नाशिक (अतुल भांबेरे) : जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात कांद्याची आवक वाढली असून, दरातही वाढ झाली आहे. सध्या सरासरी कांद्याला १४०० रुपये प्रती क्विन्टलला दर मिळत आहे. पण कांदा लागवडीत यंदा पुरेश्या पाण्या अभावी घट झाल्यामुळे कांद्याचे उत्पादन निम्याने घटले आहे. परिणामी या भाव वाढीचा फायदा मोजक्याच शेतकऱ्यांना होतो आहे.

Read More →

नांदेड( रमेश पांडे) : नांदेड जिल्ह्यात यंदा शेतकर्‍यांनी कापूस व सोयाबीन ही दोन पिके घेण्यावर भर दिल्याने या पिकांचे मोठ्याप्रमाणावर मोठे उत्पादन झाले परंतु शासनाने या दोन्ही पिकांना कमी भाव जाहीर केल्यामुळे बहुतांश शेतकर्‍यांनी कापूस व सोयाबीन बाजार न आणता घरातच साठवूण ठेवणे पसंत केले. शासन आज ना उद्या कापूस, सोयाबीन या पिकांना चांगला भाव जाहीर करेल या आशेवर शेतकरी आहेत.

Read More →

नवी दिल्ली : लोकसभेत एफडीआयच्या प्रस्तावावर मताधिक्य मिळाल्यावर राज्यसभेतही हा प्रस्ताव १०८ विरूद्ध १२३ मतांनी केंद्राने जिंकला आहे. त्यामुळे देशातील रिटेल क्षेत्रात थेट परकीय गुंतवणुकीसाठी मार्ग मोकळा झाल्याचे मानले जात आहे. दोन दिवस राज्यसभेत चर्चा झाल्यानंतर बसपानेएफडीआयची बाजूघेण्याचे संकेत दिले होते. तेव्हाच राज्यसभेतही हा प्रस्ताव सरकार जिंकणार असे चित्र होते. समाजवादी पार्टीच्या सदस्यांनी आज पुन्हा सभात्याग केल्यानेत्याचा अप्रत्यक्षरित्या या प्रस्तावाच्या मंजूरीला फायदाच झाला.

Read More →

टीम आधुनिक किसान
वापसीच्या मुद्यावर सुरू असलेला आडतदारांचा बेमुदत संप आज मागेघेण्यात आला मात्र उद्या (दिनांक ७ डिसेंबर) राज्यातील आडतदार लाक्षणिक संप पुकारणार असून त्याद्वारेआपल्या मागण्यांसाठी सरकारला इशारा देण्याचा प्रयत्न ते करणार आहेत. आडतदारांच्या मागण्यांवरील चर्चेसाठी राज्य शासनाचे निमंत्रण आल्याने बेमुदत संप मागे घेण्याची भूमिका आडतदारांच्या समितीने घेतली.

Read More →

ऑनलाईन रिपोर्टर/आधुनिक किसान
नाशिक : पिंपळगांव बसवंत परिसरातील द्राक्ष उत्पादक शेतकर्‍यांपैकी शरद सीडलेस, सोनाका ब्लॅक अशा काळ्या रंगाच्या जातीचे उत्पादन घेणार्‍या शेतकर्‍यांनी द्राक्ष काढणीला सुरवात केली असून डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात नाशिकची काळी द्राक्षेबाजारपेठांमध्येदाखल होणार आहे. पिंपळगांव परिसरातीलच तरुण शेतकरी प्रवीण ठाकरे यांचा शरद सीडलेस जातीच्या द्राक्षांचा पलॉटही तयार झाला असून त्याची कटींग त्यांनी ८ ऑगस्ट २०१२ रोजी केली होती.

Read More →

यंदा खरीप हंगामातील कांदा उत्पादन ४५ टक्क्यांनी घटल्यामुळे २०१२-१३ मध्ये कांद्याची देशांतर्गत उपलब्धता २० टक्क्यांनी घटणार आहे. त्यामुळे पुढे वर्षभर कांदा तेजीत राहील, असा अंदाज आहे. कांदा उत्पादक शेतकर्‍यांसाठी ही आनंदाची बातमी म्हणावी लागेल. दोन वर्षांपूर्वी म्हणजेच ऑक्टोबर २०१० ते फेब्रुवारी २०११ या काळात पुरवठ्यात घट आल्यामुळे कांद्याचे भाव ऐतिहासिक पातळीवर पोहोचले होते. त्याचवेळी अन्नधान्य महागाई दरही उच्चांकी पातळीवर पोहोचला होता.

Read More →