भोसे (ता.पंढरपूर, जि.सोलापूर) येथे राज्याच्या कृषी व पणन विभागाचे अप्पर मुख्य सचिव डॉ. सुधीरकुमार गोयल यांनी ‘सा. आधुनिक किसानच्या’ शिंदी लागवडीचा प्रयोग प्रकाशित केलेला अंक पाहिला.

Read More →

सोलापूर,(प्रतिनिधी) दि. २ ः भाटघर धरनातून खर्डी (ता.पंढरपूर,जि.सोलापूर) येथील साखर कारखान्यासाठी पाणी सोडल्याच्या कारणावरून आज स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते व पाटबंधारे विभागाच्या अधिकार्यांत शाब्दीक चकमक झाली. बेकायदेशीर सोडणार्या अधिकार्यांवर ङ्गौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी संघटनेतर्ङ्गे पंढरपूरच्या प्रांताधिकार्याकडे करण्यात आली आहे.

Read More →

सोलापूर, दि. ११ (मोहन काळे) ः राज्यातील विविध जिल्ह्यात जागतिक बँकेच्या अर्थसहाय्याने ९ मोठे पाटबंधारे प्रकल्प, १३ मध्यम आणि ४४ लघु सिंचन प्रकल्प उभारले असून जागतिक बँकेच्या साहाय्याने राज्यातील ३३ जिल्ह्यात एकूण ६६ प्रकल्पांच्या कार्यक्षेत्रात कृषी सहाय्यता सेवा घटकांची अंमलबजावणी करण्यात येत असल्याची माहिती आत्मा योजनेचे प्रकल्प संचालक के. व्ही. देशमुख यांनी दिली. पंढरपूर येथे जागतिक बँकेच्या साह्याने महाराष्ट्र सुधार प्रकल्पांतर्गत जिल्हा प्रशिक्षण केंद्राच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जागतिक बँकेचे डॉ. पॉल सिध्दू होते.

Read More →

सोलापूर, (मोहन काळे) ः आंब्यासह रब्बी हंगामातील पिके फुलोऱ्यात आल्यामुळे पिकांमध्ये मधमाशांचा वावर वाढला आहे. मधमाशांद्वारे होणार्या परागीभवनाचा रब्बी हंगामातील विविध पिकांना फायदा होत आहे.

Read More →

सोलापूर (मोहन काळे)ता. १७ :पाण्यात पाहताना चोरूनीया क्षणैक, त्याचेच त्या कळाले तो राजहंस एक…! कवी ग.दि. माडगुळकरांच्या या सुरेख रचनेमुळे आठवणारा तो दुर्मिळ राजहंस चक्क सोलापूरकरांच्या भेटीला आलाय. पर्यावरण प्रेमिंसाठी हा एक राजयोग असला तरी शेतीला मात्र तो उपद्रवी आहे. त्यामुळे शेतकर्‍यांना त्यापासून जरा सावधच राहावे लागणार आहे.

सोलापूर जवळच्या हिप्परगा तलावात एक नाही… दोन नाही…तर तब्बल तीसहून अधिक दुर्मिळ असे राजहंस पक्षी डेरे दाखल झाले आहेत. हिप्परगाच नाही तर उजनी जलाशय व पंढरपूर येथील यमाई तलावातही राजहंस पाहण्याचा राजयोग पर्यावरण प्रेमिंना आला आहे.

आजवर बहुतेकांना काव्यातूनच राजहंसाबद्दल माहिती आहे. आपल्या पक्षीतज्ज्ञ, पर्यावरण प्रेमी व पक्षीमित्रांनाही याच्या दर्शनाचा फारसा योग आला नाही. पण यावर्षी सोलापूर जिल्ह्यातील काही मोजक्या जलाशयांमध्ये राजहंस आले आहेत. त्यामुळे त्यांना पाहण्याची सुवर्ण संधी मिळाली आहे. या पक्ष्यांना राजहंस नाव का मिळाले ? याचे उत्तर आपसूकच मिळते ते त्याच्या प्रत्यक्ष दर्शनातूनच. हिप्परगा तलाव परिसरात फेरफटका मारला असता पिवळी चोच, चोचीच्या टोकाला काळा स्पॉट, केशरी पाय, मानेच्या दोन्ही बाजूला उभे पांढरे पट्टे, डोक्यावर दोन आडवे काळे पट्टे असलेले हे पक्षी फारच रुबाबदार दिसले.

हे पक्षी वारंवार पाण्यात बुडून स्वच्छ राहण्याचा प्रयत्न करत होते. अधून-मधून पंख फडकावत मधेच थांबून आपला रुबाबात दाखवतात. पाण्यातून चालतानाचीही त्याची ऐटच निराळी होती. ऐंग-ऐंग असा आवाज करत ते हवेत उडाले तेव्हा सुरेख चित्र दिसले. पर्यावरण प्रेमिंना त्यांच्या येण्याने आनंद झाला असला तरी जलाशयाजवळच्या कोवळ्या गहू व हरभरा या पिकाला त्यांचा उपद्रव होतो आहे. कवळे अंकुर ते खात असल्यामुळे पिकांचे नुकसान होते. त्यामुळे शेतकर्‍यांना त्यांच्यापासून जरा सावधच रहावे लागणार आहे. या पक्षाबाबत पक्षीमित्र निरंजन मोरे म्हणाले, ‘आपल्याकडे राजहंस पक्षी दिसत नाहीत. त्यामुळे ते आपल्याला दुर्मिळ आहेत. पण त्यांचे यावळी दर्शन झाले हे विशेष. राजहंसाच्या डोक्यावर काळ्या रंगाचे दोन आडवे पट्टे असल्यामुळे त्याला इंग्रजीत बारहेडेड गूज असे म्हणतात. Anser Indicus हे त्याचे बायलॉजीकल नाव आहे.

गवत व पाण्यातील मासे तो खातो. हे पक्षी उणे २० अंश सेल्सिअस तापमानातील प्रदेशात राहतात. पण आपल्याकडे अन्नाच्या शोधात आलेल्या या पक्ष्यांनी वातावरणातील बदल स्वीकारला आहे.‘ अकलूज येथील शंकरराव मोहिते-पाटील महाविद्यालयाचे प्राध्यापक व पक्षी अभ्यासक डॉ. अरविंद कुंभार यांनी राजहंसाबद्दल अधिक माहिती दिली ती अशी ः लेह, लढाक, तिबेट, सियाचिन व पाकव्याप्त काष्मीरच्या प्रदेशात या पक्ष्याचे नेहमीचे वास्तव्य असते. एप्रिल ते जुलै हा त्यांचा विणीचा हंगाम असतो. राजहंस हे शेतीला उपद्रवी आहेत. पंढरपूर येथील पक्षी अभ्यासक बंडोपंत सबनीस यांनी राजहंस पक्षाच्या पंखाची लांबी सुमारे ७५ सें.मी. असल्याचे सांगितले. दरम्यान हे दुर्मिळ राजहंस सोलापूरकरांच्या भेटीला आल्यामुळे पर्वणीच ठरली आहे.

छायाचित्रे पाहण्यासाठी फोटोवरील बाणावर क्लिक करा
सर्व छायाचित्रे : मोहन काळे/सोलापूर

Read More →

सोलापूर जिल्ह्यातील जांभूड येथील शेतकरी राजू इनामदार यांनी एकात्मिक पद्धतीने अन्नद्रव्याचे उत्तम व्यवस्थापन करून वाया गेलेली केळीची बाग वाचविली. अशा परिस्थितीत त्यांनी गतवर्षी केळीचे एकरी ३४ टन सरासरी उत्पादन मिळविण्याची किमया साधली आहे. खर्च वजा जाता दोन एकरातून त्यांना पहिल्या वर्षी साडेतीन लाख रुपये निव्वळ उत्पन्न मिळाले आहे.

Read More →

आधुनिक किसानच्या १३ सप्टेंबरच्या अंकात ड्रॅगन फ्रुट विषयीची कव्हर स्टोरी प्रसिद्ध झाली आणि सोलापूरसह महाराष्ट्रातील शेतकर्‍यांना या फळाविषयी कमालीची उत्सुकता लागली. त्यामुळे ड्रॅगनफ्रुटची बाग पाहण्यासा

Read More →