अहमदनगर जिल्ह्यातील कनकुरी (ता. राहाता) येथील शिवाजी मारुती दुशिंग यांनी ऊस पिकाला रामराम ठोकून डाळिंबाची लागवड केली. पदार्पणातच त्यांनी अडीच एकरांवर टिश्यू कल्चर डाळिंबाची बाग फुलवत पहिल्याच तोड्यात एकरी चार लाखांचे उत्पन्न मिळविले. त्यांच्या टिश्यू कल्चर डाळिंब शेतीची प्रेरणा घेऊन अनेक शेतकर्‍यांनी आपापल्या गावांत बरड माळरानाला ‘हिरवा साज’ चढविला आहे. अगदी अठरा महिन्यांतच भरघोस उत्पन्न मिळवून देणारे हे टिश्यू कल्चर डाळिंब कृषी विभागाच्याही कौतुकाचा विषय ठरले आहे.

Read More →

सोलापूर,ता.१३ ः आधुनिक किसान या अल्पावधीतच लोकप्रिय झालेल्या साप्ताहिकाने सुरू केलेली वेबसाइटही अव्वल दर्जाची ठरली. पहिल्याच आठवड्यात कृषी विद्यालयातील विद्यार्थी, कृषी शास्त्रज्ज्ञ व शेतकर्‍यांच्या पसंतीस उतरलेले हे एकमेव वेब दैनिक ठरले आहे.

Read More →

‘तेल्या’ रोगातून वाचलेल्या डाळिंबाच्या बागा हातातोंडाशी आल्या असतानाच आता ‘मॉथ’ किडीने डाळिंबावर आक्रमण केले आहे. डाळिंबासह मोसंबी, संत्रा, पपई, टोमॅटो, कापूस आदी पिकांवरही ‘मॉथ’ चा प्रादूर्भाव आढळून येत आहे. सोलापूर जिल्ह्यात मृग बहार धरलेल्या डाळिंबावर सध्या ‘मॉथ’ या किडीचा मोठ्या प्रमाणात प्रादूर्भाव झाला असून शेतकरी मोठ्या जिद्दीने ‘मॉथ’शी दोन हात करू लागले आहेत.

Read More →

डाळिंबावरील ‘तेल्या’ रोग खतरनाक आहे; पण शेतकर्यांनी त्याला भिण्याचे काहीच कारण नाही. ‘तेल्या’ नियंत्रणात राहण्यासाठी डाळिंब संशोधन केंद्राने केलेल्या शिङ्गारशीप्रमाणे शेतकर्यांनी औषधांची फवारणी (स्प्रे) केली तर ‘तेल्या’ निश्चितच नियंत्रणात राहू शकतो. ‘तेल्या’ अजून तरी पूर्णत: थांबू शकला नाही. त्यासाठी प्रतिबंधक उपाय करणे हेच सध्या महत्त्वाचे आहे, असा सल्ला सोलापूर येथील राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्राचे नूतन संचालक डॉ. आर. के. पाल यांनी डाळिंब उत्पादक शेतकर्यांना दिला.

Read More →

राज्यात मोठ्या प्रमाणावर फळबाग लागवड करण्यात आलेली आहे. यावर्षी कमी पर्जन्यमानामुळे दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. कमी-अधिक प्रमाणात सगळीकडे पाणीटंचाई जाणवू लागली आहे. अशा परिस्थितीमध्ये फळबागा वाचविण्यासाठी काय उपाययोजना करता येतील, याचा प्रामुख्याने विचार करणे गरजेचे आहे. अवर्षण काळात शेतातील उभी पिके वाचविणे हा एक भाग आणि उत्पादन घेणे हा दुसरा भाग महत्त्वाचा असतो. वाढलेली उष्णता व घटलेली आर्द्रता यांमुळे पिकांची वाढ खुंटते. परिणामी उत्पादन व गुणवत्ता कमी होते. प्रतिकूल परिस्थितीत मार्ग काढण्यासाठी वा फळबागा जगविण्यासाठी खालील उपलब्ध तंत्रज्ञानाचा वापर शेतकरी बांधवांनी करणे महत्त्वाचे ठरेल

Read More →

अहमदनगर जिल्ह्यातील काही गावांनी कृषी व ग्रामविकासाचे अनोखे मॉडेल विकसित करून देशापुढे आदर्श निर्माण केला आहे. शेतीत आधुनिक तंत्रज्ञान वापरून केलेल्या प्रगतीमुळे नावाजलेले संगमनेर तालुक्यातील जवळे कडलग हे त्यापैकीच एक गाव. संगमनेर व अकोले या दोन तालुका मुख्यालयांना जोडणार्‍या रस्त्यावर ङ्गळबागांनी ङ्गळले, फुललेले हे गाव पाहण्यासाठी राज्यभरातून हजारो शेतकरी येथे येतात. यातीलच काही जाणकार व उमेदीने काम करणार्‍या शेतकर्‍यांनी अहमदनगर जिल्ह्यासह विदर्भ व मराठवाड्यातही फलोत्पादनाची क्रांती करून दाखविली आहे. या गावातील शेतकर्‍यांनाही याचा अभिमान आहे.

Read More →

महाराष्ट्रात सोलापूर, नाशिक, अहमदनगर, सातारा, औरंगाबाद, जालना आदी जिल्ह्यांत डाळिंबांची मोठ्या प्रमाणावर लागवड केली जाते. डाळिंबाचे तीन बहार घेता येतात. राज्यात अंबिया बहार मोठ्या प्रमाणावर घेतला जातो. मराठवाड्यातील शेतकरी याच बहाराचे नियोजन करतात.

Read More →