रत्नागिरी, ता. २० : गेल्या काही दिवसांपासून देशभरात अचानक होणार्‍या हवामान बदलांचे संकट आंबा पिकापुढेही उभेठाकले असून त्याचा थेट परिणाम आंबा पिकावर होणार असल्यानेयेथील आंबा बागायतदार अडचणीत आला आहे.

Read More →

बाजरीचा सुयोग्य काळ निघून जात आहे; परंतु यावर्षी बाजरीची उशिरापर्यंत जुलैच्या दुसर्‍या आठवड्यातही पेरणी करायला हरकत नाही. सन-२०१३ च्या उन्हाळ्यात येऊ घातलेल्या चाराटंचाईवर काही प्रमाणात याचा उपयोग होईल. शेतकर्‍यांनी आपल्याकडे असलेल्या नियोजित कापसाच्या क्षेत्रात घट करून काही क्षेत्र बाजरी (जिथं घेतली जाते तिथं) पेरावी. जिथं बाजरी येत नाही, तिथं मकासारखे पीक चारा पीक म्हणून पेरावे. हिरवा चारा, चार्‍याची पिके याचे ‘सायलेज’ करून साठवण करावी; तसेच सोयाबीनचे क्षेत्र कमी करून मध्यम ते भारी जमिनीत सूर्यफूल घ्यावे.

Read More →

नागपूर ः सेंटर फॉर सस्टेनेबल ऍग्रिकल्चर (सी.एस.ए.) तर्फे ‘बदलत्या हवामानामुळे शेतीतील बदलती समिकरणं’ विषयावरील चर्चासत्र पार पडले. अनियमीत पावसाने शेतकर्यांवर येणारी दुबार किंवा तिबार पेरणीची स्थिती, नैसर्गिक आपत्ती, वातावरणातील बदल, महागडे बियाणे व कृषीनिवीष्ठा, नवनवीन रोगांचा प्रादुर्भाव, शेतमालाचे अस्थिर दर अशा कारणांमुळे विदर्भातील शेती आणि शेतकरी नेहमीच अडचणीत असतो असा सुर, या कार्यशाळेतून निघाला.

Read More →

अतुल भांबेरे/नाशिक
नाशिक, ता, २९ : महाराष्ट्राचा कॅलिफोर्निया म्हणून परिचित असा सुजलाम सुफलाम असलेला तालुका निफाड तालुक्याची ख्याती आहे. द्राक्ष बागांचा तालुका असलेल्या या गावाला अस्मानी संकटाने ग्रासल्याने येथील द्राक्ष उतपादक हैराण झाले आहेत. गेल्या तीन चार दिवसांपासून थंडीची हुडहुडी जास्त प्रमाणात जाणवू लागल्याने द्राक्ष पिकावर त्याचा परिणाम होतो आहे.

Read More →

अहमदनगर : थंडीने आज पहाटे पुन्हा नगरकरांना हुडहुडी भरली. जिल्ह्य़ात पुन्हा ५.९ अंश म्हणजेच या हंगामातील निच्चांकी तपमानाची नोंद झाली. तीन आठवडय़ांपूर्वी शहर व परिसरात सलग तीन ते चार दिवस निच्चांकी तपमान नोंदवले गेले होते. मात्र त्यावेळी ते सात अंशापर्यंत होते. मागच्या चोवीस तासांत पारा सहाच्याही खाली घसरला. दरम्यान, गव्हाला ही थंडी पोषक ठरणार आहे. त्यामुळे बागायती भागात शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होते.

Read More →

औरंगाबाद, ता. २७ : गेल्या दोन दिवसांपासून तापमानात बदल होत असून नाशिक व परिसरातील तपमानाची ४ डिग्री सेल्सियसपर्यंत नोंद झाली आहे. दिवसाचे तापमान तीन ते चार तास २० ते २५ अंश सेल्सिअस राहिले तर द्राक्षबागेत ‘भुरी’ वेगाने वाढते.

Read More →