सध्याचे बदलते हवामान, पाणीटंचाई लक्षात घेऊन गाव-शिवारातील पिके वाचविण्याची धडपड शेतकरी करीत आहेत. यासाठी आच्छादन (मल्चिंग) सारख्या तंत्राचा अवलंब केला जात आहे. आच्छादन म्हणजे काय, त्याचे प्रकार, आच्छादन पिके आदींबाबतची माहिती या लेखात घेऊया…

Read More →

बाजरीचा सुयोग्य काळ निघून जात आहे; परंतु यावर्षी बाजरीची उशिरापर्यंत जुलैच्या दुसर्‍या आठवड्यातही पेरणी करायला हरकत नाही. सन-२०१३ च्या उन्हाळ्यात येऊ घातलेल्या चाराटंचाईवर काही प्रमाणात याचा उपयोग होईल. शेतकर्‍यांनी आपल्याकडे असलेल्या नियोजित कापसाच्या क्षेत्रात घट करून काही क्षेत्र बाजरी (जिथं घेतली जाते तिथं) पेरावी. जिथं बाजरी येत नाही, तिथं मकासारखे पीक चारा पीक म्हणून पेरावे. हिरवा चारा, चार्‍याची पिके याचे ‘सायलेज’ करून साठवण करावी; तसेच सोयाबीनचे क्षेत्र कमी करून मध्यम ते भारी जमिनीत सूर्यफूल घ्यावे.

Read More →

थंडीची लाट कशी येते, रब्बी पिकांवर थंडीचा परिणाम कसा होत असतो, हे आपण मागील अंकात पाहिले. त्यातच आच्छादन आणि वारा प्रतिबंधकाची लागवड करावी, असे म्हटले होते. थंडीचा परिणाम फळपिकांवर कशा प्रकारे होतो आणि त्यासाठी उपाय म्हणून आच्छादन व वारा प्रतिरोधक कसे वापरावे, याची माहिती या लेखात आपण घेऊया.

Read More →

jaybhayeभारतीय हवामान विभाग गेल्या दीडशे वर्षांपासून हवामान अंदाज वर्तविण्याचे काम करीत आहे. गेल्या तीस वर्षांपासून भारतीय स्तरावर वैज्ञानिक पद्धतीने पावसाचा अंदाज देत आहे. या विभागाने आजपर्यंत कधीही कमी पाऊस पडण्याचा अंदाज वर्तविलेला नाही, हे विशेष. आपल्याकडे निरीक्षण घेण्याचे जाळे दाट नाही. दुसरे म्हणजे उष्ण कटिबंधीय व विषुववृत्तीय कटिबंधातील वातावरणाच्या वरच्या थरात क्षणाक्षणाला सारखे बदल घडत असतात.या बदलांच्या गतकालीन नोंदीही (डाटा बँक) अपुर्‍या आहेत.

Read More →

jaybhayeहवामानविषयक उपलब्ध माहितीवर आधारित नियोजनबद्ध वापर करून शेतीत बदल करण्याची माहिती शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवून शेती शाश्‍वतता व शेतकर्‍यांची सुरक्षितता वाढविण्याचे काम कृषी हवामानशास्त्र अद्यापही करू शकले नाही. यावर उपाय म्हणून कृषी हवामानशास्त्र विद्याशाखा बळकट करणे अत्यावश्यक आहे.

Read More →

मागील लेखात आपण हिवाळ्याची तीव्रता, तीव्रतेचे मोजमाप कसे करावे, तसेच पिकांचे व्यवस्थापन कसे करावे, याविषयी माहिती घेतली. थंडीची लाट कशी येते, या लाटेचा पिकांवर काय परिणाम होतो व पिके वाचविण्यासाठी कोणती उपाययोजना करावी, याबाबत या लेखात जाणून घेऊया.

Read More →