मधमाशांचा परागीभवनासाठी फायदा

सोलापूर, (मोहन काळे) ः आंब्यासह रब्बी हंगामातील पिके फुलोऱ्यात आल्यामुळे पिकांमध्ये मधमाशांचा वावर वाढला आहे. मधमाशांद्वारे होणार्या परागीभवनाचा रब्बी हंगामातील विविध पिकांना फायदा होत आहे.

रब्बी हंगामातील पिके सध्या फुलोर्यात आली आहेत. यामुळे पिके व ङ्गुलझाडांच्या ङ्गुलांवर मधमाशा मधुकन गोळा करताना दिसत आहेत. आंब्याचा मोहर, ज्वारीचा फुलोरा, मोहरी, जवस आणि करडईची फुले मधमाशांना आकर्षित करत आहेत. बांधावरील शेवग्याच्या ङ्गुलांवरही मधमाशांचे गुंजन ऐकू येत आहे.

विविध पिकांच्या फुलांवर ऐटीत बसून मधमाशा सध्या मधूकन गोळा करताना दिसत आहेत. यामुळे या पिकांच्या जवळच असलेल्या हिरव्यागर्द झाडांवर मधमाशांचे पोळे दिसू लागली आहेत. यंदा दुष्काळ असूनही मधमाशांच्या पोळ्यांची संख्या जास्त दिसत आहे.

About the author  ⁄ rahul

One Comment

  • Reply
    NARAYAN
    January 9, 2013

    विविध पिकांच्या फुलांवर ऐटीत बसून मधमाशा सध्या मधूकन गोळा करताना दिसत आहेत. मधमाशांचे गुंजन ! great news

Leave a Comment

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)