मुंबई (प्रतिनिधी), दि.1,: राज्यातील दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी दिर्घकालीन उपाययोजना राबविण्याचा महत्वाकांक्षी कार्यक्रम राज्य शासनाने हाती घेतला आहे. दुष्काळग्रस्तांना दिलासा देण्यासाठी 1985 कोटी रुपयांचे पॅकेज, 3250 कोटी रुपयांचा विदर्भ सघन सिंचन विकास कार्यक्रम व एकात्मिक पाणलोट विकास व्यवस्थापन कार्यक्रम राज्य शासनातर्फे प्रभावीपणे राबविण्यात येत असल्याची माहिती राज्यपाल के. शंकरनारायणन यांनी येथे दिली.

Read More →

औरंगाबाद (पंकज जोशी) ता. ३० : राज्यातील काही भागात दुष्काळ पडला असला तरी यंदाच्या खरीपात कापसाच्या बियाणांचा तुटवडा निर्माण होणार नसून शेतकर्‍यांनी काळजी करू नये असे आवाहन कापूस उत्पादक कंपन्यांनी केले आहे. त्यामुळे बियाणांच्या बाबतीत कापूस उत्पादकांना दिलासा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Read More →

औरंगाबाद, दि.३०. (प्रतिनिधी): शेतीचे पाणी बंद करून ते दारू कंपन्यांना दिले जात असल्याच्या विरोधात जायकवाडी धरणग्रस्त कृती समितीतर्फे आज सकाळी (११ वाजता) युनायटेड स्पिरीट व ए.बी.डी. दारू कंपन्यांसमोर निदर्शने करण्यात आली.

Read More →

आतापर्यंत केवळ भाजीपाला व फळपिकांसाठी ‘मल्चिंग’ तंत्राचा वापर होत होता; पण अकोला जिल्ह्यातील सिंदखेड (मोरेश्‍वर) येथील कल्याणी सोनोने यांनी विदर्भात पहिल्यांदा ‘मल्चिंग’ तंत्र वापरून कापूस लागवडीचा प्रयोग यशस्वीरीत्या राबविला व एकरी २९ क्विंटल उत्पादन घेतले आहे. याच शेतात त्यांनी काकडीचेही विक्रमी उत्पादन काढले आहे.

Read More →

पर्यावरण आणि दुष्काळाची आपण चर्चाच फक्त पुस्तकातच वाचत आलो; पण जेव्हा प्रत्यक्षात अनुभव येतो तेव्हा माणसाला भुगोलच्या पुस्तकाची किंवा इतिहासाची महती जाणवते आणि याचा प्रत्यय यंदाच्या दुष्काळावरून येत आहे.

Read More →

सोलापूर, दि.१७ (मोहन काळे): रोपळे (ता. पंढरपूर, जि. सोलापूर) येथील ग्रामस्थ गटतट विसरून चक्क आष्टी (ता.मोहोळ) येथील ऐतिहासिक तलावातील गाळ काढत आहेत. आजपर्यंत त्यांनी सुमारे चार एकर क्षेत्रातील ११ हजार ब्रास गाळाचा उपसा झाला केला आहे. हे काम पाऊस पडेपर्यंत चालू ठेवणार असल्याने या तलावातील पाण्याच्या पातळीच आता चांगलीच वाढ होणार आहे. गाव एक झाले तर काय होऊ शकते, हेच या गावाने दाखवून दिले आहे.

Read More →

राजस्थानमधील वाळवंटी प्रदेशात मराठवाड्याच्या निम्म्यापेक्षाही कमी सरासरी पाऊस पडतो; पण तरीही तेथील लोकांनी घराघरांत टाक्यांमधून पावसाचे पाणी साठविले आहे. त्यामुळे त्यांना पिण्याच्या पाण्यासाठी उन्हाळ्यात दगदग करावी लागत नाही. मराठवाड्यातील शेतकर्‍यांसह सर्वसामान्य नागरिकांनी ‘पाणी पिकविण्याच्या’ या प्रयोगाचा अवलंब केला, तर त्यांना पिण्याच्या पाण्यासाठी टँकरवर किंवा सरकारवर अवलंबून राहावे लागणार नाही.

Read More →