रब्बी ज्वारीवरील चिकट्याच्या नियंत्रणासाठी रस शोषण करणार्‍या किडींचा बंदोबस्त करावा. त्यासाठी मिथीलपॅराथिऑन भुकटी (२ टक्के) हेक्टरी २० ते २५ किलो या प्रमाणात धुरळणी करावी किंवा १५ मि. लि. डायमिथोएट प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारावे. वेळेवर पेरलेल्या गव्हाच्या पिकास आवश्यकतेनुसार पाणी द्यावे. बागायती क्षेत्रात उशिरा पेरणी केलेल्या गव्हास खुरपणी अथवा कोळपणी करून नत्राचा दुसरा हप्ता देऊन पाणी द्यावे. गव्हावरील ‘करपा’ नियंत्रणासाठी २५ ग्रॅम मॅन्कोझेब १० लिटर पाण्यात मिसळून फवारावे.

Read More →

पुणे, ता. २५ : रब्बी हंगामात आंबेगाव, जुन्नर व खेड तालुक्यात गहू, हरभरा पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. सध्या मजुर टंचाईला शेतकर्‍यांना सामोरे जावे लागत आहे. शेतकर्‍यांना मजुर टंचाईवर मात करता आली पाहिजे या उद्देशाने कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव च्या वतीने परिसरात यांत्रिक पद्धतीने गहू पेरणी कशी करावी या साठी ट्रॅक्टरचलित रुंद वरंबा व सरी टोकण पद्धतीने लागवडीचे प्रात्यक्षिक परिसरातील शेतकर्‍यांना दाखवण्यात येत आहे.

Read More →

सोलापूर (मोहन काळे)ता. १७ :पाण्यात पाहताना चोरूनीया क्षणैक, त्याचेच त्या कळाले तो राजहंस एक…! कवी ग.दि. माडगुळकरांच्या या सुरेख रचनेमुळे आठवणारा तो दुर्मिळ राजहंस चक्क सोलापूरकरांच्या भेटीला आलाय. पर्यावरण प्रेमिंसाठी हा एक राजयोग असला तरी शेतीला मात्र तो उपद्रवी आहे. त्यामुळे शेतकर्‍यांना त्यापासून जरा सावधच राहावे लागणार आहे.

सोलापूर जवळच्या हिप्परगा तलावात एक नाही… दोन नाही…तर तब्बल तीसहून अधिक दुर्मिळ असे राजहंस पक्षी डेरे दाखल झाले आहेत. हिप्परगाच नाही तर उजनी जलाशय व पंढरपूर येथील यमाई तलावातही राजहंस पाहण्याचा राजयोग पर्यावरण प्रेमिंना आला आहे.

आजवर बहुतेकांना काव्यातूनच राजहंसाबद्दल माहिती आहे. आपल्या पक्षीतज्ज्ञ, पर्यावरण प्रेमी व पक्षीमित्रांनाही याच्या दर्शनाचा फारसा योग आला नाही. पण यावर्षी सोलापूर जिल्ह्यातील काही मोजक्या जलाशयांमध्ये राजहंस आले आहेत. त्यामुळे त्यांना पाहण्याची सुवर्ण संधी मिळाली आहे. या पक्ष्यांना राजहंस नाव का मिळाले ? याचे उत्तर आपसूकच मिळते ते त्याच्या प्रत्यक्ष दर्शनातूनच. हिप्परगा तलाव परिसरात फेरफटका मारला असता पिवळी चोच, चोचीच्या टोकाला काळा स्पॉट, केशरी पाय, मानेच्या दोन्ही बाजूला उभे पांढरे पट्टे, डोक्यावर दोन आडवे काळे पट्टे असलेले हे पक्षी फारच रुबाबदार दिसले.

हे पक्षी वारंवार पाण्यात बुडून स्वच्छ राहण्याचा प्रयत्न करत होते. अधून-मधून पंख फडकावत मधेच थांबून आपला रुबाबात दाखवतात. पाण्यातून चालतानाचीही त्याची ऐटच निराळी होती. ऐंग-ऐंग असा आवाज करत ते हवेत उडाले तेव्हा सुरेख चित्र दिसले. पर्यावरण प्रेमिंना त्यांच्या येण्याने आनंद झाला असला तरी जलाशयाजवळच्या कोवळ्या गहू व हरभरा या पिकाला त्यांचा उपद्रव होतो आहे. कवळे अंकुर ते खात असल्यामुळे पिकांचे नुकसान होते. त्यामुळे शेतकर्‍यांना त्यांच्यापासून जरा सावधच रहावे लागणार आहे. या पक्षाबाबत पक्षीमित्र निरंजन मोरे म्हणाले, ‘आपल्याकडे राजहंस पक्षी दिसत नाहीत. त्यामुळे ते आपल्याला दुर्मिळ आहेत. पण त्यांचे यावळी दर्शन झाले हे विशेष. राजहंसाच्या डोक्यावर काळ्या रंगाचे दोन आडवे पट्टे असल्यामुळे त्याला इंग्रजीत बारहेडेड गूज असे म्हणतात. Anser Indicus हे त्याचे बायलॉजीकल नाव आहे.

गवत व पाण्यातील मासे तो खातो. हे पक्षी उणे २० अंश सेल्सिअस तापमानातील प्रदेशात राहतात. पण आपल्याकडे अन्नाच्या शोधात आलेल्या या पक्ष्यांनी वातावरणातील बदल स्वीकारला आहे.‘ अकलूज येथील शंकरराव मोहिते-पाटील महाविद्यालयाचे प्राध्यापक व पक्षी अभ्यासक डॉ. अरविंद कुंभार यांनी राजहंसाबद्दल अधिक माहिती दिली ती अशी ः लेह, लढाक, तिबेट, सियाचिन व पाकव्याप्त काष्मीरच्या प्रदेशात या पक्ष्याचे नेहमीचे वास्तव्य असते. एप्रिल ते जुलै हा त्यांचा विणीचा हंगाम असतो. राजहंस हे शेतीला उपद्रवी आहेत. पंढरपूर येथील पक्षी अभ्यासक बंडोपंत सबनीस यांनी राजहंस पक्षाच्या पंखाची लांबी सुमारे ७५ सें.मी. असल्याचे सांगितले. दरम्यान हे दुर्मिळ राजहंस सोलापूरकरांच्या भेटीला आल्यामुळे पर्वणीच ठरली आहे.

छायाचित्रे पाहण्यासाठी फोटोवरील बाणावर क्लिक करा
सर्व छायाचित्रे : मोहन काळे/सोलापूर

Read More →

नांदेड( रमेश पांडे) : नांदेड जिल्ह्यात यंदा शेतकर्‍यांनी कापूस व सोयाबीन ही दोन पिके घेण्यावर भर दिल्याने या पिकांचे मोठ्याप्रमाणावर मोठे उत्पादन झाले परंतु शासनाने या दोन्ही पिकांना कमी भाव जाहीर केल्यामुळे बहुतांश शेतकर्‍यांनी कापूस व सोयाबीन बाजार न आणता घरातच साठवूण ठेवणे पसंत केले. शासन आज ना उद्या कापूस, सोयाबीन या पिकांना चांगला भाव जाहीर करेल या आशेवर शेतकरी आहेत.

Read More →

अहमदनगर (सचिन चोभे ) : जिल्ह्याच्या दक्षिण भागाला ऐन हिवाळ्यात उन्हाळ्याचे चटके सहन करावे लागत आहेत. श्रीगोंदा आणि कर्जत तालुक्यातील
रब्बी हंगामात जाळून चाललेल्या पिकांना जगविण्याची आस बागायती पट्ट्यातील शेतकऱ्यांना लागली होती. दोन्ही तालुक्यातील नेत्यांनी कुकडी तून रब्बीसाठी आवर्तन मिळविण्यासाठी दबाव टाकल्याने आता आवर्तनाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे बागायती पट्ट्यातील या शेतकऱ्यांच्या रब्बीच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

Read More →

दुष्काळी परिस्थितीत रब्बी ज्वारी ही अन्नधान्यासाठी तसेच गुराढोरांना लागणार्‍या कडब्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. रब्बी ज्वारीचा पेरणीचा कालावधी फार महत्त्वाचा आहे. ज्वारीची वाढ ही ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात पडलेल्या पावसाच्या ओलाव्यावर अवलंबून असते. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केल्यास येणार्‍या रब्बी हंगामात निश्‍चितच रब्बी ज्वारीचे उत्पादन व उत्पादकता वाढेल.

Read More →