‘कावेरी सीड्स’ कंपनीने कापसाच्या जादू, जॅकपॉट, एटीएम या सुधारित जाती बाजारात उपलब्ध केल्या आहेत. सुधारित तंत्रज्ञान व गुणवत्ता यांचा मेळ साधून शेतकर्यांना दर्जेदार बियाणे पुरविण्यावर ‘कावेरी सीड्स’चा भर आहे. बी. टी. कपाशीच्या बियाणे विक्रीबाबत ही कंपनी आघाडीवर आहे. १९७६ साली आंध्र प्रदेशातील सिकंदराबाद येथे जी. व्ही. भास्करराव यांनी या कंपनीची स्थापना केली. गेल्या तीन-चार वर्षांत कंपनीने नेत्रदीपक प्रगती केली असून, शेतकर्यांच्या गरजेनुसार बियाण्यांच्या विविध जाती, दर्जेदार बियाणे व विक्रीपश्चात सेवांमुळे शेतकर्यांमध्ये ‘कावेरी सीड्स’चे विविध वाण लोकप्रिय आहेत, असे कंपनीचे व्यवस्थापक (व्यवसाय) गजानन जाधव यांनी सांगितले.

Read More →

‘चंबल फगर्टिलाईजर्स’ तर्फे लांझी ( ता. गंगापूर जि. औरंगाबाद) येथे ऊस पीक परिसंवादा चे सोमवारी (ता. १०) आयोजन करण्यात आले होते. कृषी शिक्षण विस्तार केंद्राचे डॉ. एस. बी. पवार आणि मुक्तेश्वर साखर कारखान्याचे कृषी व्यवस्थापक शिवाजी जंजीरे यांनी मार्गदर्शन केले.

Read More →

पंप, व्हॉल्व्ह आणि इतर संबंधित प्रणालींचे अग्रगण्य जागतिक उत्पादक असलेल्या पुणे-स्थित केएसबी पंप्स लि. यांनी फार खोल नसलेल्या विहिरींवर वापरण्याच्या मोनोब्लॉक पंपसेटचे सेंट्रिजेट या नावाचे एक नवीन मॉडेल बाजारपेठेत आणले आहे. या आधीच्या हायड्रोब्लॉक आणि सेंट्रिब्लॉक या एका व तीन फेजवर चालणा-या यशस्वी मॉडेल्सच्या पाठोपाठच हे मॉडेल दाखल झाले आहे.

Read More →

जैन इरिगेशनचे संस्थापक अध्यक्ष भवरलाल जैन यांनी उद्योगाच्या माध्यमातून दिलेल्या सामाजिक योगदानाला अधोरेखीत करीत फोर्ब्ज इंडिया मॅगेझीनने अत्यंत प्रतिष्ठेचा ‘गुड कंपनी अवॉर्ड’ प्रदान केला आहे. ‘इन्फोसिस’चे मुख्य कार्यकारी अधिकारी एस.डी. शिबूलाल यांनी हा पुरस्कार भवरलाल जैन यांना बंगळूर येथे झालेल्या एका कार्यक्रमात दिला.

Read More →

अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर येथील गणेश इंजिनियरिंग वर्क्सने बैलजोडी; तसेच ट्रॅक्टरद्वारेे फवारणी करता येणारे स्वयंचलित फवारणी यंत्र विकसित केले आहे. या यंत्राला कृष्णा पॉवर स्प्रे म्हणून नाव दिले आहे. या यंत्राद्वारे एका दिवसात ३० ते ३५ एकर फवारणी करता येते. एक लिटर केरोसीनमध्ये ८ ते १० एकर फवारणी करण्याची क्षमता या यंत्राची आहे.

Read More →

पशुपालनाचा व्यवसाय करणार्‍यांसाठी दिल्ली येथील इंडियन डेअरी इक्वीपमेंट कंपनीने नुकतेच स्टेनलेस स्टीलचे दुधाचे कॅन बाजारात उपलब्ध केले आहे. हे कॅन ५, १०, २०, ४०, व ५० लिटर या आकारात उपलब्ध आहे. कॅनच्या निर्मितीसाठी आयएसआय टे्रडमार्क असलेले ३०४ व ३०२ स्टेनलेस स्टीलचा वापर केला आहे. प्लॅस्टिक व ऍल्युमिनियम या प्रकारात देखील या कंपनीचे कॅन उपलब्ध आहेत. *

Read More →