केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी बारामती तालुक्यातील काटेवाडी परिसरात पन्नास वर्षांपूर्वी जलसंधारणासाठी प्रकल्प राबविला होता, त्या प्रयत्नांना उजाळा…जलसंधारणाच्या कामांपूर्वी काटेवाडी परिसरात पाण्याचा प्रश्न गंभीर होता. पाण्याची समस्या सोडविण्यासाठी जलसंधारणाच्या कामी लोकसहभाग हा महत्त्वाचा होता. यासाठी शरद पवार यांनी पुढाकार घेऊन आसपासच्या गावांतील जवळपास एक लाख स्वयंसेवकांची टीम तयार केली. वर्ष १९६७ मध्ये जलसंधारणाच्या या कामाला सुरवात झाली. परिसराचे सर्वेक्षण करण्यात आले. वाहून जाणारे पाणी जमिनीत मुरावे यासाठी पाझर तलाव आणि बंधारे बांधण्यात आले. एक वर्षात हा प्रकल्प पूर्ण करण्याचा निर्धार करण्यात आला होता आणि त्यासाठी दीड लाख रुपये इतका अंदाजे खर्च झाला. …
Read More →