जालना : जिल्ह्यातील ग्रामीण भागात टंचाई काळात पाणी पुरवठ्यासाठी लावण्यात आलेल्या टॅंकरचे नेमके ठिकाण, त्याच्या फेऱ्‍या यांची अचूक माहिती मिळावी म्हणून सर्व टॅंकर्सना जीपीएस यंत्रणा बसविण्यात येणार आहे. यासाठी जिल्हा नियोजन मंडळाच्या नाविण्यपूर्ण योजनेतून दहा लाख 62 हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी श्याम देशपांडे यांनी बुधवारी दिली.

Read More →

पाणीपुरवठा
1. टंचाईग्रस्त 15 जिल्ह्यात टँकर लावण्याचे आदेश देण्याचे अधिकार संबंधित तहसिलदार यांना देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. इतरत्र हे अधिकार उपविभागीय अधिकारी यांच्याकडे देण्यात येतील.

Read More →

मुंबई, दि. 13 : टेक्सस्टाईल पार्क संदर्भात खानदेशातील लोकप्रतिनिधींनी त्यांच्या भागातून प्रस्ताव द्यावेत त्यावर शासन विचार करील, असे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत दिले. यवतमाळ जिल्ह्यातील विदर्भ प्रभावी सिंचन विकास कार्यक्रम अंमलबजावणी संदर्भातील प्रश्न आमदार संजय राठोड यांनी विचारला होता. त्या प्रश्नाच्या चर्चेत टेक्सस्टाईल पार्क बाबत विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी प्रश्न उपस्थित केला असता उपमुख्यमंत्र्यांनी उपरोक्त आश्वासन दिले.

राज्यमंत्री गुलाबराव देवकर यांनी मूळ प्रश्नास उत्तर देताना सांगितले की, यवतमाळ जिल्ह्यात विदर्भ सधन सिंचन विकास कार्यक्रमांतर्गत 16 तालुक्यांमध्ये 17 प्रकल्प कार्यान्वित करण्यासाठी प्रस्ताव कृषी आयुक्तालय, पुणे कार्यालयास 9 डिसेंबर 2012 रोजी प्राप्त झाला. सदर 17 प्रकल्पांचे एकूण मूल्य रु. 339.50 कोटी आहे. सन 2012-13 करिता यवतमाळ जिल्ह्याला रु. 43.17 कोटीचा कार्यक्रम प्रस्तावित करण्यात आला असून सदर कार्यक्रम राबविण्यासाठी कृषी आयुक्तालय, पुणे यांचे स्तरावर 30 डिसेंबर 2012 अन्वये रु. 14.26 कोटी अनुदान जिल्ह्याला वितरित करण्यात आले. जानेवारी, 2013 अखेर सदर रु. 14.26 कोटी इतका निधी खर्च करण्यात आला आहे. अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनीही या प्रश्नाबाबत आपले मत व्यक्त केले. त्यावर उपमुख्यमंत्र्यांनी हे अधिवेशन संपण्यापूर्वी चर्चा करुन माहिती दिली जाईल, असे सांगितले. या चर्चेत आमदार सर्वश्री देवेंद्र फडणवीस, गणपतराव देशमुख, चिमणराव पाटील, नाना पटोले यांनी भाग घेतला.

Read More →

मुंबई, : आदर्श गाव योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सुधारणा समिती स्थापन करण्याचे निर्देश रोजगार हमी व जलसंधारण मंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिले. मंत्रालयात झालेल्या आदर्श गाव संकल्प व प्रकल्प राज्यस्तरीय समितीच्या आढावा बैठकीत अध्यक्षपदावरुन डॉ. राऊत बोलत होते.

Read More →