औरंगाबाद (प्रतिनिधी):- दुष्काळातील फळबागांच्या नियोजनासाठी येथील कृषी विज्ञान केंद्रात शनिवारी (ता. ३०) शेतकरी शास्त्रज्ञ मंचाचे आत्मा आणि मराठवाडा कृषी विद्यापीठातर्फे आयोजन करण्यात आले. यावेळी आत्मा चे प्रकल्प उपसंचालक सतीश शिरडकर आणि मोसंबी संशोधन केंद्र, बदनापूर येथील शास्त्रज्ञ डॉ. एम. बी पाटील यांनी शेतकर्‍यांना पुढीलप्रमाणे सल्ला दिला.

Read More →

औरंगाबाद (प्रतिनिधी), ता. २६ : मराठवाड्यातील दुष्काळामुळे जवळपास एक लाख एकर पेक्षा जास्त मोसंबीच्या बागांचे ९० हजार कोटी रुपयांपेक्षाही जास्त नुकसान झाले आहे. मात्र असे असतानाही शासनाचे मोसंबी उत्पादकांकडे दुर्लक्ष होत असल्याने आज दि.२६ रोजी होळीनिमित्त येथील क्रांती चौकात मोसंबी उत्पादकांकडू मोसंबीच्या झाडांची शासनाच्या निषेधार्थ होळी करण्यात आली.

Read More →

औरंगाबाद, दि.12 : चालू वर्षातील टंचाई सदृश परिस्थतीत राज्य शासन शेतकऱ्यांच्या हितार्थ विविध उपक्रम राबवित असतांना कृषि विभागामार्फत फळबागा वाचविण्यासाठी व्यापक अभियान राबवित येत असल्याचे प्रतिपादन राज्याचे कृ‍षि व पणन मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केले.

Read More →

बीड, दि. 12 :- टंचाईग्रस्त भागातील जनतेच्या पाठीशी राज्य शासन ठामपणे उभे असून टंचाईवरील उपाययोजनांना कोणत्याही परिस्थितीत पैसा कमी पडणार नाही अशी ग्वाही मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली.

Read More →

मुंबई, दि. 17 : फूलकिडे (थ्रिप्स) यासारख्या रोग व वातावरणाच्या अनिश्चिततेमुळे ठाणे, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या चार जिल्ह्यातील 2011-12 या वर्षा मधील आंबा पिकाच्या नुकसान भरपाईकरिता शेतकऱ्यांना एक विशेष बाब म्हणून अर्थसहाय देण्यास शासनाने मान्यता दिली आहे.

Read More →

राज्यात मोठ्या प्रमाणावर फळबाग लागवड करण्यात आलेली आहे. यावर्षी कमी पर्जन्यमानामुळे दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. कमी-अधिक प्रमाणात सगळीकडे पाणीटंचाई जाणवू लागली आहे. अशा परिस्थितीमध्ये फळबागा वाचविण्यासाठी काय उपाययोजना करता येतील, याचा प्रामुख्याने विचार करणे गरजेचे आहे. अवर्षण काळात शेतातील उभी पिके वाचविणे हा एक भाग आणि उत्पादन घेणे हा दुसरा भाग महत्त्वाचा असतो. वाढलेली उष्णता व घटलेली आर्द्रता यांमुळे पिकांची वाढ खुंटते. परिणामी उत्पादन व गुणवत्ता कमी होते. प्रतिकूल परिस्थितीत मार्ग काढण्यासाठी वा फळबागा जगविण्यासाठी खालील उपलब्ध तंत्रज्ञानाचा वापर शेतकरी बांधवांनी करणे महत्त्वाचे ठरेल.

Read More →

उस्मानाबाद.दि.18- जिल्हयासाठी द्राक्ष,केळी,व डाळिंब (हस्त बहार) या पिकासाठी प्रायोगिक तत्वावरील हवामानावर आधारीत पथदर्शक फळपिक विमा योजना लागू केलेली होती. आता या योजनेमध्ये आंबा फळपिकाचा समावेश करण्यात आला आहे. या योजने अंतर्गत सन 2012-13 हंगामात आंबा पिकासाठी विमा प्रस्ताव बँकेत भरण्याची अंतिम तारीख कर्जदार शेतकऱ्यांना व बिगर कर्जदार शेतकऱ्यांना दि. 31 डिसेंबर 2012 ही आहे. शेतकऱ्यांनी आंबा पिकासाठी 6 हजार रुपये प्रति हेक्टरी याप्रमाणे बँकेत भरुन पिक संरक्षित करावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार यांनी केले आहे.

Read More →