औरंगाबाद येथे मराठवाडा शेती साहाय्य मंडळ आणि शासनाच्या कृषी-पणन विभागातर्ङ्गे आयोजित महाऍग्रो-२०१२ या राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाचा समारोप २५ डिसेंबर रोजी झाला. अध्यक्षस्थानी ग्रीन गोल्ड सीडस चे अध्यक्ष मधुकरअण्णा मुळे यांची तर, जलतज्ज्ञ डॉ. वर्हाडे यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती.
यावेळी बोलताना डॉ. वर्हाडे म्हणाले की, पाणी टंचाई लक्षात घेता पाण्याची उपलब्धता लक्षात घेऊन पिकाची निवड करावी. उपलब्ध पाण्याचे बाष्पीभवन रोखण्यासाठी उपाययोजना कराव्यात. दिसेंदिवस जमिनीचे आरोग बिघडत चालले असून उन्नतीकरणासाठी जमिनीचा वापर करतना भविष्यासाठी जमीन राखून ठेवणे गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
अध्यक्षीय समारोपात मधुकरअण्णा मुळे म्हणाले की, कृषी प्रदर्शातून शेतकर्यांना प्रेरणा मिळते तेव्हा अशी प्रदर्शने उपयुुक्त आहे. आ. सतीश चव्हाण म्हणाले की, रोजगार हमीचे कामे ही शेतकर्यांसाठी उपयोगी ठरावीत. शेतकर्यांच्या मुलांना सवलती मिळाव्या अशी मागणी आपण मंत्रीमंडाळोडे केली आहे.
जिल्हा कृषी अधिक्षक डी. आय गायकवाड यांनी दुष्काळी परिस्थितीत ङ्गळबागा जगविण्यासाठीच्या उपाययोजना विषद केल्या. यावेळी विचामंचावर विजयअण्णा बोराडे, द्धारकाभाऊ पाथ्रीकर, त्रिंबकराव पाथ्रीकर, आदींची उपस्थिती होती.
या प्रदशर्र्नात सा. आधुनिक किसान स्टॉलला शेतकर्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला. प्रदर्शनात नामवंत कृषी अवजारे आणि बियाणे कंपन्या सहभागी झाल्या होत्या. बदलते हवामानावर आधारीत पिक पध्दती, बीटी बियाणे, कापूस लागवड तंत्रज्ञान, मोसंबी, डाळिंब, अंबा आदी ङ्गळबाग पिकांची लागवड आदी विषयावर मार्गदर्शन आले.
Read More →