‘काळ्या आई’ वर प्रेम करणारी माणसं आपल्या शेतात सतत नवनवीन प्रयोग करत असतात. सांगली जिल्ह्यातील तांदूळवाडी येथील आनंदराव पाटील हे त्यापैकी एक आहेत. गेल्या काही वर्षांपासून एकरी १०० टनांपेक्षा जास्त ऊस उत्पादन घेणार्‍या आनंदरावांनी गत हंगामात पश्‍चिम महाराष्ट्रात ऊस उत्पादनाचा उच्चांक करत एकरी १४० टनांपर्यंत मजल मारली आहे. सूक्ष्म अन्नद्रव्यांचा संतुलित वापर हा त्यांच्या यशस्वी शेतीचा मूलमंत्र आहे.

Read More →

‘काळ्या आई’ वर प्रेम करणारी माणसं आपल्या शेतात सतत नवनवीन प्रयोग करत असतात. सांगली जिल्ह्यातील तांदूळवाडी येथील आनंदराव पाटील हे त्यापैकी एक आहेत. गेल्या काही वर्षांपासून एकरी १०० टनांपेक्षा जास्त ऊस उत्पादन घेणार्‍या आनंदरावांनी गत हंगामात पश्‍चिम महाराष्ट्रात ऊस उत्पादनाचा उच्चांक करत एकरी १४० टनांपर्यंत मजल मारली आहे. सूक्ष्म अन्नद्रव्यांचा संतुलित वापर हा त्यांच्या यशस्वी शेतीचा मूलमंत्र आहे.

Read More →

वडील गेल्यावर कुटुंबाची उपजीविका चालविण्याकरिता हातभार लावणार्‍या युवतीने शेतीकाम व बचतगटाच्या कार्यातून गावात स्वतःची ओळख निर्माण केली. याची ङ्गलश्रुती म्हणून अगदी स्वप्नवत सरपंचपद मिळालेल्या गंगा जावरकरने आता शेतीबरोबर गावाचा विकास करण्याचं ध्येय उरी बाळगलं आहे. मागास, उपेक्षित, दुर्लक्षित, कुपोषित, नक्षलग्रस्त, आत्महत्याग्रस्त भागात जन्मलेल्या या कृषककन्येनं कष्ट सोसले, प्रतिकूल परिस्थिती भोगल्याने दुःखही जाणलं. कुठलीच राजकीय पार्श्‍वभूमी नसताना आणि मनी पुसटशी कल्पना नसताना सरपंच होण्याचा योग आला. ग्रामस्थांनीही गंगेला विकासाचा दूत म्हणूनच सरपंचाच्या रूपात स्वीकारलं. याला हुरळून न जाता पूर्वीप्रमाणेच शेती आणि समाजकार्यात गुंतवून घेतलेल्या गंगेची यशकथा ग्रामीण भागातील महिला सरपंच, प्रतिनिधींबरोबरच तरुणांनाही प्रेरणादायी ठरेल.

Read More →

प्रतिकूल परिस्थितीत आधुनिक तंत्राचा वापर करून जळगाव फेरण (ता. जि. औरंगाबाद) येथील सिकंदर कडूबा जाधव यांनी कमी पाणी आणि कमी खर्चात जास्त उत्पन्न मिळवून शेतीतून आर्थिक प्रगती साधली आहे. त्यांनी डाळिंब, मोसंबी, पेरूची फळबाग लागवड केली आहे. दरवर्षी ते ठिबकवर कापूस उत्पादन घेतात. काशीफळ आणि भोपळ्याच्या बीजोत्पादनातही जाधव अग्रेसर आहेत.

सिकंदर कडूबा जाधव हे जळगाव फेरण येथील रहिवासी. औरंगाबाद-जालना मार्गावर शेकटा येथून दोन-तीन किलोमीटर अंतरावर जाधव यांची शेती आहे. त्यांना वडिलोपार्जित सव्वादहा एकर शेतजमीन असून यापैकी सव्वाचार एकर त्यांच्या वाट्याला आली आणि तीन एकर जमीन त्यांनी विकत घेतली. १९८९ साली त्यांनी विज्ञान शाखेची पदवी घेतली. नोकरीच्या मागे न लागता शेती करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. येथूनच खर्‍या अर्थाने शेतीत आधुनिकता आणण्यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले. यासाठी विविध ठिकाणी जाऊन प्रगत शेतीतंत्राबाबत माहिती घेतली. शेतीविषयक कार्यशाळांमध्ये सहभागी झाले. यातून प्रेरणा मिळत गेली आणि शेतीतील उत्पादन वाढवत त्यांनी विकास साधला.

पिकासाठी पाण्याची व्यवस्था
जाधव यांची शेती पाण्याअभावी तशी हंगामीच म्हणावी लागेल. सुरुवातीच्या काळात सिंचनासाठी सामाईक विहीर होती. यामुळे संपूर्ण क्षेत्रात पीक घेणे शक्य होत नव्हते. पाण्याच्या समस्येवर मात करण्यासाठी जाधव यांनी शेतात दोन बोअर घेतले. या बोअरला चांगले पाणी लागले. यानंतर उपलब्ध पाण्यात जास्तीत जास्त पीक घेता यावे, यासाठी त्यांनी पीक पद्धतीत बदल केला. खरिपात कापूस, तूर, मूग, बाजरी आणि रब्बीत गहू, हरभरा यांसारखी पिके सुरुवातीला घेतली. पाण्यामुळे पिकांच्या क्षेत्रासोबतच उत्पन्नात वाढ झाली. यानंतर पाण्याच्या उपलब्धतेनुसार ते पीक पद्धतीत बदल करत गेले. पिकासाठी कमी पाणी लागावे म्हणून त्यांनी ठिबक सिंचन पद्धतीचा अवलंब केला.

जमीन सुधारण्यासाठी प्रयत्न
पाण्याची व्यवस्था केल्यानंतरही जमीन हलकी असल्याने अपेक्षित उत्पादन मिळत नसल्याचे जाधव यांच्या लक्षात आले. उत्पादन वाढीसाठी जमिनीची प्रत सुधारण्याचे त्यांनी ठरविले. यासाठी शेतालगतच्या तलावातून २०० ट्रॉल्या गाळ जमिनीत टाकला. पुढील दोन-तीन वर्षे जमिनीत गाळ टाकला. जमिनीत ताग, ढेंच्या यांसारखी हिरवळीची पिके घेतली. यामुळे जमिनीची सुपीकता वाढत गेली. त्यांनी मातीच्या नमुन्यांची तपासणी करून घेतली आणि पिकांना आवश्यकतेप्रमाणे रासायनिक खतांचा वापर केला.

३ बाय २ फुटावर कापूस लागवड
कृषी विभागाने सन २००६ मध्ये या गावात एक शेतीशाळा आयोजित केली होती. शेतकर्‍यांनी ३ बाय २ फूट अंतरावर कापूस लागवड करावी, असे आवाहन यावेळी करण्यात आले होते. यानुसार सिकंदर जाधव यांनी ४ बाय ४ फुटांवर कापूस लागवड करण्याची आपली जुनी पद्धत बदलून कृषी अधिकार्‍यांच्या सल्ल्यानुसार कापूस लागवड केली. दरम्यानच्या काळात कपाशीला ठिबक सिंचनाने पाणी देण्याची व्यवस्था केली. यामुळे कापसाचे एकरी २० क्विंटल उत्पादन मिळाले. जाधव यांच्या तुलनेत इतर शेतकर्‍यांना यावर्षी कपाशीचे निम्मेच उत्पादन झाले. जाधव यांनी वापरलेल्या तंत्राच्या प्रभावामुळे इतर शेतकरी त्यांनी अवलंबलेल्या पद्धतीनुसार कापूस लागवडीकडे वळाले.

फळबाग लागवडीकडे वाटचाल
नियमित पिकांवर अवलंबून न राहता ङ्गळबाग लागवड करण्याचा निर्णय जाधव यांनी घेतला. यासाठी त्यांनी कमी पाण्यात येणारी ङ्गळपिके घेण्याचे निश्‍चित करून दोन एकरात डाळिंब, एक एकर क्षेत्रात पेरू व दोन एकरांमध्ये मोसंबी लावली. डाळिंबाची लागवड करताना त्याच्या व्यवस्थापनाचा बारकाईने अभ्यास केला. डाळिंबाच्या झाडांना सेंद्रिय व गांडूळ खत तसेच निंबोळी पेंड दिल्याने रासायनिक खतांवर होणार्‍या खर्चात बचत झाली. डाळिंबाची देखरेख करण्यासाठी लागणार्‍या मनुष्यबळाचा विचार करता त्यांनी कमी मनुष्यबळ लागणार्‍या पेरूच्या ‘सरदार ४९’ या वाणाची लागवड केली. सोबतच पाण्याची उपलब्धता लक्षात घेऊन मोसंबीचीही लागवड केली. विशेष म्हणजे या तिन्ही प्रकारच्या फळबागांची लागवड केल्यानंतर कामाच्या वेळा वेगवेगळ्या येतील, याची काळजी घेतली.

काशीफळ, भोपळा बीजोत्पादन
फळबाग लागवड केल्यानंतर फळपीक हातात येण्यास चार-पाच वर्षांचा कालावधी लागणार होता. यामुळे गुंतविलेल्या जमिनीतून कोणतेही उत्पन्न या काळात मिळणार नव्हते. हे नुकसान टाळण्यासाठी जाधव यांनी या जमिनीत फळबागेला पूरक ठरेल, असे वेलवर्गीय आंतरपीक घेण्याचे ठरविले. नंतर काशीफळ व भोपळ्याचे बीजोत्पादन घेण्याची कल्पना त्यांना सुचली. यासाठी त्यांनी ‘महाबीज’ व इतर बियाणे कंपन्यांशी करार केला. जाधव हे खरिपात काशीङ्गळ व रब्बी हंगामात भोपळ्याचे बीजोत्पादन घेतात. अशा प्रकारे त्यांनी अतिरिक्त उत्पन्नाचा मार्ग शोधला.

सेंद्रिय खत निर्मितीला महत्त्व
जमिनीतून विविध प्रकारचे उत्पादन घेत असताना जमिनीचा कस टिकून राहील, याकडे जाधव हे विशेष लक्ष देतात. यासाठी त्यांनी गांडूळ खत प्रकल्प उभारला आहे. निंबोळी पेंड तयार करण्यासाठी जाधव यांनी एक गिरणी विकसित केली असून यासाठी निंबोळी विकत घेतली जाते. किटकनाशक म्हणून निंबोळी अर्काचा फवारणीसाठीदेखील चांगला उपयोग होत आहे.

सुधारित अवजारांचा वापर
शेतमजुरांची समस्या लक्षात घेऊन सिकंदर जाधव यांनी आपल्या गरजेनुसार शेती अवजारात काही बदल करून अवजारे तयार केली. कापूस लागवड करताना खत आणि फुल्ली एकाच ठिकाणी पडावी, यासाठी एक यंत्र तयार केले. सायकलचलित कोळपे वापरताना अवघड जात असल्याने मनुष्यचलित कोळपे बनविले. एक जुने
मिरची कांडप यंत्र खरेदी करून त्याचे रूपांतर निंबोळीची भुकटी करण्यासाठी केले. बोअर नादुरुस्त झाल्यास पंप काढण्यासाठी लागणारे मनुष्यबळ आणि ताकद कमी लागावी, यासाठी एक क्रेन विकसित केले आहे. जाधव यांनी शेतीत केलेल्या विविध प्रयोगांसाठी विविध पुरस्कारांनी सन्मानदेखील झाला आहे.

संपर्क ः सिकंदर कडूबा जाधव
जळगाव फेरण, ता. जि. औरंगाबाद
मो. नं. ९६६५४४७४२९

- राहुल कुलकर्णी / औरंगाबाद

Read More →

महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राकडील 15 दिवसीय शास्त्रशुध्द उद्योजकता प्रशिक्षणाच्या माध्यमातून उद्योजक घडविण्यासाठी प्रेरणा व दिशा श्री.तुकाराम नन्नावरे यांनी मिळाली. या प्रेरणा व दिशेची वाट आपल्या यशस्वी जीवनात त्यांनी स्वाभिमान जागृतीसह स्वकष्टांच्या व्यवसायाकडे झेप घेऊन ते आज यशस्वी उद्योजक बनले आहे. याकामी काही अंशी अर्थसहाय्याची साथ लाभली ती महात्मा फुले आर्थिक विकास महामंडळाची.

Read More →

आपल्या रोजच्या जगण्यासाठी आवश्यक असणार्‍या अन्न, वस्त्र, निवारा या गोष्टी आपल्या शेतातून भागविता येतात का? कुठलेही रसायन, खत न वापरता शेती करता येते का, या प्रश्‍नाचे सकारात्मक उत्तर मिळते, रामभाऊ महाजन यांच्या स्वावलंबी जीवनशैलीतून. खाद्यतेलापासून ते कापडापर्यंतच्या गोष्टी ते घरीच नवितात. त्यामुळेच बाजारात कापसाचे भाव पडले तरीही त्यांच्या चेहर्‍यावर नाराजी दिसत नाही.

Read More →

‘हा त फिरे तेथे लक्ष्मी शिरे’ हे सूत्र लागू पडते ते शेतकर्‍यांना. कारण त्याच्या हातात श्रमाची जिद्द आणि शास्त्राचा आविष्कार एकवटलेला आहे. महाराष्ट्रातील शेतकरी म्हणजे शेतीचे विज्ञान आणि शेतीची कला यामध्ये मुरलेला आहे. १८ टक्के फक्त सिंचन क्षमता असतानाही राज्यातील शेतकर्‍यांनी जो चमत्कार घडवलाय, त्याचे कारणच शेतीवर असलेली श्रद्धा, निष्ठा व विश्‍वास. तसे गेली तीन वर्षे तुलनेने पाऊसपाणी बरे होते, भावसुद्धा बरे मिळाले. नाही म्हणायला यंदा पोळ्यानंतरचा पाऊस झाला नाही. त्याचे दूरगामी परिणाम होताना दिसताहेत; पण पावसाचे हेलकावे, बाजारभावाची हुलकावणी हे नित्याचे खेळ आपल्याला काही नवे नाहीत.

Read More →