमुळे जालना जिल्ह्यातील १ हजार ७२८ कुटुंबे कामासाठी अन्य जिल्ह्यात स्थलांतरित झाली असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने अधिकृतरीत्या दिली आहे.राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री अनिल देशमुख यांनी शुक्रवारी (८ मार्च) येथे जिल्ह्यातील पुरवठा विभागाच्या कामाचा आढावा घेतला.

Read More →

दुष्काळी परिस्थितीवर कायमस्वरूपी मात करण्यासाठी उस्मानाबाद जिल्ह्यातील रांजणी येथील नॅचरल शुगर ऍण्ड अलाईड इंडस्ट्रीजतर्फे (एन-साई)जलसंधारणाची कामे हाती घेण्यात आली आहेत. घारगाव, शिराढोण, ताडगाव व रांजणी येथे नॅचरल जलसंधारण योजनेअंतर्गत समतल पाझर तलाव, नाला रुंदीकरण व खोलीकरणाचे काम प्रगतिपथावर आहे. या कामाची पाहणी महाराष्ट्र सिंचन सहयोगाचे अध्यक्ष डॉ. दि. मा. मोरे यांनी नुकतीच केली. मराठवाड्यात उद्भवलेल्या दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर हाती घेण्यात आलेले हे काम उपयुक्त आणि प्रेरणादायी असल्याचे मोरे यांनी सांगितले. ‘एसाई’ चे अध्यक्ष बी. बी. ठोंबरे म्हणाले की, कोणत्याही इष्ट आपत्तीचे संधीत रूपांतर करून त्यावर मात करण्याची मूळ संकल्पना आम्ही पूर्वीपासून प्रत्यक्ष अमलात आणली असून यावर्षी उद्भवलेल्या दुष्काळी परिस्थितीवर कायमस्वरूपी मात करण्यासाठी आम्ही हा उपक्रम हाती घेतला आहे.

Read More →

गडचिरोली:(प्रतिनिधी) मानव विकास मिशन, महाराष्ट्र शासन अंतर्गत कृषी विज्ञान केंद्र सोनापूर-गडचिरोली (डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला) आणि कृषी विभाग, महाराष्ट्र शासन द्वारा संचालित फिरते माती परीक्षण प्रयोगशाळेचे उद्घाटन पालकमंत्री तथा गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

Read More →

पुणे:(प्रतिनिधी)आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून आज महाराष्ट्र राज्य शासनाच्या वतीने नव्या महिला धोरणाचा कच्चा मसुदा आज येथे जाहीर करण्यात आला. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी या धोरणाचा मसुदा असलेल्या संकेतस्थळाचे आज येथे अनावरण केले. यावेळी महिलांच्या विरोधातील हिंसा आणि स्त्रीभ्रूण हत्यासारख्या गुन्हा करणाऱ्यांवर सक्त कारवाई केली जाईल, असे चव्हाण यांनी सांगितले.

Read More →