मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या वतीने १८ मे रोजी येथे खरीप शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे, असे विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.के.पी. गोरे यांनी सांगितले.मेळाव्याचे उद्घाटन पालकमंत्री प्रकाश सोळंके यांच्या हस्ते होणार आहे. …
Read More →मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या वतीने १८ मे रोजी येथे खरीप शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे, असे विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.के.पी. गोरे यांनी सांगितले.मेळाव्याचे उद्घाटन पालकमंत्री प्रकाश सोळंके यांच्या हस्ते होणार आहे. …
Read More →यवतमाळ(प्रतिनिधी):- जिल्ह्याच्या विविध भागात विविध प्रकारची वनसंपदा आढळते. या वनसंपत्तीवर प्रक्रीया करुन काही उद्योग उभारता येईल का? या दृष्टीने प्रयत्न होणे आवश्यक आहे. जिल्ह्यात कोणकोणत्या प्रकारची वनसंपदा आहे, त्यातून कोणत्या प्रकारच्या वस्तू निर्माण करण्याचे उद्योग उभारले जाऊ शकतात या दृष्टीने वन विभागाने पुढाकार घेऊन काम करावे, असे प्रतिपादन सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे यांनी केले.
सामाजिक न्यायभवन येथे स्थानांतरीत झालेल्या वनविभागाच्या प्रादेशिक कार्यालयाला मोघे यांनी शनिवारी भेट दिली. तसेच वनविभागाच्या प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटनही त्यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला मुख्य वनसंरक्षक डी.के.त्यागी, जिल्हा परिषद सदस्य देवानंद पवार, कार्य आयोजन विभागाचे वनसंरक्षक राय,उपवनसंरक्षक प्रमोद लाकरा, समाजकल्याणचे सहाय्यक आयुक्त पी.बी.नाईक आदी उपस्थित होते.
जिल्ह्यात वनांवर आधारीत काही हर्बल उत्पादने निर्माण करण्याचे उद्योग उभारले जाऊ शकतात. त्याशिवाय अन्य काही उद्योग उभारता येईल काय, हे पाहणे आवश्यक आहे, असे मोघे म्हणाले. वन विभाग समाजाचे ऑक्सीजन आहे. त्याप्रमाणेच हा विभाग काम करीत आहे. वातावरणातील बदलांचा आढावा घेता वनांची वाढ मोठ्या प्रमाणावर करणे आवश्यक आहे. झाडे वाचविणे, जगविणे आणि वाढविण्यासाठी सर्वांच्याच सामुहिक प्रयत्नांची गरज असल्याचे ते म्हणाले. यावेळी त्यागी यांनी वनांच्या संरक्षणासाठी वन विभाग कायम प्रयत्नरत राहणार असल्याचे सांगितले
Read More →औरंगाबाद (प्रतिनिधी) : हैदराबाद येथील केंद्रीय कोरडवाहू शेती संशोधन केंद्राच्या (क्रीडा) पथकांने मराठवाड्यातील दुष्काळी भागात जाऊन बागेची पहाणी केली. …
Read More →पुणे, दि. २६ : अप्रतिम मीडिया व ओम ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंटस आणि आदर्श उद्योग समूह प्रायोजित चौथा स्तंभ विशेष पत्रकारिता राज्यस्तरीय पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे. मुद्रित आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमातील पत्रकारांना त्यांचे विशेष कौशल्य व गुणवत्ता लक्षात घेऊन चौथा स्तंभ या राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित केले जाते. सा. आधुनिक किसान चे सहयोगी संपादक पंकज जोशी यांना कृषी, तर स्तंभ लेखक आसाराम लोमटे यांना राजकीय पत्रकारितेसाठी यावर्षीचा पुरस्कार जाहीर झाला आहे. एप्रिल मध्ये मुंबई येथे मान्यवरांच्या उपस्थितीत हे पुरस्कार वितरण करण्यात येणार आहे, अशी माहिती संयोजक डॉ. अनिल फळे यांनी दिली. …
Read More →मुंबई, दि. 13 : टेक्सस्टाईल पार्क संदर्भात खानदेशातील लोकप्रतिनिधींनी त्यांच्या भागातून प्रस्ताव द्यावेत त्यावर शासन विचार करील, असे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत दिले. यवतमाळ जिल्ह्यातील विदर्भ प्रभावी सिंचन विकास कार्यक्रम अंमलबजावणी संदर्भातील प्रश्न आमदार संजय राठोड यांनी विचारला होता. त्या प्रश्नाच्या चर्चेत टेक्सस्टाईल पार्क बाबत विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी प्रश्न उपस्थित केला असता उपमुख्यमंत्र्यांनी उपरोक्त आश्वासन दिले.
राज्यमंत्री गुलाबराव देवकर यांनी मूळ प्रश्नास उत्तर देताना सांगितले की, यवतमाळ जिल्ह्यात विदर्भ सधन सिंचन विकास कार्यक्रमांतर्गत 16 तालुक्यांमध्ये 17 प्रकल्प कार्यान्वित करण्यासाठी प्रस्ताव कृषी आयुक्तालय, पुणे कार्यालयास 9 डिसेंबर 2012 रोजी प्राप्त झाला. सदर 17 प्रकल्पांचे एकूण मूल्य रु. 339.50 कोटी आहे. सन 2012-13 करिता यवतमाळ जिल्ह्याला रु. 43.17 कोटीचा कार्यक्रम प्रस्तावित करण्यात आला असून सदर कार्यक्रम राबविण्यासाठी कृषी आयुक्तालय, पुणे यांचे स्तरावर 30 डिसेंबर 2012 अन्वये रु. 14.26 कोटी अनुदान जिल्ह्याला वितरित करण्यात आले. जानेवारी, 2013 अखेर सदर रु. 14.26 कोटी इतका निधी खर्च करण्यात आला आहे. अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनीही या प्रश्नाबाबत आपले मत व्यक्त केले. त्यावर उपमुख्यमंत्र्यांनी हे अधिवेशन संपण्यापूर्वी चर्चा करुन माहिती दिली जाईल, असे सांगितले. या चर्चेत आमदार सर्वश्री देवेंद्र फडणवीस, गणपतराव देशमुख, चिमणराव पाटील, नाना पटोले यांनी भाग घेतला.
Read More →मुंबई, : आदर्श गाव योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सुधारणा समिती स्थापन करण्याचे निर्देश रोजगार हमी व जलसंधारण मंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिले. मंत्रालयात झालेल्या आदर्श गाव संकल्प व प्रकल्प राज्यस्तरीय समितीच्या आढावा बैठकीत अध्यक्षपदावरुन डॉ. राऊत बोलत होते. …
Read More →शेतीमित्र आणि उद्योजक म्हणून परिचीत असलेले पुणे येथील चंद्रकांत विनायक पाठक यांचे शनिवारी (दि. ९ मार्च ) हृदयविकाराच्या झटकाने निधन झाले. मृत्यूसमयी ते ७१ वर्षाचे होते. …
Read More →