औरंगाबाद (नीलेश ठोकळे) : मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थिती पाहण्यासाठी १२ फेब्रुवारीला औरंगाबादपासून सुरुवात केली. या प्रवासाचा शेवट नुकताच पाण्याअभावी बंद पडलेल्या परळी येथील पावर स्टेशनला भेट देऊन झाला. या काळात बीड, नगर, जालना यांमधील विविध गावांना भेटी देऊन तेथील परिस्थिती जाणून घेतली आणि ती कॅमेरात साठवत गेलो. वाळलेल्या फळबागा, पाण्यासाठी लोकांची ओढाताण, जनावरांच्या घशासोबत जंगलातील वाळलेल्या झाडांची कोरड, डोळ्यापुढे येत गेली. या प्रवासाचा अनुभव एकच सांगून जातो की, पुढे येणार्या पावसाच्या पाण्याचे योग्य नियोजन करणे, हीच काळाची गरज आहे.
सर्व छायाचित्रे : नीलेश ठोकळे













No Comments