टंचाईमुळे हैवही गेले आणि दैवही गेले…

DSC_1079

जालना जिल्ह्यामधील पीरकल्याण गावातील तरुण सुशिक्षित शेतकरी विवेकानंद तुळशीराम घोलप, वय वर्षे २५ ऍनिमेशनचा कोर्स करून मुंबईला नोकरीसाठी गेला. शेतकरी घरातील मुलगा. मुंबईची धावपळ पाहून सर्व काही सोडून पुन्हा जिद्दीने शेतीकडे वळला; पण दुर्दैवाने जॉब तर गेलाच पण शेतीत आल्यानंतर पाण्याच्या अभावाने त्याच्या दहा वर्षांपूर्वी लावलेल्या मोसंबीची बाग जळताना होणारी वेदना कॅमेर्‍यात टिपण्याची वेळ माझ्यावर आली.
विवेकानंदच्या सात एकर मोसंबीच्या बागेत तीनशे झाडे आहेत. तसेच आई-वडील आणि भाऊ यांच्या दहा एकर शेतात सहाशे झाडे आहेत. असे एकूण नऊशे झाडे जवळपास १७ एकरमध्ये होती. त्यापैकी सहाशे झाडे आज पाण्याअभावी पूर्णतः जळून गेली आहेत. वार्षिक चार ते सहा लाखांचे नुकसान झाल्याने घोलप परिवाराची परिस्थिती अत्यंत बिकट झाली आहे.

DSC_1079

एवढी मोठी रक्कम मिळवून देणारी झाडे तोडल्यानंतर सरपणासाठी विकली असता ८० ते १०० रुपये प्रत्येक झाडाला मिळतात आणि बाग वाढवण्यासाठी पंधरा ते वीस वर्षांची मेहनत वाया जाते ती वेगळीच. उद्भवलेल्या अस्मानी संकटाला न डगमगता तीनशे झाड वाचवण्यासाठी जिद्द घोलप परिवाराची चालू असून येणार्‍या पावसाची वाट पाहणे एवढेच विवेकानंदच्या हातात आहे.

- नीलेश ठोकळे

About the author  ⁄ kanak

One Comment

  • Reply
    Sagar
    February 21, 2013

    सौर ऊजेवर चालनाय्रा पंपाबदल माहिती द्या.

Leave a Comment

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)