नांदेड(प्रतिनिधी): शेतकऱ्यांच्या कृषि उत्पादनास योग्य भाव मिळवून देणे ही आजच्या काळाची गरज असून त्यासाठी धान्य महोत्सवाचे आयोजन हा एक शेतकरी हिताचा अभिनंदनीय असा उपक्रम असल्याचे प्रतिपादन राज्याचे वैद्यकीय शिक्षण आणि तंत्र शिक्षण, राज्यमंत्री तथा पालकमंत्री डी. पी. सावंत यांनी केले.

Read More →

औरंगाबाद(प्रतिनिधी):- गोपीनाथ मुंडे यांचे बेमुदत उपोषण आज (दि 9, मंगळवार ) राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री पतंगराव कदम यांच्या आश्वासनानंतर उपोषण सोडलं. मुंडे यांच्या उपोषणाला औरंगाबादमध्ये कालपासून सुरूवात झाली.

Read More →

बीड(प्रतिनिधी):-शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये उच्च दर्जाचा माल तयार करुनही त्यांच्या मालाची विक्री करण्यासाठी इतरांवर अवलंबून रहावे लागते. शेतकऱ्यांनी स्वत:च्या मालाचा भाव स्वत:च ठरवून विक्री करण्यासाठी धान्य महोत्सव हा उपक्रम शेतकऱ्यांसाठी उपयुक्त असल्याचे मत अपर जिल्हाधिकारी एस.टी.टाकसाळे यांनी व्यक्त केले.

Read More →

पंढरपूर (प्रतिनिधी):- सध्या पाणी टंचाई मोठ्या प्रमाणावर जाणवत असल्याने या परिसरातील फळबागा जिंवत ठेवण्यासाठी शेतकरी कसोशीने प्रयत्न करीत असून, याचाच एक भाग म्हणून पंढरपूर विभागामध्ये सुमारे 1 हजार 153 इतक्या सामुहिक शेततळ्यांचे प्रस्ताव दाखल झाल्याची माहिती पंढरपूर उप-विभागीय कृषी अधिकारी रविंद्र पाटील यांनी दिली.

Read More →

औरंगाबाद, दि. ४ (प्रतिनिधी) ः यावर्षीच्या दुष्काळामुळे विविध पिकांसह कपाशी पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे कापूस उत्पादक शेतकर्‍यांना हेक्टरी पंचवीस हजार रुपये मदत द्यावी अशी मागणी कापूस उत्पादक शेतकरी जयाजीराव सूर्यवंशी, शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष कैलास तवार, कृषीभूषण शेतकरी रवींद्र पाटील यांनी केली आहे.

Read More →

मुंबई : मुख्यमंत्री सहाय्यता निधी (दुष्काळ) या निधीत आतापर्यंत 55 कोटी रुपये जमा झाल्याची माहिती मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली.

चालू वर्षी राज्यातील काही भागात दुष्काळाची भीषण परिस्थिती आहे. या दुष्काळाला तोंड देण्यासाठी शासनामार्फत विविध उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत. शासनाच्या या प्रयत्नाबरोबरच विविध संस्था, स्वयंसेवी संघटना आणि दानशूर व्यक्तीकडूनही मुख्यमंत्री सहाय्यता निधीलाही उस्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या निधीत सिध्दीविनायक ट्रस्टतर्फे 25 कोटी रुपये, महाराष्ट्र राज्य कृषी उद्योग महामंडळाकडून एक कोटी रुपये, स्टेट बँक ऑफ इंडियाकडून दोन कोटी रुपये, महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाकडून एक कोटी रुपये, बँक ऑफ महाराष्ट्रकडून 2 कोटी 51 लाख रुपये, अभ्युदय को-ऑपरेटीव्ह बँकेकडून एक कोटी रुपये, दत्त सहकारी साखर कारखाना, शिरोळ (जि.कोल्हापूर) यांच्याकडून एक कोटी 20 लाख रुपये, किसनवीर सहकारी साखर कारखान्याकडून (जि.सातारा) 51 लाख रुपये तसेच इतर संस्था व दानशूर व्यक्तींकडून धनादेश प्राप्त झाल्याची माहिती मुख्यमंत्री चव्हाण यांनी दिली.
मुख्यमंत्री सहाय्यता निधी (दुष्काळ) या निधीस मदत करु इच्छिणाऱ्यांना अडचण येऊ नये म्हणून देणगीदारांना थेट बँकेमध्ये किंवा संबंधीत जिल्हाधिकारी कार्यालयात धनादेश जमा करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

बँकेत थेट भरणा

देणगीदार थेट स्टेट बँक ऑफ इंडियाच्या कोणत्याही शाखेत स्वत: आपला धनादेश किंवा ड्राफ्ट जमा करु शकतात. हे धनादेश मुख्यमंत्री सहाय्यता निधी (दुष्काळ 2013) / Chief Minister Relief Fund (Drought 2013) स्टेट बँक ऑफ इंडिया, फोर्ट शाखा खाते क्र. S.B.32860305777 या खात्यात जमा करावेत. ही रक्कम जमा केल्यानंतर देणगीदारांनी पत्राद्वारे लेखाधिकारी, मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष, मुख्यमंत्री सचिवालय, मंत्रालय, मुंबई-32 यांना बँकेच्या पावतीच्या प्रतिसह कळवावे, ज्यायोगे त्यांना पावती पाठविणे सोपे जाईल.

अधिक माहितीसाठी इच्छुकांनी मुख्यमंत्री निधी कक्ष यांच्याशी 022-22026948 अथवा 022-22022940 या दूरध्वनी क्रमांकावर सुट्टीचे दिवस सोडून कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा असे मदत व पुनर्वसन विभागाने कळविले आहे. तसेच ही सर्व माहिती विभागीय आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या कार्यालयातील सूचना फलकावर लावण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

Read More →

बीड (प्रतिनिधी) : “मूठभर धान्य पक्षांसाठी आणि एक रुपया पाण्यासाठी” अशी मोहीम शिरूर तालुक्यातील पक्षीमित्र सध्या राबवित आहेत.दुष्काळाच्या दाहकतेत आता माणसांबरोबर पशुपक्षीही होरपळुन निघत आहेत.

Read More →