नांदेड : शेतकऱ्यांनी शेतीला पुरक असा दुग्धोत्पादन व्यवसाय करुन स्वत:च्या कुटूंबाची आर्थिक उन्नती साधावी, असे आवाहन राज्याचे वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डी.पी. सावंत यांनी केले . …
Read More →नांदेड : शेतकऱ्यांनी शेतीला पुरक असा दुग्धोत्पादन व्यवसाय करुन स्वत:च्या कुटूंबाची आर्थिक उन्नती साधावी, असे आवाहन राज्याचे वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डी.पी. सावंत यांनी केले . …
Read More →बीड (दीपक देशपांडे): टंचाईग्रस्त भागातील फळबागधारक शेतकर्यांना राज्यशासन पंधरा हजार रुपये हेक्टरी नुकसानीचे अनुदान म्हणून देण्याच्या तयारीत असून आठ हजार रु. केंद्राची भरतीसह एकूण तेवीस हजार रुपये फेब्रुवारीअखेरपर्यंत शेतकर्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यासाठीचा प्रस्ताव मंत्रिमंडळ बैठकीत मंजूर केला जाईल, असा विश्वास कृषी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला. …
Read More →राज्यातील गायी-म्हशींची उत्पादकता वाढविण्यासाठी सर्वसमावेशक कार्यक्रम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. यात माहिती तंत्रज्ञानाचा देखिल वापर करण्यात येणार आहे. “राज्यातील गाई-म्हशींची उत्पादकता वाढविण्यासाठी सर्वसमावेशक अनुवंशिक सुधारणा कार्यक्रम” असे या राज्यस्तरीय योजनेचे नाव असून ती चालू वर्षापासून राज्यात राबविण्यात येईल. …
Read More →गायी-म्हशींनी जास्त दूध द्यावे, यासाठी ‘ऑक्सिटोसीन’ हे रसायन त्यांना इंजेक्शनच्या माध्यमातून दिले जाते. मानवी आरोग्यासाठी घातक असलेल्या या रसायनाचा गैरवापर करण्याचे प्रकार काही ठिकाणी घडतात. विदर्भात काही दिवसांपूर्वी ‘ऑक्सिटोसीन’चा मोठा साठा जप्त करण्यात आला. दुभत्या जनावरांना देण्यात येणार्या या घातक रसायनाविषयीची माहिती या लेखात जाणून घेऊया… …
Read More →मुंबई, दि. 27 : राष्ट्रीय नमुना पाहणी 70 वी फेरी जमीन व पशुधन धारणा, कर्ज व गुंतवणूक आणि शेतकरी कुटुंबाची स्थिती या विषयावर असून जानेवारी 2013 ते डिसेंबर, 2013 या कालावधीत माहिती संकलित करण्याचे काम सुरु होणार आहे. या कामासंबंधी सर्व प्रादेशिक कार्यालयातील व मुंबईतील वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी यांचे प्रशिक्षण 28 व 29 डिसेंबर, 2012 रोजी अर्थ व सांख्यिकी संचालनालय प्रशिक्षण सभागृह, 7 वा मजला, कोकण भवन, नवी मुंबई, सी. बी. डी. बेलापूर येथे आयोजित करण्यात आले आहे. …
Read More →अकोला :- राज्याचे पशुसंवर्धन आयुक्त मा. एकनाथराव डवले यांनी नागपूर अधिवेशनावरून परतताना दुग्धव्यवसायाच्या विकासात महामेरू ठरलेल्या बुलडाणा जिल्हयातील मोताळा तालुक्याला नुकतीच भेट दिली. यावेळी त्यांनी तालुक्यातील आडविहीर, खरबडी येथील गोठयांची पाहणी केली. तसेच ग्रामस्थांशी चर्चा केली व दुग्धव्यवसायाच्या विकासासाठी काही सुचना केल्या. …
Read More →महाराष्ट्र पशुधन विकास मंडळ, अकोला अंतर्गत मायरा (महाराष्ट्र पशुधन ओळख व नोंदणी प्राधिकरण) हे शासनाने स्वतंत्र प्राधिकरण स्थापन केले असून त्याचे लोकार्पण आज (२० डिसेंबर २०१२) दुपारी पशुसंवर्धन मंत्री मधुकरराव चव्हाण यांचेहस्ते होणार आहे. यावेळी कृषी राज्यमंत्री गुलाबराव देवकर, पशुसंवर्धन सचिव अनिल डिग्गीकर, पशुसंवर्धन आयुक्त एकनाथ डवले, कुलगुरू आदित्यकुमार मिश्रा आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
मायरा अंतर्गत पशुधन नोंदणी पद्धती विकसित करण्यात येणार असून त्याचे प्रशिक्षण देणे, पैदासीकरिता वापरण्यात येणार्या वळुंची नोंदणी करून त्यांना क्रमांक देण्यात येणार आहे. खडकी, पुणे येथे या उपक्रमाचे मुख्यालय राहणार आहे.
- अश्विन सवालाखे
Read More →