नवी दिल्ली : देशातील दुष्काळी परिस्थितीवर चर्चा आणि उपाय योजना करण्यासंदर्भात बुधवारी कृषी मंत्रालयात केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्च अधिकारप्राप्त मंत्रिगटाच्या बैठकीत महाराष्ट्रातील दुष्काळ निवारणासाठी केंद्र सरकारने एक हजार 207 कोटी रूपयांची मदत देण्याचा निर्णय घेतला आहे. मदतीच्या सर्व उपाय योजनांचा लाभ 1 मार्च पासून लागू होईल, अशी माहिती या बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत कृषी मंत्र्यांनी दिली.

Read More →

परभणी येथील मराठवाडा कृषी विद्यापीठात केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांना डॉक्टर ऑफ सायन्स पदवी प्रदान करण्यात आली. या कार्यक्रमाची ही काही क्षणचित्रे…

Read More →

औरंगाबाद : यंदा राज्यात तीव्र दुष्काळी परिस्थिती असून, शासन दुष्काळ निवारणासाठी विविध उपाययोजना करत आहे. अशा अडचणीच्या वेळी कृषी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ व अधिकार्‍यांनी शेतकर्‍यांना मार्गदर्शन करावे. दुष्काळाला तोंड देत असताना पाण्याचा काटकसरीने वापर करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी परभणी येथे एका कार्यक्रमात केले.

Read More →

औरंगाबाद,दि.11 : यंदा खरिपासह रब्बी हंगामात शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले आहे. खरिपसाठी केंद्र शासनाने मदत जाहीर केली असून रब्बीसाठी लवकरच निर्णय घेण्यात येईल असे प्रतिपादन केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी औरंगाबाद येथे केले. मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीची आढावा विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित करण्यात आली होती.

Read More →

बाराव्या पंचवार्षिक योजनेत अनेक नवीन उपक्रमांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये युवकांना शेती क्षेत्रात प्रोत्साहित करण्याबरोबरच संशोधनासोबतच कृषी क्षेत्रामधील नाविन्यपूर्ण संशोधनाला आर्थिक सहाय्य देण्यात येणार आहे. तसेच अन्नसुरक्षा आणि शेतकर्‍यांचा सार्वत्रिक विकास हेच योजनेचे मुख्य वैशिष्ट्य राहणार असल्याची माहिती केंद्रीय कृषी आणि अन्नप्रक्रिया मंत्री शरद पवार यांनी ५७ व्या राष्ट्रीय विकास परिषदेत दिली.

Read More →

Video : जलसंधारणासाठी शरद पवार यांचे प्रयोग

केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी बारामती तालुक्यातील काटेवाडी परिसरात पन्नास वर्षांपूर्वी जलसंधारणासाठी प्रकल्प राबविला होता, त्या प्रयत्नांना उजाळा…जलसंधारणाच्या कामांपूर्वी काटेवाडी परिसरात पाण्याचा प्रश्‍न गंभीर होता. पाण्याची समस्या सोडविण्यासाठी जलसंधारणाच्या कामी लोकसहभाग हा महत्त्वाचा होता. यासाठी शरद पवार यांनी पुढाकार घेऊन आसपासच्या गावांतील जवळपास एक लाख स्वयंसेवकांची टीम तयार केली. वर्ष १९६७ मध्ये जलसंधारणाच्या या कामाला सुरवात झाली. परिसराचे सर्वेक्षण करण्यात आले. वाहून जाणारे पाणी जमिनीत मुरावे यासाठी पाझर तलाव आणि बंधारे बांधण्यात आले. एक वर्षात हा प्रकल्प पूर्ण करण्याचा निर्धार करण्यात आला होता आणि त्यासाठी दीड लाख रुपये इतका अंदाजे खर्च झाला.

Read More →

संपूर्ण देशाच्या कृषिधोरणाचे नियोजन करणारे केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार आपली शेतीही नियोजनपूर्वक करतात. महत्त्वाची जबाबदारी सांभाळत असतानाही ते आपल्या शेतीत आवर्जून लक्ष घालतात.

गोविंदबागेतील पस्तीस एकराच्या क्षेत्रावर कृषिमंत्री शरद पवार यांचे निवासस्थान आहे. दोन विहिरी व तीन एकर क्षेत्रावर डेअरी व गो

Read More →