जळगाव (प्रतिनिधी) ः सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी जैन इरिगेशनला व्यवस्थापन क्षेत्रातील मानाचा समजला जाणारा एफएमबी अवॉर्ड २०१३ प्रदान करण्यात आला. मुंबई येथे झालेल्या एका कार्यक्रमात कनाकीया ग्रुपचे संचालक हिमांशु कनाकीया यांच्याहस्ते हा पुरस्कार जैन इरिगेशनतर्ङ्गे अविनाश जैन यांनी स्वीकारला.
गत १६ वर्षांपासून भारतातील एस.पी. जैन इन्स्टिट्युट ऑफ मॅनेजमेंट ऍण्ड रिसर्च या संस्थेतर्फे हा पुरस्कार दिला जातो. या पुरस्कारासाठी कार्पोरेट जगतातील मानांकने मागवून निवड समितीद्वारे पुरस्कारार्थींची निवड केली जाते. जैन इरिगेशनने कला, क्रीडा आणि साहित्यिक उपक्रमांसमवेत गांधी रिसर्च फाउंडेशनच्या माध्यमातून गांधी विचारांना नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याच्या कार्य केले.

No Comments