चिखली, ता. ९ : आघाडी सरकारने साखर उद्योग अंशतः नियंत्रममुक्त केल्याबद्दल शेतकरी संघटनेच्यावतीने चिखली (जि. बुलडाणा) येथे साखर वाटून निर्णयाचे जोरदार स्वागत करण्यात आले.

Read More →

जामखेड तालुक्यातील हळगाव येथील जय श्रीराम शुगरच्या दुसरया गळीत हंगामाचा प्रारंभ गव्हानित मोळी टाकुन करताना कारखान्याचेसंचालक एस. एन. नवले समवेत आदिनाथचे माजी संचालक किसनराव ढवले; सरपंच तात्याराम काले उपसरपंच आबासाहेब ढवले, जामखेड तालुका ग्रामीण पत्रकारसंघाचे अध्यक्ष सत्तार शेख; चीफ केमिस्ट बाबासाहेब थोरात; जनरल मेनेजर
पवार; नेवसे या प्रमुख मान्यवरंसह परिसरातील शेतकरी यावेळी उपस्थित होते.
. (छाया : सत्तार शेख जामखेड )

Read More →

शेतकरी संघटनेचे त्रिशूल ऊस दराच्या आंदोलनासाठी सांगलीत एकत्र आले. माजी खा. शरद जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली रघुनाथदादा पाटील यांना या एकत्रित संघटनेचे सेनापती म्हणून निवडण्यात आले. पश्‍चिम महाराष्ट्रातील विशेषतः सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांतील काही कारखानदारांना संघटित करून अर्थमंत्री जयंत पाटील यांनी जाहीर केलेली उचल अमान्य करून पहिला हप्ता २९०० रु. मिळाला पाहिजे, या धोरणावर सर्वांचे एकमत झाले.

Read More →

1पश्‍चिम महाराष्ट्रात शेतकरी संघटना आणि कारखानदार यांच्यात पेटलेल्या आंदोलनात वसगडे (ता. पलूस, जि. सांगली) येथील चंद्रकांत शिवाजी नलवडे या शेतकर्‍याचा नाहक बळी गेला. आंदोलनाने भडकलेल्या अग्नीने चंद्रकांतची चिताच पेटवली.

Read More →

दुष्काळसदृश परिस्थितीमुळे सध्या शेतकरी हवालदिल झाले आहेत. दुष्काळावर मात करण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना केल्या जात आहेत. सांगली जिल्ह्यातील गोटखिंडी (ता. वाळवा) येथील जयसिंगराव पाटील ऊर्फ जे. बी. पाटील या ७० वर्षांच्या ‘तरुण’ शेतकर्‍याने दुष्काळी भागातील शेतकर्‍यांना प्रेरणा देईल, असा ‘पोरस पाईप’ चा अनोखा प्रयोग यशस्वीरीत्या राबवून दुष्काळावर रामबाण उपाय शोधला आहे.

Read More →

आधुनिक तंत्रज्ञान, पारदर्शी कारभार आणि जागतिक बाजारपेठेच्या अद्ययावत माहितीच्या जोरावर बी. बी. ठोंबरे यांनी उस्मानाबाद जिल्ह्यातील रांजणीच्या माळरानावर ‘नॅचरल शुगर’ कारखान्याची उभारणी करून तो अल्पावधीतच यशस्वी केला. हा कारखाना उपपदार्थ निर्मितीतही अव्वल ठरला आहे. त्यामुळे ऊस केवळ ‘शुगरकेन’ नसून तो ‘एनर्जी केन’ही असल्याचे त्यांनी आपल्या अनुभवातून सिद्ध केले आहे.

Read More →

जगभरात फळांपासून बनवलेल्या व त्याचप्रमाणे कार्बोनेटयुक्त सौम्यपेयांची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. अशा उत्पादनांसाठी भारत देश ही मोठी बाजारपेठ आहे. उसाच्या रसाकडेदेखील आता एक बाटलीबंद पेय म्हणून पाहण्याची वेळ आली आहे. आपला देश ऊस उत्पादनात जगात ब्राझीलपाठोपाठ दुसर्‍या क्रमांकावर आहे. सध्या उसाचे मोठ्या प्रमाणावर होणारे उत्पादन व साखर कारखान्यांकडून ऊसतोडीसाठी होणारी दिरंगाई यामुळे गूळ बनविण्यासाठी उसाचा काही प्रमाणात वापर होतो आहे; परंतु या पदार्थांना फारसे भवितव्य नाही.

Read More →