फळबागा वाचविण्यासाठी व्यापक अभियान – कृषि मंत्री

औरंगाबाद, दि.12 : चालू वर्षातील टंचाई सदृश परिस्थतीत राज्य शासन शेतकऱ्यांच्या हितार्थ विविध उपक्रम राबवित असतांना कृषि विभागामार्फत फळबागा वाचविण्यासाठी व्यापक अभियान राबवित येत असल्याचे प्रतिपादन राज्याचे कृ‍षि व पणन मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केले.

सिल्लोड तालुक्यातील वरखेडी शिवरात राष्ट्रीय फलोत्पादन अभियानातंर्गत गंगाधर शेनफड फलके यांच्या गटात 1 लाख 75 हजार रुपये खर्च करुन साकारण्यात येणाऱ्या सामुहिक शेततळ्याचे भूमिपूजन विधीवत पुजनाने श्री. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. याचवेळी या शेतशिवारातील 2.20 हेक्टर क्षेत्रावर लागवड करण्यात आलेल्या डाळींब फळबाग वाचविण्यासाठी ठिबक सिंचन व 40 मायक्रो प्लास्टीक कागद आच्छादनाच्या उपक्रमाची त्यांनी उपस्थित अधिकारी व मान्यवरांसह पाहणी केली.

यावेळी त्यांचेसमवेत आमदार अब्दूल सत्तार, पं.स.सभापती रेखाताई जगताप, सरपंच ज्ञानेश्वर भगत, जि.प. पदस्य श्रीराम महाजन, माजी आमदार केशवराव औताडे, कृषि आयुक्त उमाकांत दांगट, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी दत्तात्रय गायकवाड, उप विभागीय कृषि अधिकारी पी.बी.चव्हाण, तहसीलदार राहूल गायकवाड, गट विकास अधिकारी प्रकाश दाभाडे, कृषी अधिकारी उदय देवळाणकर आदी संबंधित अधिकारी व पंचक्रोशीतील शेतकरी मोठया संख्येने उपस्थित होते.

शेततळ्याच्या भूमिपूजन कार्यक्रमात बोलतांना श्री. विखे-पाटील म्हणाले की, फळबाग व कापूस उत्पादकांना भरीव मदत करण्यासाठी शासन पातळीवर प्रयत्न होत आहे. उपलब्ध पाण्याचा शेतकऱ्यांनी काटकससीने वापर करतांना फळबागात आंतरपिक म्हणून भाजीपाला पिकांचे उत्पादन घेऊन स्वत:हा उत्पादन वाढीवर भर दिल्यास कृषि विभाग त्यांना प्रोत्साहन देईल. कृषि विभाग टंचाई सदृश परिस्थितीतही उत्कृष्ठ उपक्रम राबवित आहे.

फळबागा वाचविण्यासाठी कृषि सहाय्यकांनी गांवनिहाय आढावा घेऊन महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजननतंर्गतच्या कामाचे नियोजन करावे व मागेल त्याला काम देण्याची व्यवस्था करावी. सिमेंट नाला सरळीकरणाच्या कामासाठी लागणारा काही अंशी निधी शासनस्तरावरुन उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न होत असतांना शेतकऱ्यांनीही याकामी आपले योगदान देणे आवश्यक असल्याची सूचना श्री विखे-पाटील यांनी केली.

गेवराई सिमी येथील खाजगी क्षेत्राच्या सहभागातून मका विकास कार्यक्रम प्रकल्पाच्या शेतकऱ्यांशी व विविध शेतकरी गटांशी श्री. विखे-पाटील यांनी चर्चा करतांना करार शेती पध्दतीस चालना देण्यासाठी कृषि विभाग प्राधान्य देत आहे. शेती मालाचा दर ‍िनश्चित करुन मालाची खरेदी करणाऱ्या कंपन्यांनी शेतकऱ्यांना तांत्रिक सहकार्य करण्याचा प्रयत्न करावा असेही त्यांनी यावेळी सांगितले.

सिल्लोड तालुका अवर्षण प्रवण क्षेत्रात येण्यासाठीचा पूर्न:प्रस्ताव कृषि विभागाच्या माध्यमातून शासनाकडे पाठविणे आवश्यक असल्याचे श्री. अब्दूल सत्तार यांनी यावेळी सांगून टंचाई सदृश परिस्थतीत सापडलेल्या शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी प्रत्येक शेतकऱ्यास शेततळ्याच्या माध्यमातून मदतीची मागणी मंत्रीमहोदयांकडे केली.

About the author  ⁄ admin

One Comment

  • Reply
    sanjay
    March 11, 2013

    Virodhi pakshane virodh n karta maharastra madhe padlelya duskali paristhila ek matane nirnay ghyawa.Duty.Sarpanch G P Sirsala.

Leave a Comment

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)