नाशिक (प्रतिनिधी) ः माध्यमांनी शेती क्षेत्राकडे सकारात्मक दृष्टीकोनातून बघावे असा सुरू नाशिक येथे संपन्न झालेल्या पहिल्या अखिल भारतीय कृषी साहित्य संमेलनाच्या परिसंवादात उमटला. कृषीक्षेत्राशी निगडीत चांगल्या वृत्ताला प्रसारमाध्यमात स्थान मिळत नाही. याउलट नकारत्मक गोष्टी या अधिक प्रखरतेने मांडल्या जातात. शेतीशी संबंधित लोकांचीही जाणीवपुर्वक उपेक्षा होत असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आल्या.

Read More →

औरंगाबाद (टीम आधुनिक किसान ) : एका बाजूला पाण्याअभावी शेती व्यवसाय धोक्यात आला असताना दुसर्‍या बाजूला दारूसह विविध कंपन्यांना संरक्षित प्रकल्पातून दररोज लाखो लिटर पाणी दिले जात आहे. यासंदर्भातील विशेष वृत्त साप्ताहिक आधुनिक किसानच्या ताज्या (अंक क्रमांक ५४) अंकात प्रसिद्ध केले आहे. वाया जाणारे हे पाण्याचे पुढे काय होते? यासंदर्भातील माहिती घेण्याचा हा प्रयत्न.

Read More →

औरंगाबाद, (राहुल कुलकर्णी) ः मराठवाड्यातील पाणीटंचाईमुळे ङ्गळबागा वाचविण्यासाठी शेतकर्यांनी कमी खर्चात होणार्या कमी जाडीच्या प्लॅस्टिक मल्चिंग पेपरचा वापर केला आहे. यासाठी शासनाने अनुदान द्यावे, अशी शेतकर्यांची मागणी होती. सर्वात अगोदर सा.‘आधुनिक किसान’ ने आडूळ (ता पैठण जि. औरंगाबाद) परिसरातील शेतकर्यांनी कमी खर्चात केलेल्या मल्चिंगचे प्रयोग आणि कमी जाडीच्या पेपरसाठी अनुदान द्यावे ही मागणी प्रभावीपणे मांडली होती. टंचाईच्या स्थितीत ङ्गळबागांना मल्चिंग उपयुक्त असल्याबाबत गेल्या काही अंकातून विविध विषय देखील मांडले आहेत. याची दखल घेत प्रशासनाने कमी जाडीच्या मल्चिंग पेपरसाठी अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे.

Read More →

केंद्राकडे आणखी मदतीची मागणी

औरंगाबाद, दि. ३१ (प्रतिनिधी) ः राज्यातील रब्बी हंगामातील शेतकर्यांचे नुकसान लक्षात घेऊन केंद्र शासनाकडे आणखी मदतीसाठी पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांची वार्षिक अर्थसंकल्पीय प्रारूप आराखडा बैठक विभागीय आयुक्त कार्यालयात गुरूवारी (दि.३१) पार पडली.

Read More →

औरंगाबाद, दि.28 : औरंगाबाद जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार जिल्हाधिकारी विक्रम कुमार यांनी सोमवारी प्रभारी जिल्हाधिकारी किसनराव लवांडे यांचेकडून स्विकारला. यावेळी किसनराव लंवाडे यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

Read More →

मुंबई, दि. २३ : आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत, राज्यात अपुऱ्या पावसामुळे उद्भवलेल्या टंचाई परिस्थितीवर सविस्तर चर्चा करण्यात आली . राज्यातील टंचाई परिस्थितीत पाणी पुरवठा योजनांकरिता आतापर्यंत 413 कोटी 98 लाख रुपयांचा निधी पाणी पुरवठा विभागास वितरित करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री श्री.पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली. ही संख्या वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन पुरेशा टँकरची व्यवस्था करण्याचे आदेश जिल्हाधिका-यांना देण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

Read More →

सिंचन घोटाळ्यांच्या आरोपांमुळे उपमुख्यमंत्रीपदाचा दिलेले अजित पवार यांनी आज राज्य मंत्रिमंडळात पुन्हा उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. राज्यपाल के. शंकरनारायणन यांनी त्यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली.
राजभवनावर सकाळी ९.३0 वाजता शपथविधी सोहळा पार पडला. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, राष्ट्रवादीचे मंत्री आणि पवार यांचे कुटुंबीय या सोहळ्याला उपस्थित होते. भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांनी मात्र, या शपथविधी कार्यक्रमावर बहिष्कार घातला.

Read More →