मुंबई, दि. 13 : टेक्सस्टाईल पार्क संदर्भात खानदेशातील लोकप्रतिनिधींनी त्यांच्या भागातून प्रस्ताव द्यावेत त्यावर शासन विचार करील, असे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत दिले. यवतमाळ जिल्ह्यातील विदर्भ प्रभावी सिंचन विकास कार्यक्रम अंमलबजावणी संदर्भातील प्रश्न आमदार संजय राठोड यांनी विचारला होता. त्या प्रश्नाच्या चर्चेत टेक्सस्टाईल पार्क बाबत विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी प्रश्न उपस्थित केला असता उपमुख्यमंत्र्यांनी उपरोक्त आश्वासन दिले.

राज्यमंत्री गुलाबराव देवकर यांनी मूळ प्रश्नास उत्तर देताना सांगितले की, यवतमाळ जिल्ह्यात विदर्भ सधन सिंचन विकास कार्यक्रमांतर्गत 16 तालुक्यांमध्ये 17 प्रकल्प कार्यान्वित करण्यासाठी प्रस्ताव कृषी आयुक्तालय, पुणे कार्यालयास 9 डिसेंबर 2012 रोजी प्राप्त झाला. सदर 17 प्रकल्पांचे एकूण मूल्य रु. 339.50 कोटी आहे. सन 2012-13 करिता यवतमाळ जिल्ह्याला रु. 43.17 कोटीचा कार्यक्रम प्रस्तावित करण्यात आला असून सदर कार्यक्रम राबविण्यासाठी कृषी आयुक्तालय, पुणे यांचे स्तरावर 30 डिसेंबर 2012 अन्वये रु. 14.26 कोटी अनुदान जिल्ह्याला वितरित करण्यात आले. जानेवारी, 2013 अखेर सदर रु. 14.26 कोटी इतका निधी खर्च करण्यात आला आहे. अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनीही या प्रश्नाबाबत आपले मत व्यक्त केले. त्यावर उपमुख्यमंत्र्यांनी हे अधिवेशन संपण्यापूर्वी चर्चा करुन माहिती दिली जाईल, असे सांगितले. या चर्चेत आमदार सर्वश्री देवेंद्र फडणवीस, गणपतराव देशमुख, चिमणराव पाटील, नाना पटोले यांनी भाग घेतला.

Read More →

यंदाच्या जलसंकटाला तोंड देण्यासाठी उपलब्ध असणार्‍या पाण्याचा अत्यंत काटकसरीने आणि कार्यकुशलतेने वापर करून पीक उत्पादन घेण्याचा आणि भविष्यात वाढणार्‍या अशा प्रकारच्या संभाव्य संकटाची तीव्रता कमी करण्याचा प्रत्येक शेतकर्‍याने गांभिर्याने विचार केला पाहिजे. ज्या शेतकर्‍यांकडे सध्या थोड्याफार प्रमाणात पाणी उपलब्ध आहे, त्यांनी आपल्या अनुभवांप्रमाणे, निवडलेल्या पीक पद्धतीप्रमाणे आणि योजलेल्या सिंचन प्रणालीप्रमाणे पुढे उल्लेख केलेल्या उपायांचा वापर केला तर त्यांच्याकडील पाण्याची पन्नास टक्क्यांपर्यंत बचत होऊन पीक उत्पादनातील कार्यक्षमता टिकून राहील. यासंदर्भात ‘आधुनिक किसान’च्या मागील काही अंकांमध्ये माहिती प्रसिद्ध झालीच आहे. पाणी बचत आणि पीक नियोजनाचे उपाय याही अंकात देत आहोत.

Read More →

अकोला ः विदर्भ प्रभावी सिंचन कार्यक्रमाअंतर्गत वाशिम जिल्ह्यातील गव्हा (ता. मानोरा) येथे सिंचनासाठी उपयुक्त वस्तुंचे वाटप करण्यात आले. यावेळी आ. प्रकाश डहाके उपस्थित होते. यात वीज मोटारी, डिझेल इंजिन आदींचा समावेश आहे.

Read More →

पुणे : यंदा अल्प प्रमाणात पाऊस झाला आहे. पिण्याच्या पाण्याबरोबरच शेतीला पाणी मिळवणे हा शेतकर्‍यांसमोरची प्रमुख समस्या आहे. दौंड तालुक्यातील वरवंड येथील शेतकर्‍यांनी गावातील ओढ्यावरच दोन साठवण तलाव बांधले आहेत. सध्या या तलावात पाणी साठले असुन पाण्याने ङ्गुगवटा धरला आहे. पाण्याविणा जगणे कठीण आहे हे येथील शेतकर्‍यांनी ओळखले होते. पाण्याचा मुबलक स्त्रोत निर्माण करुन वरवंड मधील शेतकर्‍यांनी शेतीसाठी लागणर्‍या
पाण्याची समस्येवर साठवण बंधार्‍याच्या माध्यमातुन सुटका करुन घेतली आहे.

Read More →

नागपूर, ता. १०: विदर्भात अनेक समस्यांना कंटाळून शेकडो शेतकरी आत्महत्या करीत असून शासनाने याकडे दुर्लक्ष केले आहे. एक मुख्य कारण असलेल्या सिंचनाचा अभाव असून या क्षेत्रात ३० ते ३५ हजार कोटींच्या घोटाळ्याचा ठपका उपमुख्यमंत्री अजित पवार आणि जलसंपदा मंत्री सुनील तटकरे यांचेवर ठेवण्यात आला. तटकरेंनी अद्यापही राजीनामा दिला नसून अजित पवार पुन्हा आपल्या आपल्या पदावर विराजमान झाले आहेत.

Read More →

पौराणिक आणि ऐतिहासिक पार्श्‍वभूमी लाभलेल्या रामटेकमधील कृषिजीवनदेखील बदलत आहे. चार वर्षांत तालुक्यात ८०० पेक्षा जास्त शेततळे साकारले असून, त्यामुळे पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे शेतकर्‍यांनी अतिरिक्त हंगामातील एखाद दुसरे जास्तीचे पीक घेणे सुरू केले आहे. कृषी अधिकार्‍यांचे प्रयत्न आणि शेतकर्‍यांचा सकारात्मक प्रतिसाद यातून रामटेकची शेततळ्यांतील क्रांती साकारली आहे.

Read More →

अहमदनगर ( सचिन चोभे) : मुळाचे शेतीसाठी व पिण्याच्या पाण्यासाठी आवर्तन गुरूवारपासून सोडण्याचा आदेश जलसंपदा मंत्री सुनील तटकरे यांनी दिले. तर भंडारदरा धरणातून १0 डिसेंबरपासून शेतीसाठी आवर्तन सुटणार आहे. बुधवारी मुंबईत महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या दालनात झालेल्या कालवा सल्लागार समिती बैठकीत याबाबतचा निर्णय झाला. यावेळी पालकमंत्री बबनराव पाचपुते व आमदार चंद्रशेखर घुले, यावेळी थोरात, कृषिमंत्री राधाकृष्ण विखे, आमदार शंकरराव गडाख, आमदार कांबळे, ससाणे यांच्यासह कार्यकारी अभियंता उत्तमराव निर्मळ, पाटबंधारे विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.

Read More →