जालना : जिल्ह्यातील ग्रामीण भागात टंचाई काळात पाणी पुरवठ्यासाठी लावण्यात आलेल्या टॅंकरचे नेमके ठिकाण, त्याच्या फेऱ्या यांची अचूक माहिती मिळावी म्हणून सर्व टॅंकर्सना जीपीएस यंत्रणा बसविण्यात येणार आहे. यासाठी जिल्हा नियोजन मंडळाच्या नाविण्यपूर्ण योजनेतून दहा लाख 62 हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी श्याम देशपांडे यांनी बुधवारी दिली.
याबरोबरच ग्रामीण भागातील विंधन विहिरींच्या दुरुस्तीसाठी वाहनांची अडचण निर्माण होऊ नये म्हणून एक वाहन घेण्यासाठी जिल्हा परिषदेस चार लाख 48 हजार रुपयांचा निधी देण्यात आला आहे. तर, टंचाई निवारणार्थ विशेष बाब म्हणून वाहनासह दहा टॅंकर खरेदी करण्यासाठी एकशे तेहतीस लाख ऐंशी हजार रुपये जिल्हा परिषदेला देण्यात आले आहेत, असेही श्री.देशपांडे यांनी सांगितले.

No Comments