नांदेड(प्रतिनिधी)- शेतकर्‍यांना दरमहा २ हजार रुपये पेन्शन द्यावे, शेतकरी कल्याण मंत्रालय स्थापन करावे, अशी मागणी राष्ट्रीय किसान दिनी करण्यात आली. या व इतर प्रमुख मागण्यांबाबत शासनाकडे पाठपुरावा करण्यासाठी ‘किसान बिरादरी’ मंच स्थापन करण्यात आला आहे.

Read More →

पाऊसमान कमी झाल्यामुळे अनेक ठिकाणी चारा आणि पाणीटंचाई निर्माण झालीय. पशुपालकांना जनावरे सांभाळणे अवघड बनलेय. त्यामुळे अनेकांनी त्यांना बाजार दाखवायचा पर्याय निवडला आहे. ज्या तालुक्यांमध्ये राज्य शासनाने दुष्काळ जाहीर केलाय, तिथे चारा पिकांची लागवड करण्याकडे भर देण्यात येणार आहे. पण तसे करण्यासाठी शेतकर्‍यांपुढे पाणी आणि जमिनीच्या अडचणी आहेत. शिवाय इतके करूनही चारा पिके उगवण्यास किमान दोन महिन्यांचा तरी अवधी लागणार आहे. पण आधुनिक तंत्रज्ञानाच्या साह्याने कमी जागेत, कमी पाण्यात आठ दिवसात चारा तयार करता येतो. मोठ्या प्रमाणावर दुध-दुभते असणार्‍या शेतकर्‍यांना हा पर्याय अगदी उपयोगी आहे.

Read More →

भूजलपातळी झपाट्याने खालावत चालल्याबद्दल भूजल  सर्वेक्षण संस्थेने धोक्याचा इशारा दिला आहे. भूजल कमी होण्यामध्ये बोअरिंग तंत्रज्ञान आणि स्पर्धेपोटी वाढणार्‍या बोअरवेल्स, हेही महत्त्वाचे कारण आहे. आपल्याकडे बोअर पाहिजे असे शेतकर्‍यांना वाटणारच, पण पाणीपातळीच घटली, तर शेवटी शेतीचेच नुकसान होणार. कोरडवाहू शेतकर्‍यांनी तर भूजलपातळी जपलीच पाहिजे. कारण तीच खरी लेट खरीप आणि रब्बी पिकांची लाइफलाइन आहे. मात्र, जमिनीतील पाणी सर्रास न उपसता पावसाच्या पाण्याचे योग्य जलसंधारण केले, तर या समस्येवर वेळीच तोडगा शक्य आहे.

Read More →

पुणे : मोशी येथे सुरू असलेल्या किसान प्रदर्शनातील स्टॉल क्रमांक ४५५ – ए, म्हणजेच ‘आधुनिक किसान’चा स्टॉल गेल्या दोन दिवसांपासून येथेशेतकर्‍यांसह विविध क्षेत्रातील मान्यवरांची भरभरून गर्दी होत असून विशेषत: विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकर्‍यांनी ‘साप्ताहिक आधुनिक किसान’ला मोठा प्रतिसाद दिला आहे.

Read More →

पुणे ( विशाल केदारी ) : मजूर टंचाईच्या वाढत्या समस्येमुळे किसान प्रदर्शनाच्या दुसर्या दिवशी यांत्रिकरणाच्या स्टॉलवर शेतकर्यांची गर्दी वाढली आहे. फोगर्स इंडियाच्या वतीने दोनशे रुपयांपासून फवारणी यंत्र प्रदर्शनात सादर करण्यात आले आहे. या स्टॉलवर शेतकर्यांनी गर्दी केली होती. पडगीलवार कंपनीच्या वतीने चारा बनवण्याचे यंत्र या प्रदर्शनात ठेवण्यात आले आहे.

Read More →

(योगेश थोरात/राहुल कुलकर्णी)
औरंगाबाद : आगामी काळात वाढत्या लोकसंख्येची भूक भागविण्यासाठी आणि दारिद्य्र कमी करण्यासाठी पीक उत्पादन वाढविणार्‍या जीएम तंत्रज्ञानाची एकविसाव्या शतकामधील कृषीशास्त्राला गरज आहे; परंतु भारतासारख्याच कृषीप्रधान देशात पर्यावरणाच्या नावाखाली होणारा विरोध निराधार आहे, असे मत यु. के. च्या नॉर्मन बोरलॉग जागतिक अन्न सुर संस्थेचे संस्थापक संचालक डॉ. माल्कम एलिएट यांनी औरंगाबाद येथे सुरू असलेल्या बेजो शीतल बायोसायन्स फाऊंडेशन आयोजित जागतिक ऍग्रीटेक कृषी परिषद २०१२ मध्ये व्यक्त केले.

Read More →

औरंगाबाद येथे मराठवाडा शेती साहाय्य मंडळ आणि शासनाच्या कृषी विभागातर्फे महाऍग्रो-२०१२ या राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाचे २२ डिसेंबर रोजी आयोजन करण्यात आले आहे.

Read More →