नागपूर : विदर्भातील मुख्य पिके म्हणून सोयाबीन, कापूस, धानाची ओळख आहे. सोयाबीन तेल, ढेप, उत्पादनांची मागणी वाढून त्याचे दरात वाढ असूनही शेतकर्यांच्या सोयाबीनला दर मिळत नसल्याची शोकांतिका आहे. दुष्काळी परिस्थिती, उत्पादनखर्चात वाढ, उत्पादन व मिळणारे दर कमी, मजुरटंचाई हीच परिस्थिती कापूस आणि धान पिकाची देखील आहे. विदर्भातील प्रश्न सोडवीण्याकरिता नागपुरात तिसरे अधिवेशन होते त्यामुळे येथील आत्महत्याग्रस्त भागातील शेतकर्यांचे प्रश्न प्राधान्याने सोडविणे गरजेचे आहे. याकरिता विदर्भातील लोकप्रतिनिधींनी एकत्र येऊन लढण्याचे आवाहन माजी आमदार पाशा पटेल यांनी केले आहे.
खाद्य तेलावर आयात शुल्क लावणे, डी.ओ.सी. वरील रद्द केलेले आयातशुल्क लावणे, २० टक्के अधिक भाव देऊन कापूस खरेदी केंद्र सुरू करणे, धानाची आधारभूत किंमत वाढविण्याचे शिङ्गारस केंद्राकडे करणे आदी मागण्या शासनाने मान्य करणे देखील अगत्याचे असल्याचे पाशा पटेल यांनी निवेदनाद्वारे कळविले आहे.
Read More →