सोलापूर,(मोहन काळे) ता.8 : आधुनिक शेतकरी बनायचा असेल तर शेतकर्‍यांचे गट निर्माण करावेत, असे आवाहन राज्याचे कृषी व पणन विभागाचे अप्पर मुख्य सचिव डॉ. सुधीरकुमार गोयल यांनी भोसे (ता.पंढरपूर,जि.सोलापूर) येथे केले. ते विठ्ठल शेतकरी बचत गटाने सुरू केलेल्या बेदाणा प्रोसेसिंग युनिटच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. यावेळी त्यांनी बँकांनी जास्त अटी न लावता लहान शेतकर्‍यांनाही कर्जे देण्याचे आवाहन करून विठ्ठल शेतकरी बचत गट हा महाराष्ट्रात आदर्श ठरावा असाच असल्याचे सांगितले.

Read More →

सोलापूर (मोहन काळे) ः जिल्ह्यातील बहुतांश द्राक्ष बागा सध्या डिप्लोडिया रोगाला बळी पडल्याने यावर्षीच्या द्राक्ष उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Read More →

अहमदनगर : जिल्ह्यातील संगमनेर व अकोले तालुक्यांत सोमवारी दुपारी गारपीट झाली. सोसाट्याच्या वार्‍यासह आलेल्या पावसामुळे गहू, हरबरा या पिकांसह रब्बी पिकांचे मोठे नुकसान झाले. तसेच, द्राक्ष, कांदा या पिकांनाही जबरदस्त तडाखा बसला.

Read More →

अतुल भांबेरे : जिल्ह्यात थंडी वाढल्याने द्राक्ष पिकावर त्याचा परिणाम होतो आहे. यंदा थंडीचे आगमन लवकर व अधिक प्रमाणात झाले आहे. गुलाबी थंडीचे वाढते प्रमाण रब्बीच्या पिकांसाठी फायदेशीर असले तरी द्राक्ष उतपादाकांची चिंता वाढवत आहे.वाढत्या थंडीमुळे द्राक्षाच्या फुगवणीवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. परिपक्व द्राक्ष मण्यांना या थंडी मुळे तडे जाण्याचा धोका संभवतो आहे. तापमान असेच काही दिवस नीचांकी राहिले तर मोठ्या प्रमाणावर द्राक्ष उतपादनात घट होण्याची शक्यता आहे.

Read More →

अतुल भांबेरे/नाशिक
नाशिक, ता, २९ : महाराष्ट्राचा कॅलिफोर्निया म्हणून परिचित असा सुजलाम सुफलाम असलेला तालुका निफाड तालुक्याची ख्याती आहे. द्राक्ष बागांचा तालुका असलेल्या या गावाला अस्मानी संकटाने ग्रासल्याने येथील द्राक्ष उतपादक हैराण झाले आहेत. गेल्या तीन चार दिवसांपासून थंडीची हुडहुडी जास्त प्रमाणात जाणवू लागल्याने द्राक्ष पिकावर त्याचा परिणाम होतो आहे.

Read More →

औरंगाबाद, ता. २७ : गेल्या दोन दिवसांपासून तापमानात बदल होत असून नाशिक व परिसरातील तपमानाची ४ डिग्री सेल्सियसपर्यंत नोंद झाली आहे. दिवसाचे तापमान तीन ते चार तास २० ते २५ अंश सेल्सिअस राहिले तर द्राक्षबागेत ‘भुरी’ वेगाने वाढते.

Read More →

ऑनलाईन रिपोर्टर/आधुनिक किसान
नाशिक : पिंपळगांव बसवंत परिसरातील द्राक्ष उत्पादक शेतकर्‍यांपैकी शरद सीडलेस, सोनाका ब्लॅक अशा काळ्या रंगाच्या जातीचे उत्पादन घेणार्‍या शेतकर्‍यांनी द्राक्ष काढणीला सुरवात केली असून डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात नाशिकची काळी द्राक्षेबाजारपेठांमध्येदाखल होणार आहे. पिंपळगांव परिसरातीलच तरुण शेतकरी प्रवीण ठाकरे यांचा शरद सीडलेस जातीच्या द्राक्षांचा पलॉटही तयार झाला असून त्याची कटींग त्यांनी ८ ऑगस्ट २०१२ रोजी केली होती.

Read More →