मुंबई : (प्रतिनिधी) उच्च व तंत्र शिक्षण विभागाने सन 2012-13 चे सावित्रीबाई फुले पुरस्कार जाहीर केले आहेत.ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांनी महिला शिक्षण, शेतकरी, शेतमजूर तसेच दलित, पीडित व शोषित जनतेसाठी केलेले महान कार्य नेटाने पुढे नेणाऱ्या आणि त्याकरिता समर्पित जीवन जगणाऱ्या महिलांना प्रत्येक वर्षी हा पुरस्कार देऊन गौरविण्यात येते.
सावित्रीबाई फुले पुरस्कारासाठी विभागनिहाय निवड झालेल्या महिलांची नावे अनुक्रमे पुढीलप्रमाणे आहेत.
कोकण विभाग- श्रीमती उर्मिला श्रीपाद करमरकर, मु.पो.बोर्डी, ता.डहाणू, जि.ठाणे;
पुणे विभाग- श्रीमती श्रृती श्रीकांत नाझिरकर, रा.पुणे.
नाशिक विभाग- श्रीमती शालिनीताई विखे पाटील, रा.लोणी (खुर्द), ता.राहता, जि.अहमदनगर
औरंगाबाद विभाग- श्रीमती अनिता इंद्र ओस्तवाल,जि.परभणी;
अमरावती विभाग- श्रीमती लता प्रल्हाद उपलेंचवार, रा.हर्सुल, ता.दिग्रस, जि.यवतमाळ;
नागपूर विभाग- श्रीमती वेणुताई ज्ञानेश्वर ढवगावे, रा.मु. आरमोरी, ता.जि. गडचिरोली.

No Comments