‘आधुनिक किसान’च्या अंकाची विधिमंडळात दखल

औरंगाबाद, दि. १२ (टिम आधुनिक किसान) ः शेतीचा पाणीपुरवठा बंद करून जायकवाडीतील लाखो लिटर पाणी दारू कंपन्यांना दिले जाते असल्याची स्पेशल स्टोरी सा. आधुनिक किसान मध्ये (५४ व्या) अंकातमांडली होती. हा अंक विरोधी पक्ष नेते विनोद तावडे यांना दिल्यावर याची दखल घेत मंगळवारी (दि. १२) झालेल्या विधानसभेच्या कामकाजात तावडे यांनी हा मुद्दा उपस्थित करत सरकारला जाब विचारला आहे.

प्रशासनाने पिण्यासाठी पाणी राखीव ठेवण्याचे नाटक करत दारू कंपन्यांना जायकवाडीचे पाणी दिल्याचे वृत्त सर्वात अगोदर सा. आधुनिक किसान मध्ये देण्यात आले होते. जायकवाडीच्या पाण्यावर अवलंबून असणार्या शेतकर्यांचा पाणीपुरवठा प्रशासनाने बंद केला होता. शेतकर्यांची बाजू परखडपणे मांडल्यानंतर शेतकर्यांना पाणी देण्याचे प्रशासनाने मान्य केले.

राज्यात दुष्काळाची परिस्थिती असताना शासन पिण्याचे पाणी दारू कंपन्यांसाठी उपलब्ध करून देत असल्याचा आरोप विनोद तावडे यांनी केला आहे. शासन दुष्काळग्रस्त जनतेची एक प्रकारे कृ्ररचेष्ठा करत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. दुष्काळी योजनांमध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याचाही आरोप तावडे यांनी केला आहे. चारा घोटाळा, टँकर घोटाळ्यातून अनेक सरकारी कर्मचारी, राजकीय नेते पैसा ओरबाडत असल्याचा त्यांचा आरोप आहे. दुष्काळाच्या या परिस्थितीत देखील बियर कंपन्यांचा पाणी पुरवठा कमी करण्याऐवजी वाढविला असल्याचे तावडे यांनी स्पष्ट केले.

दारू कंपन्यांना होणार पाणीपुरवठा

मिलेनिअम बिअर इंडिया लि.
जानेवारी २०१२ मध्ये या कंपनीला १२ हजार ८८० दशलक्ष लिटर पाणी दिले जायचे. नोव्हेंबरपर्यंत हा पुरवठा २२ हजार १४० दशलक्ष लिटर इतका वाढवण्यात आला आहे.

औरंगाबाद ब्रिव्हरीज
जानेवारी २०१२ मध्ये १४ हजार ००३ दशलक्ष लिटर पाणी दिले जायचे आज या कंपनीला १४ हजार ६२१ दशलक्ष लीटर पाणीपुरवठा होत आहे.
फोस्टर इंडिया लि.
या कंपनीला आधी ८ हजार ८८७ दशलक्ष लिटर पाणीपुरवठा व्हायचा, सध्या तो १० हजार मिलियन लिटरवर पोहोचला आहे.

इंडो-युरोपियन बेव्हरीज
या कंपनीला आधी २ हजार ५२१ दशलक्ष लीटर पाणी पुरवठा व्हायचा, आता तो ४ हजार ७०१ दसलक्ष लिटरपर्यंत वाढला आहे.

About the author  ⁄ rahul

No Comments

Leave a Comment

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)