श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्‍वर येथील अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरूपीठाच्या प्रांगणात श्री स्वामी समर्थ जयंतीनिमित्त गुरुवार, दि. ११ एप्रिल २०१३ रोजी समर्थ ऍग्रो वर्ल्ड राष्ट्रीय कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कृषी यात्रोत्सव ११ एप्रिल ते १३ एप्रिल असा तीन दिवस चालणार आहे. यामध्ये शेतकर्‍याला शेतीसंदर्भात विविध विषयांवर ज्ञानप्राप्ती करून घेता येणार आहे. या यात्रोत्सवानिमित्त श्री स्वामी समर्थ गुरुपीठाच्या कृषी विषयक कामकाजाबद्दलची माहिती शेतकर्‍यांपर्यंत पोहोचविण्याचा हा एक प्रयत्न…

Read More →

नाशिक ( अतुल भांबरे) ः शेतकर्यांना कांदा चाळींचे थकलेले अनुदान एप्रिल महिन्यापर्यंत देण्यात येईल असे आश्वासन कृषी विभागाचे मुख्य सचिव सुधीरकुमार गोयल यांनी दिले. चितेगाव फाटा येथील राष्ट्रीय फलोत्पादन संशोधन आणि विकास प्रतिष्ठानतर्ङ्गे कांद्याचे अतिरिक्त उत्पादन आणि त्याचे नियोजन या विषयावर दोन दिवशीय राष्ट्रीय चर्चा सत्राचे रविवारी उद्घाटन झाले. यावेळी गोयल मार्गदर्शन करताना बोलत होते.

Read More →

नाशिक, दि. ४ (प्रतिनिधी) ः जिल्ह्याच्या सरासरी तापमानात वाढ झाल्याने थंडी गायब होऊन उन्हाळ्याला प्रारंभ झाल्याचा अनुभव नागरिक घेत आहेत. दुपारच्या सुमारास जाणवणारा उन्हाचा तडाखा असाह्य होऊ लागल्याने शेतमजूर व शेतकर्यांना शेतात काम करणे कठीण झाले आहे.

Read More →

नाशिक (प्रतिनिधी): संपूर्ण राज्य दुष्काळाने होरपळून निघत आहेत. सरकार पातळीवरचे प्रयत्न तोकडे पडत असल्यानं दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी देवस्थान ट्रस्ट पुढे येतायेत. या पंक्तीत आता नाशिकच्या काळाराम मंदिराचाही समावेश झाला असून देवस्थान ट्रस्टने पाच लाख रुपयांचा निधी देण्याची घोषणा केलीय. मात्र त्याचवेळी जिल्ह्यातील देवस्थानं मागे का असा सवालही उपस्थित होतय.

Read More →

वाईनच्या बाबतीत नाशिकचा ब्रॅड विकसित होण्याची गरज आहे. विंचूर च्या औद्योगिक परिसरामध्ये लवकरच वाईन पार्कची निर्मिती करण्यात येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी वाईन निर्मिती आणि त्या साठी लागणाऱ्या द्राक्ष निर्मिती कडे वळावे अस आवाहन पर्यटन मंत्री तथा नाशिकचे पालक मंत्री छगनराव भुजबळ यांनी केले. नाशिक येथे आयोजित दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय वाईन फेस्टीव्हल च्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

सध्या ठिकाणी ९ वाईनची प्रकल्प सुरु आहेत. शासन स्तरावरून रखडलेल्या कामांना लवकरच गती मिळणार आहे. भविष्यात शेतकऱ्यांना वाईनच्या द्राक्ष निर्मीतीतूनच मोठ्या प्रमाणावर आर्थिक लाभ होणार आहे भुजबळ पुढे म्हणाले की वाईन म्हणजे एक आरोग्य दाई पेय आहे. अती पिल्याने तिचे मद्यात रुपांतर होते. या वेळी खासदार समीर भुजबळ अखिल भारतीय द्राक्ष प्रक्रिया मंडळाचे अध्यक्ष जगदीश होळकर, शिवाजी आहेर, राजेश जाधव आदी उपास्तित होते.

Read More →

नाशिक (प्रतिनिधी) ः माध्यमांनी शेती क्षेत्राकडे सकारात्मक दृष्टीकोनातून बघावे असा सुरू नाशिक येथे संपन्न झालेल्या पहिल्या अखिल भारतीय कृषी साहित्य संमेलनाच्या परिसंवादात उमटला. कृषीक्षेत्राशी निगडीत चांगल्या वृत्ताला प्रसारमाध्यमात स्थान मिळत नाही. याउलट नकारत्मक गोष्टी या अधिक प्रखरतेने मांडल्या जातात. शेतीशी संबंधित लोकांचीही जाणीवपुर्वक उपेक्षा होत असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आल्या.

Read More →

नाशिक येथील पहिल्या अखिल भारतीय कृषिसाहित्य संमेलनाचेअध्यक्ष प्रा. रा. रं. बोराडे यांचे अध्यक्षीय भाषण

Read More →