शेतकर्याला पुष्टी प्रदान करो !

कृषी संस्कृतील महत्त्वाचा असणारा एक सण म्हणजे मकर संक्रांत… सूर्याचे मकर राशीतील संक्र्रमण… तीळ-तीळ वाढणारे ऊन आणि कमी होत जाणारी थंडी हे वातावरण पिकांच्या वाढीसाठी पोषक मानले जाते. संक्रांतीच्या निमित्त्याने विविध पिकांच्या वाणांची चर्चा घडावी म्हणून महीलांमध्ये वाण देण्याची पध्दत रूढ आहे. बियाणे दर्जेदार असल्याचे कळावे म्हणून मातीच्या सुगडातून गहू, हरभरा, ज्वारी, बोर, बिबा आदी पिकांचा वानोळा दिला जात असल्याने विविध वाणांची चर्चा घडते.
वाण देण्यासोबतच तीळ आणि गुळ संक्रांतीला वाटले जातात. संक्रांत पूर्व काळात थंडी असल्याने शरीराचे स्नायु अकुंचन पावलेले असतात यामुळे स्निग्ंध पदार्थाची शरीराला गरज असते. ही गरज तीळातील स्निग्ंधतेमुळे पूर्ण होते. सोबतच गुळा सारखा पदार्थ शरीरातील उष्णता नियंत्रीत करण्याचे काम करतो. या काळात शेतात पिकणारी गहू, ज्वारी सारखी पिके शरीराला पुष्टी प्रदान करणारी असतात. यामुळे हा सण शिवाराला आणि शेतकर्याला पुष्टी प्रदान करो ही सदीच्छा !

About the author  ⁄ rahul

No Comments

Leave a Comment

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)