कांदा चाळींचे थकीत अनुदान देणार

नाशिक ( अतुल भांबरे) ः शेतकर्यांना कांदा चाळींचे थकलेले अनुदान एप्रिल महिन्यापर्यंत देण्यात येईल असे आश्वासन कृषी विभागाचे मुख्य सचिव सुधीरकुमार गोयल यांनी दिले. चितेगाव फाटा येथील राष्ट्रीय फलोत्पादन संशोधन आणि विकास प्रतिष्ठानतर्ङ्गे कांद्याचे अतिरिक्त उत्पादन आणि त्याचे नियोजन या विषयावर दोन दिवशीय राष्ट्रीय चर्चा सत्राचे रविवारी उद्घाटन झाले. यावेळी गोयल मार्गदर्शन करताना बोलत होते.

जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकर्यांनी कांद्याचा स्वतःचा असा एक ब्रॅन्ड निर्माण करावा. दलालांची मध्यस्ती काढून थेट शेतकरी ते ग्राहक अशी संकल्पना राबून बघावी त्यातून दोन पेशांचा नकीच फायदा शेतकर्यांना होईल. शेतकर्यांना कांद्यात तोटा होऊ नये यासाठी छोटी छोटी कांदा प्रक्रिया केंद्र उभारण्यात येतील त्यासाठीचा निधी देण्यात येईल. शेतकर्यांनी मात्र, त्यासाठी लागणार्या पांढर्या कांद्याची लागवड करावी असे गोयल यांनी स्पष्ट केले.

गोयल पुढे म्हणाले की, कांदा उत्पादना बाबत परिपूर्ण माहिती मिळत नसल्याने आकडे वारीत घोळ होत आहे. यामुळे शेतकर्यांनी कांदा उत्पादनाची माहिती एनएचआरडीएफ च्या अधिकार्यांना मोबाईल वरून एस एम एस करून द्यावी. यामुळे एसएमएस करून कांद्याची लागवड स्तिती कायआहे व आपण काय करायला हवे हे सांगितलं जाईल. शेतकर्यांनी लाल व रांगड्या कांद्याच्या मागे न लागता सफेद कांदा घेण्यासाठी शेतकर्यांनी पुढाकार घेतला पाहिजे रिलायंस फूडवल्ड या कंपन्यांसाठी व्यापारी कांदा पुरवठा करतात मात्र व्यापार्यान एवजी शेतकर्यांनी थेट पुरवठा करावा असे सांगितले.

या वेळी अपेडाचे पश्चिम विभागाचे उपसंचालक डॉ सुधांशू म्हणाले शेतकर्यांनी निर्यातीसाठी आपल्या मागण्या आमच्याकडे पाठवाव्यात म्हणजे त्यानुसार अपेडा ब्लू प्रिंट तयार करेल. या वेळी चांगदेवराव होळकर डॉ. किशोर तोष्णीवाल डॉ. आर. पी. गुप्ता डॉ. सतीश भोंडे, डी. जी. काळाने, मधुकर पन्हाळे, पी. के. गुप्ता, एच. पी. शर्मा आदी उपस्थिती होते. सूत्रसंचालन रुपाली देशमुख यांनी केले.

About the author  ⁄ rahul

No Comments

Leave a Comment

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)